Agriculture News in Marathi Farmers groups who have completed the work Grant's Advile: Shetty | Agrowon

कामे पूर्ण केलेल्या शेतकरी गटांचे  अनुदान का अडविले ः शेट्टी 

टीम अॅग्रोवन
सोमवार, 29 नोव्हेंबर 2021

समूह शेती योजनेत भाग घेतलेल्या शेतकरी गटांचे अनुदान कृषी खात्याने अडवून ठेवल्याबद्दल काही गटांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्याकडे कैफियत मांडली आहे.

पुणेः समूह शेती योजनेत भाग घेतलेल्या शेतकरी गटांचे अनुदान कृषी खात्याने अडवून ठेवल्याबद्दल काही गटांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्याकडे कैफियत मांडली आहे. त्यावर ‘‘कामे पूर्ण केलेल्या शेतकरी गटांचे अनुदान का अडविले; जमत नसल्यास ही योजनाच बंद करा,’’ अशा शब्दात शेट्टी यांनी संताप व्यक्त केला आहे. 

समूह शेतीस प्रोत्साहन देण्यासाठी शेतकरी गटांच्या सबलीकरणाकरीता राज्य शासनाने चालू केलेल्या योजनेत १०४ गटांनी कामे पूर्ण केली आहेत. मात्र, कामे करूनही अनुदान अडवून ठेवल्याने या गटांनी शेट्टी यांच्याकडे मदतीची याचना केली आहे. ‘‘मी लवकरच कृषिमंत्र्यांच्या भेटीला जाणार आहे. त्या वेळी या विषयी सविस्तर बोलेन. गटांना सांगून वेळेत अनुदान न देणे ही बाब चुकीची आहे. त्यामुळे अनेक शेतकरी कर्जबाजारी झालेले आहेत,’’ असे शेट्टी यांनी सांगितले. 

राज्यात ३३३ शेतकरी गटांनी या योजनेत भाग घेतला होता. या गटांनी सादर केलेल्या सविस्तर प्रकल्प अहवालाच्या (डीपीआर) अहवालानुसार कमाल प्रत्येक एक कोटी रुपयांपर्यंत अनुदान देण्याची जबाबदारी शासनाकडे होती. ‘‘आम्ही कामे करूनही अनुदान अडविण्यात आले आहे. गटातील शेतकऱ्यांनी घरादारातून, सावकाराकडून पैसा आणून स्वहिस्सा म्हणून कामांसाठी टाकला. मात्र, अनुदान अडवून ठेवल्याने आम्ही कर्जबाजारी झालेलो आहोत,’’ अशी प्रतिक्रिया एका गटाच्या प्रमुखाने दिली. 

मूळ पावत्या गहाळ केल्या 
माडा (जि. सोलापूर) येथील जय मल्हार शेतकरी गटाचे अध्यक्ष बी. के. माने यांनी सांगितले की, कृषी खात्याच्या काही अधिकाऱ्यांनी आमचा अक्षरशः छळ केला. पुढाऱ्यांच्या जवळचे आणि नात्यागोत्याला लाभ मिळतील, असे शेतकरी गट तयार करण्यात अधिकारी आघाडीवर होते. आमच्या सारख्या शेतकऱ्यांना गट नोंदणीसाठीही झगडावे लागले. गट तयार केल्यानंतर शेतकऱ्यांनी कर्जबाजारी होऊन कामे केली. या कामाच्या मूळ पावत्या द्या, असे सांगितले गेले. पावत्या देताच त्या गहाळ केल्या गेल्या. झेरॉक्स चालणार नाही, असे सांगितले गेले. अल्पभूधारक शेतकरी त्यामुळे अडचणीत आले. 

जय महाल्ह शेतकरी गटाचे ३५ लाख रुपये अडवून देण्यात आल्याचा, या शेतकऱ्यांचा आहे. राज्यात १०० पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी कामे करूनही अनुदान देण्यात आलेले नाही. दरम्यान, कृषी आयुक्त धीरज कुमार यांनी राज्यातील गटांनी केलेल्या कामांचे अहवाल मागविले आहेत. राज्यभर सध्या त्यासाठी अधिकाऱ्यांची धावपळ सुरू आहे. ‘‘गैरकामे करणाऱ्या गटांची चौकशी कोणाकडूनही करा; मात्र ज्या गटांनी कामे करून पदरचा पैसा समूहशेतीच्या प्रकल्पांमध्ये टाकला अशा गटांना अनुदानाचे वाटप होण्यासाठी आयुक्तांनी पाठपुरावा करावा,’’ अशी मागणी एका गटाने केली आहे. 

