agriculture news in Marathi farmers growth will be achieve when technology reached them Maharashtra | Page 2 ||| Agrowon

संशोधन शेतात पोचले तरच शेतकऱ्यांचा विकास: राज्यपाल कोश्यारी

टीम अॅग्रोवन
सोमवार, 17 फेब्रुवारी 2020

दापोली, जि. रत्नागिरी ः विद्यापीठांमध्ये चांगल्या दर्जाची सुविधा निर्माण झाल्यामुळे प्रयोगशाळेत नवनवीन शोध लावले जातात. जे संशोधन होत आहे, त्याचा प्रत्यक्ष फायदा शेतकऱ्यांना उत्पन्नवाढीसाठी व्हावा यासाठी ते संशोधन शेतापर्यंत पोचविण्याची गरज आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले. 

दापोली, जि. रत्नागिरी ः विद्यापीठांमध्ये चांगल्या दर्जाची सुविधा निर्माण झाल्यामुळे प्रयोगशाळेत नवनवीन शोध लावले जातात. जे संशोधन होत आहे, त्याचा प्रत्यक्ष फायदा शेतकऱ्यांना उत्पन्नवाढीसाठी व्हावा यासाठी ते संशोधन शेतापर्यंत पोचविण्याची गरज आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले. 

डॉ. बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठाचा ३८ वा पदवीदान सोहळा रविवारी (ता. १६) पार पडला. या वेळी राज्यपाल बोलत होते. या वेळी कृषिमंत्री श्री. भुसे, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत, कुलगुरू डॉ. संजय सावंत, शिक्षण संचालक डॉ. सतीश नारखेडे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. संजय भावे, संशोधन संचालक डॉ. पराग हळदणकर, कुलसचिव डॉ. प्रमोद सावंत आदी उपस्थित होते.  

या वेळी राज्यपाल कोश्यारी म्हणाले, किकी भारत स्वतंत्र झाला तेव्हा सर्वसाधारण विकास दरात कृषी क्षेत्राचा वाटा ५० टक्के होता. तो आता घटून १४ टक्क्यांवर आला आहे. महाराष्ट्र राज्याची निर्मिती १९६० साली झाली. त्या वेळी राज्याच्या सकल उत्पन्नात कृषी क्षेत्राचा असणारा २८ टक्के वाटा घटून तो १२ टक्क्यांवर आला आहे.  याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी संशोधनाची मदतच होणार आहे. यात विद्यापीठाने आपला वाटा उचलावा. रत्नागिरीतील भूमी मला माझ्या उत्तरांचलची आठवण देणारी आहे. येथील विद्यार्थ्यांनी देशातील सर्वोत्तम रत्न म्हणून नाव उज्ज्वल करण्याची कामगिरी करावी. कृषी विद्यापीठ मराठी राज्याचे कृषी विद्यापीठ आहे. त्यामुळे यापुढील काळात विद्यापीठाने पदवीदान समारंभ मराठी भाषेत घ्यावा.
या पदवीदान समारंभात ६३ विद्यार्थ्यांना डॉक्टरेट तसेच ३१७ विद्यार्थ्यांना पदव्युत्तर पदवी आणि ३१४४ पदवीधारकांना पदवी प्रदान करण्यात आली.

या प्रसंगी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय सावंत यांनी गेल्या काही वर्षात झालेल्या प्रगतीचा आलेख या प्रसंगी मांडला. मत्स्य शिक्षण महाविद्यालयाच्या काही पदव्यांचा प्रश्न निर्माण झाला. याबाबत दुरुस्ती केल्याबद्दल सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत तसेच विद्यापीठाचा दर्जा सुधारणेबाबत नवे कृषिमंत्री तानाजी भुसे यांनी केलेल्या प्रयत्नांबद्दल आभार मानले. विद्यापीठाने इंडियन कौन्सिल ऑफ अग्रिकल्चर रिसर्चमधील साठ विद्यापीठांमध्ये आपला दर्जा उन्नत आत्ता बत्तिसाव्या संघातले आहे. मागील वर्षी विद्यापीठ ५९ व्या क्रमांकावर होते. राज्यात विद्यापीठाचा राहुरी कृषी विद्यापीठानंतर दुसरा क्रमांक लागतो, असे कुलगुरू यांनी सांगितले.


इतर अॅग्रो विशेष
भारत - इस्राईल मैत्रीतून उजळणार...भारत आणि इस्राईल देशातील पंतप्रधानांच्या भेटीतून...
राज्य अंधारात जाण्याचा धोकाः डॉ. नितीन...मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (ता.५...
चारशे वर्षात पहिल्यांदाच वारकऱ्यांविना...सोलापूर ः सुमारे ४०० वर्षाची परंपरा असलेल्या...
शेतकरी कंपन्यांचाही ‘ई-नाम’मध्ये समावेश नवी दिल्ली: केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर...
राज्यात उन्हाचा चटका वाढला पुणे: एप्रिल महिना सुरू होताच राज्यात उन्हाच्या...
पिंपळगाव बसवंत बाजार समितीत ३० हजार...नाशिक: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मजुरटंचाई...
कोल्हापुरात तीस हजार ऊस तोडणी कामगार...कोल्हापूर: जिल्ह्यातील सुमारे तीस हजार ऊस तोडणी...
औरंगाबादमध्ये २९ टन मालाची थेट विक्रीकोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर औरंगाबाद शहरात 'शेतकरी...
कोरोनामुळे कृषी पर्यटन व्यवसाय अडचणीत सातारा : कोरोनाच्या संसर्गामुळे दिवसेंदिवस बळी...
संकटावेळी तरी पंतप्रधानांनी गंभीर...मुंबई : देशात कोरोना विषाणूने थैमान घातले असून...
‘कोरोना विरोधात जाणिवेसाठी रविवारी...पुणे : ‘‘कोरोना विरोधात उभारलेल्या लढ्याची...
कोरोनाच्या निदानासाठीच्या ‘मायलॅब'ला...पुणे ः देशातील कोरोनाच्या प्रत्येक रुग्णाच्या...
कांदा विक्रीसाठी ‘पणन’चे प्रयत्नपुणे: कोरोना लॉकडाऊनमध्ये शेतमालाची पुरवठा साखळी...
दूध संकलनास टाळाटाळ करणाऱ्यांवर कारवाई...वर्धा ः  दूध संकलनास टाळाटाळ करणाऱ्या दूध...
पालघर, डहाणू, तलासरी तालुक्यात भूकंपाचे...मुंबई: पालघर जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांपासून...
मोसंबी मागणीअभावी बागेतचऔरंगाबाद: परिपक्व झालेल्या मोसंबीच्या मृग...
लॉकडाऊनमुळे ‘निविष्टा’ कंपन्यांची उधारी...पुणे: लॉकडाऊनमुळे राज्यातील खते, बियाणे व कीडनाशक...
तीन दिवसांत एक हजार वीस टन द्राक्ष ...पुणे ः कोरोना विषाणूमुळे राज्यातील द्राक्ष...
विदर्भ, मराठवाड्यात पुर्वमोसमी पावसाचा...पुणे : राज्यात उन्हाचा चटका चांगलाच वाढल्याने...