Agriculture news in Marathi, Farmers have to find questions in elections ... | Agrowon

निवडणुकीत शेतकरी प्रश्न शोधावे लागतात : गिरधर पाटील

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 18 ऑक्टोबर 2019

निवडणुकांतून शेतकरी सोडून सारे राजकीय घटक निवडणुकांचे लाभार्थी ठरत असले तरी, आजवर शेतकरी व निवडणुका यांतील समीकरण हे नेहमी राजकीय व्यवस्थेच्या फायद्याचेच ठरत आलेले दिसते. तसे पाहायला गेले तर आजवरच्या कुठल्याच निवडणुकीत शेतकरी कधीच निर्णायक राहिला नाही. शेतकरीच बऱ्याचदा सत्ताकारण व निवडणुकांशी जुळलेले असल्याचे समजले जात असल्याने, एक वेगळा मतदार म्हणूनही त्याचा कधी विचार झाला नाही. परंतु, काही शहरी तोंडवळा धारण केलेल्या पक्षांना सत्ताकारणात प्रवेश करण्यासाठी शहरी मतदारांची अलिबाबाची गुहा हाती लागल्याने पहिल्यांदा शहरी व ग्रामीण अशी मतदारांची विभागणी होत तशी रणनीतीही आखली जाऊ लागली.

निवडणुकांतून शेतकरी सोडून सारे राजकीय घटक निवडणुकांचे लाभार्थी ठरत असले तरी, आजवर शेतकरी व निवडणुका यांतील समीकरण हे नेहमी राजकीय व्यवस्थेच्या फायद्याचेच ठरत आलेले दिसते. तसे पाहायला गेले तर आजवरच्या कुठल्याच निवडणुकीत शेतकरी कधीच निर्णायक राहिला नाही. शेतकरीच बऱ्याचदा सत्ताकारण व निवडणुकांशी जुळलेले असल्याचे समजले जात असल्याने, एक वेगळा मतदार म्हणूनही त्याचा कधी विचार झाला नाही. परंतु, काही शहरी तोंडवळा धारण केलेल्या पक्षांना सत्ताकारणात प्रवेश करण्यासाठी शहरी मतदारांची अलिबाबाची गुहा हाती लागल्याने पहिल्यांदा शहरी व ग्रामीण अशी मतदारांची विभागणी होत तशी रणनीतीही आखली जाऊ लागली. गेली निवडणूक अनेक आर्थिक-अनार्थिक लोकानुनयी आश्वासने देत शेतकऱ्यांच्या आशांना पल्लवित करत जिंकली. निवडणूक जिंकणे वा हरणे हा लोकशाहीतील एक अपरिहार्य भाग समजला तरी ज्या कारणांनी निवडणूक जिंकली त्यांची किमान प्रामाणिक राहण्याची जबाबदारी मात्र हा पक्ष पाळू शकला नाही.

शेतीची दुरवस्था तशी कायम राहत दुष्काळ, नोटाबंदी, जीएसटी यांसारखी नवी संकटे अंगावर झेलत आत्महत्यांसारखी कमी न होणारी लक्षणे दर्शवू लागली. तशी अशा संकटांची या क्षेत्राला सवय नव्हती असे नाही, परंतु अपेक्षाभंगाचे व फसवणूक झाल्याचे एक नवीनच शल्य या क्षेत्राला जाणवू लागले आहे. त्यातून शहरी भागाला मिळणारे झुकते माप, बुलेट ट्रेन, मेट्रो, स्मार्ट सिटी, सातवा वेतन आयोग, अशा अनुत्पादक बाबींवर होणाऱ्या खर्चामुळेही जखमेवर मीठ चोळणारी ठरली. शेतीच्या जाहीर होणाऱ्या योजना वा मदती या प्रत्यक्षात शेतकऱ्यांपर्यंत पोचू न शकल्याने व मोठी आशा बाळगून असलेल्या कर्जमाफीच्या योजनेचे कसे तीनतेरा वाजवण्यात आले ते शेतकरी पाहत होते. 

