Farmers like groundnut in summer crops in Parbhani district
Farmers like groundnut in summer crops in Parbhani district

परभणी जिल्ह्यात उन्हाळी पिकांत शेतकऱ्यांची भुईमुगाला पसंती

परभणी : जिल्ह्यात उन्हाळी हंगामातील पिकांचे सर्वसाधारण क्षेत्र ५ हजार ४३० हेक्टर आहे. यंदाच्या हंगामात गुरुवार (ता.५) अखेरपर्यंत ६ हजार ८८८ हेक्टरवर (१२७ टक्के) पेरणी झाली. सिंचनासाठी मुबलक पाणी असल्यामुळे यंदा पेरणी क्षेत्राने सर्वसाधारण क्षेत्राचा टप्पा ओलांडला आहे. त्यात सर्वाधिक ५ हजार ३७८ हेक्टरवर भुईमुगाची पेरणी झाली, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

जिल्ह्यात उन्हाळी हंगामातील पिकांत भुईमूग ४ हजार ८१० हेक्टर, सूर्यफूल ३४० हेक्टर, मका २८० हेक्टर या पिकांचा समावेश आहे. गतवर्षी ऑक्टोबर महिन्यापर्यंत पाऊस सुरू राहिला. विहिरी, कूपनलिका, लघू, मध्यम, मोठ्या प्रकल्पांत पुरेशा प्रमाणात पाणी आहे. त्यामुळे उन्हाळी हंगामातील पेरणी क्षेत्रात वाढ मोठी वाढ झाली. उन्हाळी हंगामातील प्रमुख नगदी पीक असलेल्या भुईमुगाला शेतकऱ्यांनी सर्वाधिक पसंती दिली. 

चारापीक म्हणून मक्याची १ हजार ५११ हेक्टरवर (५४० टक्के) पेरणी झाली; परंतु सूर्यफुलाच्या पेऱ्याची नोंद नाही. जायकवाडी, सिद्धेश्वर, माजलगाव या मोठ्या प्रकल्पाच्या, करपरा, मासोळी या मध्यम प्रकल्पांच्या कालव्याच्या लाभक्षेत्रात उन्हाळी पिकांची पेरणी झाली.

जिल्ह्यातील परभणी, जिंतूर, सेलू, सोनपेठ, गंगाखेड या पाच तालुक्यांतील पेरणीक्षेत्राने सर्वसाधारण क्षेत्राचा टप्पा ओलांडला आहे. जिंतूर तालुक्यातील पेरणी क्षेत्र सर्वाधिक; तर पालम तालुक्यात सर्वांत कमी आहे, असे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com