agriculture news in Marathi farmers has problems in crop insurance Maharashtra | Page 2 ||| Agrowon

मराठवाड्यात पीकविम्याबाबत शेतकऱ्यांसमोर अडचणींचे चक्रव्यूह 

टीम अॅग्रोवन
बुधवार, 28 जुलै 2021

पीकविमा उतरविण्याची सोय त्यासाठी जागर. मात्र नुकसान झाल्यावर अनंत अडचणींच चक्रव्यूह. विमा परताव्यावेळी कायद्यावर बोट, नेमके ते काय? याची ना माहिती, ना विमा परतावा मिळवून देण्यासाठी कुणाची मदत. 

औरंगाबाद : पीकविमा उतरविण्याची सोय त्यासाठी जागर. मात्र नुकसान झाल्यावर अनंत अडचणींच चक्रव्यूह. विमा परताव्यावेळी कायद्यावर बोट, नेमके ते काय? याची ना माहिती, ना विमा परतावा मिळवून देण्यासाठी कुणाची मदत. त्यामुळे ज्यांना कळतं त्यांचंच कधी कधी चांगभलं. माहिती नसणाऱ्यांना सामुहिक नुकसान झालं तरचं विमा परताव्याची आशा असं चित्र मराठवाड्यात पीकविमा बाबतीत आहे. 

नैसर्गिक आपत्ती सांगून येत नसते. त्यामुळे पिकांना विमा सरक्षण मिळणं आवश्‍यकच. विमा हप्ता भरण्यासाठीच्या सोयी वेगवेगळ्या भागात गावपातळीवर उपलब्ध असतात. त्यासाठी जुजबी माहिती देऊन कृषी विभागाकडून जागर केला जातो. परिणामस्वरूप मोठ्या प्रमाणात शेतकरी आपल्या पिकाचा विमा उतरवितात. परंतु नंतर नैसर्गिक आपत्ती ओढावल्यास विमा परतावा मिळण्यासाठीची इत्थंभूत माहितीच शेतकऱ्यांना मिळत नाही. पीकविमा का आवश्‍यक हे सांगणारेही त्या वेळी मूग गिळून गप बसतात. 

समोर आलेल्या बाबी 

  • सर्वच शेतकऱ्यांकडे उपलब्ध नसतात नुकसान कळविण्याच्या सुविधा 
  • हेल्पाइन सुविधा असून नसल्यासारखी, अनेकांना येतो उद्धटपणाचा अनुभव 
  • शेतकऱ्यांना माहित नाहीत विमा कंपन्यांचे कार्यालय 
  • दाव्यांबाबत मिळत नाही अपेक्षित सेवा 

कंपन्यांच्या कार्यालयाची स्थिती 

  • लातूर ः जिल्ह्यासाठी नियुक्‍त विमा कंपनीचे स्वतंत्र कार्यालय नाही. तात्पुरत्या स्वरूपात कंपनीचे प्रतिनिधी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत बसतात. 
  • उस्मानाबाद ः बजाज अलिआंझ जनरल इन्शुरन्स, पहिला मजला, जालान कॉम्प्लेक्‍स, काकडे प्लॉट संभाजी चौक, डीआयसी रोड 
  • जालना ः रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय 
  • औरंगाबाद ः एचडीएफसी अर्गो, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय शहानुरमीयॉ दर्गा चौक, 
  • बीड ः ॲग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया लिमिटेड, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय 
  • लातूर ः भारतीय कृषी विमा कंपनी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय मध्यवर्ती प्रशासकीय इमारत 

प्रतिक्रिया 
केवळ जुजबी माहिती मिळाल्यावरून विमा उतरविला जातो. त्याविषयी इत्थंभूत माहितीचा जागर कुणी करतंच नाही. शिवाय नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांकडे सुविधा नसने, उपलब्ध झाली तर नेट नसने, साइट न चालने, हेल्पलाइन मदत न करणे, केलीच तर उद्धटपणाचा अनुभव येणे, त्यामुळे वेळेत नुकसान न कळविणे शक्य होत नाही. 
- संजय मोरे पाटील, नळविहिरा, ता. जाफराबाद, जि. जालना. 

