agriculture news in Marathi farmers have 30 percent cotton in Maharashtra Maharashtra | Agrowon

मराठवाड्यात ३० टक्के कापूस शिल्लक 

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 17 एप्रिल 2020

आमच्या गावात किमान २ हजार क्विंटल कापूस विक्रीविना पडून असेल. माझ्या एकट्याकडेच १४५ क्विंटल कापूस विकणे बाकी आहे. दरवर्षी पाडव्यानंतर कापूस विकायचो त लॉकडाऊन झाल. तसाही वेचणीच्या दरानं न परवडलेला कापूस आता विक्रीच्या संकटांत सापडलाय. सरकारनं निदान हा हमी दरानं विकला जाईल अशी सोय करावी. 
- मुंजाभाऊ कदम, कापूस उत्पादक, कोथरूळ, जि. बीड. 

औरंगाबाद: मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, या कापूस बहुल जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा जवळपास २५ ते ३० टक्के कापूस विक्रीविना पडून आहे. लॉकडाऊन नंतर कापसाला खरेदीदार मिळेनासा झाला आहे.आधीच उत्पादन खर्चाला न परवडलेला कापूस विकला जाईल की नाही असा प्रश्न कापूस उत्पादकांना पडला आहे. 

मराठवाड्यात जवळपास १४ लाख हेक्टरवर कापसाची लागवड झाली होती. यामध्ये सर्वाधिक जवळपास सव्वाचार लाख हेक्टर औरंगाबाद जिल्ह्यात, पावणेतीन लाख हेक्‍टर जालना जिल्ह्यात तर जवळपास पावणेचार लाख हेक्टर बीड जिल्ह्यात होते. सुरुवातीला पाऊस नसल्याने संकटात सापडलेले कापसाचे पीक ऑक्टोबरच्या मध्यानंतर सुरू झालेल्या अवेळी व अवकाळी पावसाच्या संकटात सापडले.

प्रतिकूल परिस्थितीमुळे कापसाच्या उत्पादनात नेहमीच्या तुलनेत मोठी घट झाली. कोरडवाहू कापूस पिकात ती अधिक होती. त्यानंतर कापूस वेचण्याच्या प्रचंड वाढलेल्या दराने कापूस उत्पादकांना अडचणीत आणल. सुरुवातीला ८ ते १० रुपये प्रतिकिलो असणारे दर शेवटी १५ रुपये प्रतिकिलोपर्यंत गेल्याचे कापूस उत्पादक सांगतात. 

उत्पादनात घट झाली असताना विक्री प्रक्रिया सुरू झाली तर कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊन ने कापसाच्या हमी दराने खरेदीला ब्रेक लावला. सामान्यतः बहुतांश जिनिंगमध्ये काम करणारे मजूर हे मध्यप्रदेश वा आंध्र प्रदेश मधील होते. हे सर्वच मजूर निघून गेल्याने त्याचा खरेदी प्रक्रियेवर परिणाम झाला आहे.

कापूस पणन महासंघाच्या औरंगाबाद विभागांतर्गत एका जिनिंग मधील जवळपास एक हजार क्विंटल कापसावर प्रक्रिया होणे बाकी आहे. याशिवाय जवळपास २१हजार कापूस गाठी जिनिंग मधून गोडाऊन वर हालविण्याची प्रक्रियाही नियमांच्या अधीन असल्याने अत्यंत संथगतीने सुरू आहे.

खासगीत कापूस खरेदी करणारे पाच हजाराच्या आतच प्रतिक्विंटल दराने कापूस मागत असल्याचे शेतकरी सांगतात. त्यामुळे आधीच उत्पादकतेत फटका देणारा कापूस किमान हमी दराने विकला जातो की नाही तशी व्यवस्था शासन तत्काळ सुरु करते की नाही असा प्रश्न कापूस उत्पादकांना पडला आहे. 

