जगात सर्वाधिक दूध उत्पादनाची टिमकी वाजविणाऱ्या आपल्या देशात मुळातच दुधाचे सेवन फारच कमी आहे.
अॅग्रो विशेष
दोन वर्षांत शेतीला ३१ हजार कोटींचा फटका
मागच्या वर्षी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना निकषांनुसार त्यांना केंद्र व राज्य सरकारकडून सात हजार कोटी रुपयांची मदत मिळाली. यंदा पूर व अतिवृष्टीमुळे ५०१ कोटींचे नुकसान झाल्याचा अहवाल शासनाला पाठविण्यात आला असून केंद्राकडे निधीची मागणी केली आहे. वास्तविक पाहता दुष्काळ, पूर व अतिवृष्टीमुळे चौपट नुकसान झाले असतानाही निकषांनुसार मदत दिली जात आहे.
- हरी बाबटीवाले, उपसंचालक, कृषी
सोलापूर : मागच्या वर्षीचा दुष्काळ तर यावर्षीची अतिवृष्टी व पुरामुळे राज्यभरातील ३९ लाख शेतकऱ्यांचे २७ लाख हेक्टरवरील पिकांचे ३० हजार ७९० कोटींचे नुकसान झाले. मात्र, शासनाच्या निकषांनुसार शेतकऱ्यांना मागील वर्षी सात हजार १०० कोटींची मदत मिळाली तर यंदा अतिवृष्टी व पुरामुळे दोन हजार कोटींहून अधिक नुकसान होऊनही ५०१ कोटींचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे.
दुष्काळ, नापिकी, पूर, अतिवृष्टी, अवकाळी या नैसर्गिक आपत्ती तर खासगी सावकार अन् बॅंकांच्या कर्जाचा डोक्यावरील डोंगर आणि त्यामुळे कुटुंबाच्या उदरनिर्वाहासह मुलांचे शिक्षण व विवाहाची चिंता त्यातून मार्ग निघत नसल्याने मागील पाच वर्षांत राज्यात १५ हजार ६०० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या.
दरम्यान, नैसर्गिक आपत्तींमध्ये चारपट नुकसान होऊनही एकपट मदत मिळाल्याने त्यांच्यावर उसनवारी करावी लागली. आता मूग, उडीद, सोयाबीनच्या खरेदीसाठी शासनाने हमीभाव खरेदी केंद्रे सुरू केली मात्र, आतापर्यंत १०० शेतकऱ्यांनीही ऑनलाइन नोंदणी केलेली नाही. पेरणी करूनही पाण्याअभावी पीक उगवले नाही तर काही ठिकाणी पूर व अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाल्याने उत्पन्नात मोठी घट झाल्याचे चित्र आहे. आता या शेतकऱ्यांना पुरेशा मदतीची गरज असल्याचे दिसून येते.
प्रकार | २०१८- १९ | २०१९- २० |
बाधित क्षेत्र | १८.५९ लाख हेक्टर | ९.४३ लाख हेक्टर |
प्रत्यक्ष नुकसान | २८,६०० कोटी | २,१९० कोटी |
मदत | ७,१०० कोटी (मिळाली) | ५०१ कोटी (प्रस्तावीत) |