विमा कंपनीचं कार्यालय कुठे तेच माहिती नाही. कृषी विभागाकडून गावपातळीवर त्याची माहिती मिळत नाही. दाव्याबाबत सेवा मिळत नाही. वैयक्‍तिक नुकसान झालं तर भरपाई मिळत नाही, सामूहिक झालं तरच मिळते. 
- तानाजी वाडीकर, नागलगाव, ता. उदगीर जि. लातूर. 
.... 
विमा उतरवितो, परंतु नुकसान झालं तर विमा परतावा कसा मिळवावा हेच माहिती नाही. कृषीची यंत्रणा काही सांगत नाही. कार्यालय कुठे ते पण माहिती नाही. आठवडाभरापूर्वी जास्त पाउस झाल्याने विमा कंपनीच्या हेल्पलाइनवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला तर रिंग जाऊनही फोन उचलला नाही. 
- सदाशिव गिते, देवगाव, ता. पैठण, जि. औरंगाबाद 

मागच्या वर्षी विमा उतरविला, नुकसान होऊनही परतावा मिळाला नाही. यंदाही चाळीस एकरचा विमा उतरविलाय. हेल्पलाइन बिझी दाखविण्याचा माझा अनुभव आहे. परतावा मिळण्यासाठी काय कराव याची माहिती कुणीच देत नाही. शिवाय विमा कंपन्यांचे कार्यालय कुठे याची माहिती नाही. 
- पदमसिंग राजपूत, ब्राह्मणी गराडा, ता. कन्नड, जि. औरंगाबाद 


इतर बातम्या
एकरूख सिंचन योजनेसाठी ५० कोटी रुपये...सोलापूर ः ‘‘अक्कलकोट, दक्षिण सोलापूरसाठी...
‘नांदगावात अतिवृष्टीनं सारं नेलं’नाशिक : नांदगाव तालुका अवर्षणप्रवण असल्याने इथली...
नाशिक जिल्ह्यात नऊ केंद्रावर मका,...येवला : हमीभावाने मका,ज्वारी, बाजरी खरेदीसाठी...
प्रशासक मंडळ हटविल्यास दूध संकलन बंद...सोलापूर ः सोलापूर जिल्हा दूध संघाचे विद्यमान...
‘मामा’ तलाव रुतले गाळात साकोली, जि. भंडारा : भंडारा, गोंदिया जिल्ह्यांतील...
राज्यात उद्यापासून पावसाची उघडीप शक्यपुणे : राज्यात सुरू असलेला पाऊस उद्यापासून (ता....
कीडनाशके साठ्यांच्या होणार संगणकीय नोंदीपुणे ः देशातील कीडनाशके विक्री करणाऱ्या दुकानात...
ई-पीक पाहणी ॲपमध्ये आंतरपीक नोंदणीला ‘...पथ्रोट, जि. अमरावती : शासनाच्या ई-पीक पाहणी...
मानवाधिकार आयोगाची शेतकरी आंदोलनावरून...नवी दिल्ली ः राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने (...
ई-पीक पाहणीबाबत काही भागांतून तक्रारीपुणे ः आपल्या शेतातील पिकाची नोंद स्वतः...
पालघर, नाशिकमध्ये मुसळधारपुणे : पावसाला पोषक हवामान असल्याने राज्यात अनेक...
काजू, आंबा उत्पादक शेतकऱ्यांकडून...सिंधुदुर्गनगरी : आंबा, काजू बागायतदारांना...
कोयना धरण क्षेत्रात  पावसाचा जोर कायम सातारा : कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा...
परभणीत ‘रोहयो’तून ८८.१५ हेक्टरवर फळबाग...परभणी ः ‘‘जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय...
परभणी जिल्ह्यात सोयाबीन, कपाशी, तुरीचे...परभणी ः जिल्ह्यात यंदा मंगळवार (ता.१४) पर्यंत ९००...
रत्नागिरीत पावसाचा जोर कायम रत्नागिरी : ऐन गणेशोत्सवात पावसाचा जोर कायम आहे....
सांगलीत पशुधनाचे लसीकरण रखडले सांगली : जिल्ह्यात पशुधनाची संख्या ११ लाख ०३ हजार...
जळगाव जिल्ह्यात दीड लाख शेतकरीच पीकविमा...जळगाव ः दर वर्षी ऑगस्ट, सप्टेंबरअखेर शेतकरी...
पशुधनाच्या आरोग्यविषयक  सुविधा तत्काळ...नागपूर : पशू वैद्यकीय चिकित्सालयीन संकुलामुळे...
वीजबील थकबाकीची वसुली  न झाल्यास राज्य...मुंबई : ऊर्जामंत्री नितिन राऊत यांनी वीजबिलाची...