प्रतिक्रिया
यंदा गतवर्षीच्या तुलनेत १५ क्विंटल कापूस कमी झाला. २० क्विंटल खासगीत ४७०० रुपये प्रतिक्विंटल ने विकला. तीस क्विंटल घरात पडून आहे. होळीपासून हमी दर खरेदी थांबली त्यामुळे कापूस विकला जातो की नाही असा प्रश्न पडलाय. 
- रवींद्र जाधव, कापूस उत्पादक, निंबायती, जि, औरंगाबाद 

लॉकडाऊन झाल्यापासून कुणी कापूस घ्यायला फिरकेना. माझा १५ क्विंटल तर माझ्या भावाचाही बऱ्यापैकी कापूस घरात विक्री अभावी पडून आहे. आमच्या गावात किमान २० टक्के कापूस विक्री शिल्लक असेल. 
- तुकाराम धानूरे, कापूस उत्पादक, बोधलापुरी, जि. जालना. 

 


इतर अॅग्रो विशेष
मराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधारपुणे : राज्यातील बहुतांशी भागातील पावसाचे...
राज्यात हलक्या पावसाची शक्यतापुणे : काही दिवस राज्यात मुसळधार पाऊस...
एक हजार प्राध्यापकांनी वयाची साठी...पुणे: राज्यातील कृषी विद्यापीठांमधील...
सूक्ष्म अन्न उद्योगांना मिळणार आता दहा...पुणे: राज्यात लवकरच पंतप्रधान सूक्ष्म अन्न उद्योग...
कृषी, कामगार विधेयकांची राज्यात...पुणे : केंद्र सरकारने घाईघाईत मंजूर करुन घेतलेली...
शेतकरी आंदोलनाचे सात राज्यांत पडसादचंडीगड ः केंद्र सरकारच्या कृषी विधेयकांना विरोध...
सोयाबीन बियाणे प्लॉटना फटकाऔरंगाबाद: सध्याचे पावसाचे प्रमाण व त्यामुळे...
केळी विमा निकषांबाबत उत्सुकताजळगाव ः राज्य सरकारच्या चुकांमुळे हवामानावर...
अडीच हजार हेक्टर भातशेती सततच्या...सिंधुदुर्ग ः हळवी आणि भिजवणीची लागवड केलेली...
कृषी विधेयकांविरोधात राज्यात शेतकरी...पुणेः केंद्र सरकारने नुकतेच मंजूर केलेल्या कृषी...
सेंद्रिय व्यवस्थापनाच्या बळावर रोखली...सर्वाधिक संत्रा लागवडीखाली क्षेत्र असल्यामुळे ‘...
ऑनलाइन शिक्षणात बरेच ऑफलाइन! पाऊस आणि शाळा, महाविद्यालयं सुरू होण्याचा काळ...
आता शेतमाल खरेदीचे बोला!ऑगस्ट २०२० च्या पहिल्या आठवड्यात देशभरातील खरीप...
उद्योजकांच्या कर्जमाफीवर सर्वांचीच...भारतात शेती आणि शेतकरी याला खूप महत्त्व आहे....
खरीप धान्योत्पादन १४४ दशलक्ष टनांवर नवी दिल्ली ः कोरोना पुणे मुंबई बातमी ...
ऊसतोड कामगार मंडळाची रचना, धोरण लवकरचः...मुंबई : ऊसतोड कामगारांचे विविध प्रश्न व समस्यांवर...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात हलक्या...पुणे ः राज्यातील पावसाचा जोर कमी झाला आहे. पुढील...
‘पोकरा’मधून फळबाग, वनशेती, बांबू, तुती...औरंगाबाद: नानाजी देशमुख कृषी संजीवनी...
पावसाळ्यापूर्वीच कापूस खरेदीचे नियोजन अमरावती : गेल्या हंगामात पावसामुळे कापसाचे नुकसान...
सुधारित शेती, पूरक व्यवसायाचा ‘निवजे...निवजे (ता.कुडाळ,जि.सिंधुदुर्ग) गावकऱ्यांनी शेती...