Agriculture news in Marathi Farmer's Guidance Room started in 500 offices in the state | Agrowon

राज्यातील ५०० कार्यालयांत शेतकरी मार्गदर्शक कक्ष सुरू

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 24 जानेवारी 2020

मुंबई : शेतकरी बांधवांना अडचणी मांडण्यासाठी, विविध योजनांची माहिती मिळावी याकरिता हक्काचे व्यासपीठ मिळावे यासाठी तालुका, जिल्हा पातळीवरील कृषी कार्यालयात शेतकरी सन्मान व मार्गदर्शन कक्ष सुरू करण्यात आला आहे. या मोहिमेचा प्रारंभ रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथून कृषिमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते करण्यात आला. राज्यभर सुमारे ५०० कार्यालयांमध्ये अशी केंद्रे सुरू करण्यात आल्याचे कृषिमंत्र्यांनी येथे सांगितले.

मुंबई : शेतकरी बांधवांना अडचणी मांडण्यासाठी, विविध योजनांची माहिती मिळावी याकरिता हक्काचे व्यासपीठ मिळावे यासाठी तालुका, जिल्हा पातळीवरील कृषी कार्यालयात शेतकरी सन्मान व मार्गदर्शन कक्ष सुरू करण्यात आला आहे. या मोहिमेचा प्रारंभ रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथून कृषिमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते करण्यात आला. राज्यभर सुमारे ५०० कार्यालयांमध्ये अशी केंद्रे सुरू करण्यात आल्याचे कृषिमंत्र्यांनी येथे सांगितले.

कृषिमंत्र्यांनी शेतकरी सन्मान व मार्गदर्शन कक्ष सुरू करणे तसेच तालुका स्तरावर शेतकरी समन्वय समिती स्थापन करण्याचा निर्णय बुधवारी (ता. २२) जाहीर केला होता. त्याची अंमलबजावणी करीत राज्यभर अशी मार्गदर्शक केंद्रे सुरू करण्यासाठी कृषी विभाग सज्ज झाला असल्याचे कृषिमंत्री श्री. भुसे यांनी सांगितले. यासंदर्भात विभागामार्फत शासन निर्णयदेखील जाहीर करण्यात आला असून, त्यामध्ये मार्गदर्शन कक्ष व समितीबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. 

शेतमालाची उत्पादकता व उत्पन्नात सातत्य ठेवण्यासाठी शासनाच्या शेतकऱ्यांसाठी ज्या योजना राबविल्या जातात त्यांच्या अंमलबजावणीमध्ये समन्वय साधण्याकरिता तालुकास्तरीय समिती महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल, असे श्री. भुसे यांनी सांगितले.

जिल्हा कार्यालयांमध्ये सुरू करण्यात येणाऱ्या शेतकरी सन्मान व मार्गदर्शक कक्षांमध्ये शेतकऱ्यांना सन्मानपूर्वक वागणूक द्यावी, त्यांचे म्हणणे समजून घ्यावे, त्यावर योग्य ते मार्गदर्शन करत शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या योजनांबाबतदेखील मार्गदर्शन करावे, असे आवाहन कृषिमंत्र्यांनी केले.


इतर अॅग्रो विशेष
जळगाव ः कापसाच्या खेडा खरेदीला कमी...जळगाव ः कापसाची खेडा खरेदी मागील आठवड्यात...
इंडोनेशियात कच्च्या साखरेची जादा...कोल्हापूर : भारताच्या दृष्टीने साखर निर्यातीसाठी...
चांगदेव यात्रेला प्रारंभ; दिंड्या दाखलचांगदेव, जि. जळगाव ः सिद्धेश्वर योगिराज चांगदेव...
सर्व्हर डाउनच्या गोंधळामुळे द्राक्ष...नाशिक : केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क...
विदर्भात पावसाला पोषक हवामान पुणे: राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात वाढ...
चारशे अधिकाऱ्यांच्या कृषी विभागात...पुणे ः कृषी विभागात गेल्या दोन ते तीन दिवसांत ३९९...
परराज्यापर्यंत विस्तारला ऊसरोपे...मुखई (जि. पुणे) येथील अभिजित धुमाळ या तरुण...
केळी ‘रायपनिंग चेंबर’चा यशस्वी केला...कोल्हापूर जिल्ह्यातील ऊसबहुल क्षेत्रात केळी...
शेतकऱ्यांवर अन्यायकारक करार नकोचअमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आपल्या...
ऐच्छिक पीकविम्याचे इंगितकें द्र सरकारने पीकविमा योजना शेतकऱ्यांसाठी...
नैसर्गिक नव्हे, सेंद्रिय शेतीची धरा काससुभाष पाळेकरांच्या पद्धतीनुसार बाह्य निविष्ठा...
जलयुक्त फेल, पुढे काय?उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती...
ऊस उत्पादकता २५० टनांपर्यंत न्यावीच...पुणे : देशातील ऊस उत्पादकता एकरी शंभर टन...
कर्जमाफीसाठी आकस्मिकता निधीतून दहा हजार...मुंबई : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी राज्य सरकारने...
पीकविमा हप्त्यापोटी पाचशे कोटी वितरणास...मुंबई ः पंतप्रधान पीकविमा योजना खरीप हंगाम २०१९...
मोसंबी क्लटरमध्ये शाश्‍वत उत्पादन,...औरंगाबाद : मोसंबी उत्पादकांसाठी उत्पन्नाची...
डाळिंब उत्पादनात ३० टक्के घटसांगली ः सुरुवातीला दुष्काळी परिस्थिती, त्यानंतर...
कोरोनाच्या अफवेमुळे पोल्ट्रीचे १५०...पुणे : कुक्कुट पक्षी व कुक्कुट उत्पादने यांचा...
प्रयोगशील शेतीच्या आधारे चिंचवलीने...पारंपरिक भातशेतीत बदल करून ऊसशेती व त्यास...
कहर ‘कोरोना’चाकोरोना विषाणूच्या वाढत्या उद्रेकाने जगभर दहशतीचे...