गुजरातमधील शेतकऱ्यांना जाचातून मुक्त करणार : राकेश टिकैत

गुजरात मधील शेतकऱ्यांना जाचातून मुक्त करण्यासाठी येथेही ट्रॅक्टर आंदोलन केले जाईल, वेळ प्रसंगी येथे सुद्धा बॅरिकेड्स तोडले जातील, असा इशारा भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी येथे दिला.
Farmers in Gujarat will be freed from persecution
Farmers in Gujarat will be freed from persecution

अहमदाबाद, गुजरात : गुजरात मधील शेतकऱ्यांना जाचातून मुक्त करण्यासाठी येथेही ट्रॅक्टर आंदोलन केले जाईल, वेळ प्रसंगी येथे सुद्धा बॅरिकेड्स तोडले जातील, असा इशारा भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी येथे दिला.

दिल्लीच्या गाझीपूर सीमेवर श्री. टिकैत यांच्या नेतृत्वाखाली कृषी कायद्यांना विरोधाकरिता आंदोलन केले जात आहे. श्री. टिकैत हे गुजरातच्या दोन दिवसीय दौऱ्यावर येथे आल्यानंतर साबरमती आश्रमाला भेट दिली. यानंतर पत्रकारांशी श्री. टिकैत बोलत होते. टिकैत म्हणाले, ‘‘गुजरातमधील शेतकरी दु:खी आणि अन्यायग्रस्त आहेत. या शेतकऱ्यांसाठी देशातील शेतकरी गुजरातमध्ये ट्रॅक्टर आंदोलन करतील. गांधीनगरला घेराव करण्याचा आणि रस्ते बंद करण्याची वेळ आली आहे. वेळ प्रसंगी येथे सुद्धा बॅरिकेड्स तोडले जातील.’’

श्री. टिकैत म्हणाले, ‘‘गुजरातमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर आंदोलन होत नसल्यामुळे त्यांना अन्याय सहन करून जगावे लागत आहे. न्यायालयांकडून सुद्धा पाठबळ मिळत नाही. येथील शेतकऱ्यांना आम्ही आनंदी आहोत, आम्हाला नफा मिळतो, असे बळेच सांगण्यास भाग पाडले जात आहे. जर खरंच गुजरातमधील शेतकरी आनंदी आणि फायद्यात असतील तर आम्हालाही असे कोणते तंत्रज्ञान आहे, ते दिले जावे.’’

बानासकंटा येथील शेतकरी तीन रुपये किलोने बटाटे विकत आहेत. बटाट्याचे हे दर त्यांना आनंदी ठेवण्यास उपयुक्त आहेत का? आम्ही येथे शेतकऱ्यांच्या मनातून भीती काढून टाकण्यासाठी आलो आहोत. आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करू, असे श्री. टिकैत म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com