आपण उपेक्षित आहोत व आपल्या कुठल्याच मागण्या आंदोलने करून, लाठ्याकाठ्या खाऊन, तुरुंगात जाऊन वा मैलोन्‌मैल मोर्चे काढून त्यांची साधी दखलही घेतली जात नाही, उलट ही आंदोलने मोडून काढणाऱ्यांचे जाहीर कौतुक ऐकावे लागते हाही प्रकार शेती क्षेत्राला नवा होता. यातूनच शेतकऱ्यांचे राजकीय ध्रुवीकरण व्हायला सुरुवात झाली व शहरी भागातील शेती न करणारी पण शेतकरी पार्श्वभूमी असलेल्यांची किसानपुत्र सारखी शहरी आंदोलनेही दिसू लागली. यातून शहरी भागातून शेतकऱ्यांबद्दल सहानुभूती बाळगणारा एक वेगळाच अराजकीय वर्ग तयार होत होता व त्यावरचे विचारमंथनही या क्षेत्रातील दुःखाला नव्याने वाचा फोडू लागले. शेतकरी जमीनदार म्हणून शोषक अशी मांडणी करणारे डावे पक्षही शेतकरी संघटनेची उजवी विचारधारा हाती घेत शेतकरी आंदोलनात उतरले व शेतकरी असंतोषाचे परिमाण व्यापक करू लागले.

काही दिवसांपूर्वीच महत्त्वाचा ठरू लागलेला शेतकरी असंतोष ऐरणीवर येत येणाऱ्या निवडणुकीत त्याचा काही विचार होईल असे वाटत होते. सत्ताधारीही किसान विमा वा किसान सन्मान योजनांद्वारे शेतकऱ्यांकडे आपले लक्ष असल्याचे सूचित करू लागले होते. त्यातून सत्ताधाऱ्यांना अपयशाची भीती जाणवू लागली होती. अचानकपणे आलेल्या अनपेक्षित घटनांनी सारे लक्ष पुलवामा व हवाई हल्ल्यावर केंद्रित करण्यात आले व महत्प्रयासाने ऐरणीवर आलेले शेतकरी प्रश्न आज कुठे आहेत ते शोधावे लागते. एवढेच नव्हे तर एरवी निवडणुकीत शेतकऱ्यांची थोडीफार दखल घेतली जायची ती घेतली जाईलच की नाही याची शंका वाटू लागली आहे.


इतर ताज्या घडामोडी
सार्वजनिक पैदास कार्यक्रमांचे प्रमाण...फळपिकातील नव्या जातींच्या पैदास कार्यक्रमांचे...
नगरमध्ये पीककर्ज वितरणात जिल्हा बॅंकच...नगर ः नगर जिल्ह्यात खरीप हंगामात आत्तापर्यंत खरीप...
`रानभाज्या खा, रोगप्रतिकार शक्ती वाढवा`सोलापूर : माहिती असलेल्या पालेभाज्या, फळभाज्या...
वेळीच ओळखा टोमॅटोमधील विकृतीभाजीपाला पिके ही अन्य पिकांच्या तुलनेत नाजूक...
गिरणा नदीवरील बलून बंधारे प्रकल्पाला...जळगाव  : केंद्र सरकारचा प्रायोगीक प्रकल्प...
परभणी जिल्ह्यात ऊस लागवडीत दुपटीने वाढपरभणी  ः जिल्ह्यात सन २०१९-२० मध्ये ३० हजार...
सहकारी साखर कारखान्यांनी रुग्णालय...कऱ्हाड, जि. सातारा : कोरोनाचे संकट हे अख्या जगावर...
शेतीच्या डेटा विज्ञानाबाबत जागृकतेची...परभणी :  डेटा विज्ञान तसेच कृत्रिम...
कृषी सल्ला (कोकण विभाग)हवामान अंदाज ः मुंबई येथील प्रादेशिक हवामान...
सांगलीत डाळिंब उत्पादक पीकविम्याच्या...सांगली : जिल्ह्यात पाच मंडळांत अतिपावसाने...
खानदेशातील अनेक भागात तुरळक पाऊसजळगाव  ः जिल्ह्यात रविवारी (ता.९) अनेक भागात...
रानभाज्यांकडे नागरिकांचा वाढता कलयवतमाळ : जिल्ह्याच्या डोंगररांगा व शेतशिवारात...
सातवा वेतन लागू करा, महागाई भत्ता द्या...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
नगरमध्ये आले चार ते पाच हजार रूपये...नगर ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या...
नगर जिल्ह्यात चार लाख टन कांदा चाळीतचनगरः गतवर्षी लेट खरीप, उन्हाळी कांद्याचे क्षेत्र...
नाशिकमध्ये लसणाची आवक साधारण; दरही...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील...
सोलापुरात ढोबळी मिरची, वांगी, काकडीला...सोलापूर ः सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या...
मे ते जून दरम्यानचे वीज बिल माफ करा :...कोल्हापूर : मे ते जून दरम्यानचे वीज बिल माफ न...
पुणे बाजार समितीत व्यवहार सुरळीत...पुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
बुलडाण्यात २८२ शेतकऱ्यांनी राबवला रेशीम...बुलडाणा : जिल्ह्यात सन २०१५-१६ पासून सहकार व...