agriculture news in marathi Farmers 'half-naked' for crop insurance refunds | Agrowon

पीकविमा परताव्यासाठी शेतकरी ‘अर्धनग्न’

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 10 जून 2021

गंगापूर, जि. औरंगाबाद : खरीप हंगाम २०२०-२१ मधील संपूर्ण पिके उध्वस्त होऊनही गंगापूर, खुलताबाद तालुक्यातील शेतकऱ्यांना पिकांचा विमा मंजूर झाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी गंगापूर तालुका कृषी अधिकारी कार्यालयासमोर मंगळवारी(ता.८) अर्धनग्न आंदोलन केले.

गंगापूर, जि. औरंगाबाद : खरीप हंगाम २०२०-२१ मधील संपूर्ण पिके उध्वस्त होऊनही गंगापूर, खुलताबाद तालुक्यातील शेतकऱ्यांना पिकांचा विमा मंजूर झाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी गंगापूर तालुका कृषी अधिकारी कार्यालयासमोर मंगळवारी(ता.८) अर्धनग्न आंदोलन केले.

औरंगाबाद जिल्हा परिषदेचे माजी अर्थ व बांधकाम सभापती संतोष जगन्नाथ पाटील जाधव यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. या संदर्भात कृषिमंत्र्यांना निवेदन पाठवून न्याय न मिळाल्यास मंगळवारी (ता. ८) गंगापूर कृषी अधिकारी कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा देण्यात आला होता.

निवेदनानुसार, २०२०-२१ या वर्षात संपूर्ण जिल्ह्यासह गंगापूर, खुलताबाद तालुक्यात अतिवृष्टी व सततच्या पावसाने शेतकऱ्यांच्या कपाशी, मका, सोयाबीन, बाजरी, मूग, भुईमूग, तूर या पिकांचे नुकसान झाले. ९ नोव्हेंबर २०२० च्या शासन निर्णयाने अतिवृष्टी व पुरामुळे बाधित शेतकरी, नागरिकांना मदत देण्याचा निर्णय घेतला. जिल्हाधिकाऱ्यांनी बाधित शेतकऱ्यांना २७ कोटी २८ लाख रुपये  वाटप केले. 

 सिल्लोड तालुक्यात चौकशी सुरू

औरंगाबाद येथे काही दिवसांपूर्वी कृषिमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत खरीप आढावा बैठक झाली होती. त्यात पीकविमा परताव्याप्रश्नी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी प्रश्न उपस्थित केले होते. त्या वेळी या प्रकरणी चौकशीचे आश्वासन भुसे यांनी दिले होते. त्यानुसार चौकशीसाठी अधिकारी बुधवारी (ता.९) सिल्लोड तालुक्यात दाखल झाले. या पथकाने निवड केलेल्या गावांना भेटी देऊन पीक कापणी प्रयोगांविषयी चौकशी सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली.


इतर बातम्या
फळपीक विमा योजनेत त्रुटी, गोंधळसोलापूर ः पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा...
पूर्व विदर्भात मुसळधार शक्य पुणे : कोकण ते केरळ दरम्यान असलेले कमी दाबाचे...
पूर्वहंगामी द्राक्षाचे विमा कवच चारपट...नाशिक : गेल्या काही वर्षांत नैसर्गिक आपत्तीमुळे...
‘एचटीबीटी’ बियाण्याची पाळेमुळे...पुणे ः देशात अवैध तणनाशक सहनशील ‘एचटीबीटी’ कापूस...
डाळिंब विमा अर्जासाठी १४ जुलैपर्यंत...सांगली : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत पुनर्रचित...
उसासाठी यंदाची ‘एफआरपी’ जाहीर कराकोल्हापूर : यंदाच्या गळीत हंगामातील उसाची एफआरपी...
कांदा व्यापाऱ्याकडून शेतकऱ्याला मारहाण नाशिक : जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची...
शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड  ...नाशिक : राज्यात खरीप हंगामास सुरुवात झाली असून,...
अमरावती जिल्हा परिषदेची सभा...अमरावती : पीकविमा भरपाई, समृद्धी महामार्गाच्या...
संत्रा आयात शुल्क कपातीसाठी प्रयत्न करा...नागपूर : विदर्भाचे मुख्य फळपीक असलेल्या...
दूधदरप्रश्‍नी वैजापूर बाजार समितीच्या...औरंगाबाद : दूध उत्पादकांच्या मागण्याच्या...
खेडमध्ये बटाटा लागवडीस वेगचास, जि. पुणे : खेड तालुक्यात बटाटा लागवडीस...
स्थानिक काजूची आवक आजरा तालुक्यात...आजरा, जि. कोल्हापूर : आजरा बाजारपेठेत स्थानिक...
लाभार्थी शेतकऱ्यांचे अनुदान तातडीने अदा...बुलडाणा : शासन शेतकऱ्यांचा जीवनस्तर उंचविण्यासाठी...
पुणे बाजार समितीची ‘प्रादेशिक’ अधिसूचना...पुणे : पुणे बाजार समितीची निवडणूक टाळून सत्ता एका...
कांद्याची २५ दिवसांत विक्रमी अकरा लाख...नाशिक : जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार...
खानदेशात युरियाप्रश्नी प्रशासनाची धावपळजळगाव :  खानदेशात खरिपाला सुरवात होत असतानाच...
‘डीएससी’त अडथळे  आणल्यास कारवाई करापुणे ः राज्यातील सरपंच व ग्रामसेवकांचे संगणकीय...
खानदेशात बाजार समित्यांचे कामकाज पूर्ववतजळगाव :  खानदेशात बाजार समित्यांचे कामकाज...
विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ५, ६ जुलै... मुंबई : कोरोना संकटाची सध्याची स्थिती पाहता आणि...