आमच्या चौकशीचे अधिकार 
भ्रष्ट यंत्रणेला नाहीत 

‘‘कृषी खात्याला गैरप्रकारांची चौकशी करायची होती तर खात्यातील अधिकाऱ्यांकडून का केली नाही, त्यासाठी भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या कृषिउद्योग महामंडळाची मदत घेण्यात आली. मुळात, राज्यातील लाखो शेतकऱ्यांना बोगस कृषी अवजारे वाटणाऱ्या व लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडून अधिकाऱ्यांची चौकशी सुरू असलेल्या या महामंडळाची लक्तरे विधिमंडळात टांगली गेली आहे. त्यांना गटशेतीची कामे तपासण्याचा अधिकारच नाही,’’ अशी संतप्त प्रक्रिया एका गटाच्या अध्यक्षाने व्यक्त केली.


इतर अॅग्रो विशेष
महाराष्ट्रात ३५ धान्य आधारित इथेनॉल...वृत्तसेवा - केंद्र सरकारने (Central Government)...
रशियासाठी निर्यातीच्या द्राक्ष दराचा...पुणे - महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाने...
गावरान कि ब्रॉयलर चवीला कोण जबरदस्त?कोंबडीची पचनसंस्था कशी कार्य करते. तुम्ही कोंबडी...
थंडीत खा अंडी रोज सकाळी उठल्यावर कसला नाष्टा करावा जो कि...
गुणवत्तापूर्ण आंब्याला मिळवली ग्राहक...मालगुंड (ता. जि. रत्नागिरी) येथील विद्याधर...
ट्रायकोडर्मा निर्मितीसाठी शेतात उभारली...राहुल रसाळ यांनी शेत परिसरात छोटेखानी प्रयोगशाळा...
टिळा तेजाचामराठी भाषेला मातीतल्या कवितेचे लेणं चढवणाऱ्या कवी...
शेळ्यांसाठी शेंगवर्गीय चारा पिक शेळ्यांचा सर्वांत आवडता आहार म्हणजे झाडाचा पाला....
सोयाबीन आणि कापसाचे मराठवाडा,...मराठवाडा कापूस बाजारभाव - आज किनवट बाजारात...
जनावरांमध्ये अचानक गर्भपात का होतो?या रोगाचा प्रसार प्रामुख्याने गवत, पिण्याचे पाणी...
सहकाराला मारक कायदे बदलण्याला प्राधान्य राज्यातील सहकारी बॅंकिंग व्यवस्थेचे अभ्यासक...
पंजाबात मोहरीच्या क्षेत्रात वाढ, मात्र...वृत्तसेवा - पंजाबमध्ये मोहरीची लागवड ३३ हजार...
‘जुनं ते सोनं' चा खोटेपणा "जुनी शेती खूप चांगली होती. त्या शेतीत खूप...
उन्हाचा चटका वाढला, गारठा ओसरला पुणे : राज्यात उन्हाचा चटका वाढू लागला असल्याने...
साखर कारखान्यांच्या माल तारण  कर्जावरील...कोल्हापूर : साखर कारखान्यांच्या माल तारण...
खते मुबलक; पण किंमत जादा पुणे : राज्यात रब्बी हंगामात रासायनिक खतांची...
ज्येष्ठ विचारवंत डॉ. एन. डी. पाटील...कोल्हापूर ः ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत, माजी...
सोयापेंडीच्या मागणीमुळे सोयाबीनचे दर...पुणे ः बाजारात सध्या सोयाबीन दर एका भावपातळीवर...
कांदाच बनला टुमदार बंगल्याची ओळख नाशिक ः  या नभाने या भुईला दान...
कापूस आयात शुल्क  रद्दच्या विषयावरील...जळगाव ः कापसावरील आयात शुल्क रद्द करण्यासह वायदा...