Agriculture news in marathi Farmers groups, come together by companies: Dr. Dhawan | Agrowon

शेतकरी गट, कंपन्यांद्वारे एकत्र या : डॉ. ढवण

टीम अॅग्रोवन
शनिवार, 4 जुलै 2020

हिंगोली : ‘‘शेतमालाची विपणन साखळी बळकट करण्यासाठी शेतकऱ्यांनी शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्यांद्वारे एकत्र येण्याची गरज आहे,’’ असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांनी केले.

हिंगोली : ‘‘शेतमालाच्या मूल्यवर्धनासाठी प्रक्रिया उद्योगास चालना देणे आवश्यक आहे. कृषी विद्यापीठातर्फे बांधावर आधुनिक कृषी तंत्रज्ञान पोचवले जात आहे. शेतमालाची विपणन साखळी बळकट करण्यासाठी शेतकऱ्यांनी शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्यांद्वारे एकत्र येण्याची गरज आहे,’’ असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांनी केले.

चिखली आणि पांगरा सती (ता.वसमत) येथे कृषी संजीवनी सप्ताह कार्यक्रमात डॉ. ढवण बोलत होते. यावेळी विस्तार शिक्षण संचालक डॉ. डी. बी. देवसरकर, विस्तार कृषी विद्यावेत्ता डॉ. यु. एन. आळसे, मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. पि. आर. देशमुख, उपविभागीय कृषी अधिकारी बी. एस. कच्छवे, तालुका कृषी अधिकारी जी. बी. कल्याणपाड, मंडळ कृषी अधिकारी चव्हाण, कृषी पर्यवेक्षक मुळजकर, आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक के. एस. घुगे, कृषी सहाय्यक खंदारे, पि. के. माने, श्रीनिवास शिंदे, कृषी अधिकारी दहिवडे आदीसह शेतकरी उपस्थित होते.

चिखली येथील शेतकरी चंद्रकांत जेठुरे यांच्या शेतावर घन पद्धतीने लागवड केलेल्या पेरू बागेची पाहणी केली. आधुनिक तंत्रज्ञान, विपणन, प्रक्रिया यांच्या बद्दल माहिती दिली. डॉ. ढवण यांनी प्रल्हादराव काळे यांच्या शेतावर सोयाबीन पिकाची पेरणी केली.

वसमत-पूर्णा फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लि. अंतर्गत पांगरा सती येथील शेतकरी संजय लोंढे यांच्या शेतावर दोन किलोमीटर अंतर पायी चालत जात करवंद, सीताफळ, पेरु या पिकांची पाहणी केली. 
कृषी विद्यापीठातर्फे प्रशिक्षणे, प्रक्रिया याबाबत मदत केली जाईल, असे त्यांनी सांगितले. यावेळी फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे संचालक बालाजीराव यशवंते, गंगाधर साखरे, संजय शिंदे, लक्ष्मीकांत खोले, बळीराम काकडे, ज्ञानदेव गुट्टे, हरी बुचाले, अविनाश शिंदे, मारोती शिंदे,अनिल कदम उपस्थित होते.


इतर ताज्या घडामोडी
औरंगाबादमध्ये आज रानभाज्या महोत्सवऔरंगाबाद  ः ‘‘वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
सांगलीत ६८ हजार शेतकऱ्यांनी उतरवला...सांगली  ः जिल्ह्यातील ६८ हजार ०१८...
रिसोडमध्ये पावसाची उघडीपवाशीम  ः राज्यात बऱ्याच भागात पाऊस धुमाकूळ...
वाशीम जिल्ह्यात एक लाख ४२ हजार हेक्टर...वाशीम ः पंतप्रधान पीकविमा योजनेत जिल्ह्यातील...
खानदेशात ताग लागवडीला पसंतीजळगाव  ः कमी पाण्यात व उशिरा लागवड करूनही...
पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत घटकोल्हापूर : पश्चिम भागात पावसाचा जोर घटल्याने...
परभणी विभागात बिजोत्पादन होणार २७ हजार...परभणी : यंदा महाबीजच्या परभणी विभागातील परभणी,...
अकोल्यात पाऊस सुरुचनगर  ः अकोले तालुक्याच्या पश्चिम आदिवासी...
विदर्भातील पोल्ट्री व्यावसायिकांचे...अमरावती : विदर्भातील पोल्ट्री व्यावसायिकांना...
इगतपुरी, नाशिक तालुक्यात वाऱ्यामुळे...नाशिक : जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात झालेल्या...
विक्रीअभावी मालवंडीत लिंबू उत्पादकांना...मालवंडी, जि. सोलापूर ः बार्शी तालुक्यातील मालवंडी...
सफेद चिप्पी कांदळवन वृक्ष घोषितमुंबई: सफेद चिप्पी (sonneratia alba) या कांदळवन...
यंदा बैल पोळा उत्साहात साजरा होणार रोपळे बुद्रूक , ता.पंढरपूर , जि . सोलापूर...
हलक्‍या ते मध्यम स्वरूपात पावसाची शक्‍...महाराष्ट्रावरील हवेच्या दाबात बदल होत असून,...
औरंगाबादमध्ये बटाटे २००० ते २४०० रुपये...औरंगाबाद  : येथील कृषी उत्पन्न बाजार...
औसा तालुक्यात उडीद, मूग व्हायरसच्या...औसा, जि. लातूर : तालुक्यातील उडीद आणि मूग ही पिके...
शेतमजुरांसाठी कौशल्याधारीत प्रशिक्षण...नाशिक: बदलत्या पीक पद्धतीमध्ये कीडनाशक फवारणी,...
कोल्हापूर जिल्ह्यात वादळ, पुराचा उसाला...कोल्हापूर: जोरदार वाऱ्यासह सुरु असलेल्या पावसाने...
पुणे जिल्ह्यात पावसामुळे भात लागवडीला...पुणे ः गेल्या चार ते पाच दिवसांपासून पुणे...
पाथरूडच्या बंधाऱ्यांत मुबलक पाणीपाथरूड, जि. उस्मानाबाद : येथील दुधना नदीवर...