अकोल्यात ४० टक्क्यांवर कापूस विक्रीविना शिल्लक 

यावर्षात कापूस उत्पादक सुरुवातीपासूनच अडचणीत आहे. पेरणीनंतर पावसात मोठा खंड पडला. त्यानंतर ऑक्टोबरमध्ये वेचणीच्या सुरुवातीला सलग पाऊस झाला. बोंड काळवंडले. यावर्षात कापसाचा दर्जा घसरला. शिवाय उत्पादन ३० ते ४० टक्के कमी झाले. आता विक्रीसाठीही अडचणी येत आहेत. मागीलवर्षी मी ६२०० रुपये प्रतिक्विंटल दराने विक्री केली. यंदा पाच हजारांनी हा कापूस जाईल याची शाश्वती दिसत नाही. शासनाने तातडीने खरेदी सुरु करीत शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. -गणेश नानोटे, कापूस उत्पादक, निंभारा जि. अकोला.
cotton
cotton

अकोला ः पणन महासंघ तसेच सीसीआयची कापूस खरेदी मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून या भागात बंद झालेली आहे. पुढील आठवड्यात खरेदी सुरु होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. आजही शेतकऱ्यांकडे हजारो क्विंटल कापूस पडून असून विक्रीचे सर्वच मार्ग सध्या बंद झालेले आहेत. आतापर्यंत सीसीआय, कापूस पणन महासंघ असे मिळून आठ लाख क्विंटलवर खरेदी झालेली आहे. जेमतेम एवढाच कापूस अद्यापही विक्री व्हायचा असल्याचे सांगितले जाते.  या भागातील कापूस प्रामुख्याने मे महिन्यापर्यंत विक्री होत असतो. यावर्षी परतीच्या पावसामुळे कापसाचा हंगाम लांबत गेला. जानेवारी -फेब्रूवारी पर्यंत कापूस वेचणी चाचली आहे. आता हंगाम संपूर्णतः आटोपली. दरम्यानच्या काळात सुरु झालेली पणन व सीसीआयच्या कापूस खरेदी केंद्रावर खरेदी सुरु होती. कोरोनामुळे २१ मार्चपासून खरेदी बंद झालेली आहे. आता नव्याने खरेदी २० एप्रिलनंतर सुरु होईल, अशी शक्यता वर्तविली जात आहे. मात्र, अद्याप कुणीही निश्चित माहिती द्यायला तयार नाही.  मॉन्सून पूर्व लागवडीचा हंगाम पुढील महिन्याच्या शेवटी सुरु होऊ घातला आहे. यामुळे शेतकरी मशागतीच्या कामाला लागला. काहींनी शेताची मशागत करून ठेवलेली आहे. अशा स्थितीत आगामी हंगामासाठी शेतकऱ्यांना पैशांची गरज आहे. घरात पडून असलेला कापूस विक्रीसाठी सध्या कुठलाही पर्याय नाही. शासकीय खरेदीसह वाहतूक ठप्प असल्याने खेडा खरेदीही बंद आहे. त्यामुळे तातडीने कापूस खरेदीला मोकळीक देण्याची गरज शेतकरी व्यक्त करीत आहेत. 

ठळक बाबी 

  • अद्यापही लाखो क्विंटल कापूस शेतकऱ्यांकडे पडून 
  • शासकीय, खासगी खरेदी बंदमुळे अडचण 
  • खरेदी सुरु झाल्यावरही मोजमापाला किती दिवस लागतील याचा अंदाज नाही 
  • शासनाकडून खरेदीसाठी तातडीच्या उपाययोजना लागू करण्याची आवश्यकता 
  • प्रतिक्रिया  आमच्याकडे सुमारे तिनशे क्विंटल कापूस आहे. दरवर्षी आम्ही जूनमध्ये विक्री करीत असतो. यंदा भाववाढीची काहीही चिन्हे दिसत नाहीत. त्यामुळे आता सीसीआयची खरेदी सुरु होण्याची प्रतीक्षा करीत आहोत. आमच्या गावात हजारो क्विंटल कापूस अद्याप शेतकऱ्यांच्या घरात आहे.  - अनंत इंगळे, कापूस उत्पादक, चितलवाडी, जि. अकोला 

    आत्ताची परिस्थिती पाहता सरकारने सीसीआयची खरेदी चालू करावी. एका दिवसाला किती वाहनांची आवक पाहिजे त्या हिशोबाने शेतकऱ्यांना टोकन देऊन मोबाईलवर तारीख दिली जावी. नोंदणीसाठी मोबाईलवरून सुविधा दिली पाहिजे. अशी सुविधा केली तर गर्दी कमी होईल शिवाय सीसीआयला कापूस विकल्याने शेतकऱ्यांचे नुकसानही होणार नाही.  - अनुप साबळे, कापूस उत्पादक, तरोडा, जि. अकोला 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com