अस्तरीकरणाच्या अनुदानासाठी शेतकऱ्यांची कृषी आयुक्‍तालयावर धडक

कृषी आयुक्‍तांना भेटून उर्वरित अनुदानाची मागणी मांडली. त्यांनी शेतकऱ्यांना अनुदान मिळवून देण्याचा प्रयत्न करू, असे सांगितले. - गीताराम निळ, पोरगाव, ता. पैठण, जि. औरंगाबाद. आमचे अनुदान बाकी आहे. कृषी आयुक्‍तांची थेट भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. त्यांनी अनुदान मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतो, असे म्हटले. - रामेश्‍वर आगलावे,गेवराई, बु. ता. पैठण, जि. औरंगाबाद.
अस्तरीकरणाच्या अनुदानासाठी शेतकऱ्यांची कृषी आयुक्‍तालयावर धडक
अस्तरीकरणाच्या अनुदानासाठी शेतकऱ्यांची कृषी आयुक्‍तालयावर धडक

औरंगाबाद : शेततळ्याच्या अस्तरीकरणाचे राहिलेल्या अनुदानासाठी पैठण तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी सोमवारी (ता. ३०) कृषी आयुक्‍तालयावर धडक दिली. प्रत्यक्ष कृषी आयुक्‍तांना भेटून त्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले. त्याआधी गुरुवारी (ता. २६) विभागीय कृषी सहसंचालक व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना आपल्या मागण्यांबाबत शेतकऱ्यांनी अवगत केले होते. 

शेतकऱ्यांच्या मागणीनुसार, त्यांनी कृषी विभागाच्या आदेशानुसार व पूर्वसंमतीने गंभीर दुष्काळी स्थितीतही २०१७-१८ मध्ये शेततळे अस्तरीकरणाचे काम पूर्ण केले. त्याची कृषी विभागाच्या मोजमाप पुस्तिकेत नोंद आहे. परंतु जेवढ्या बिलांची नोंद केली, त्याच्या जवळपास ५० टक्‍केच रक्‍कम अदा केली गेली. उर्वरित रक्‍कम मिळणे बाकी आहे. त्यासाठी कृषी विभागाच्या कार्यालयाकडे अनेक चकरा मारल्या. परंतु अनुदान मिळण्यासंदर्भात समाधान झाले नाही, शिवाय उत्तरही समाधानकारक मिळत नाही. 

अनेक शेतकऱ्यांनी उसणवारीवर पैसे आणून शेततळे अस्तरीकरणाचे काम केले. त्यांचा आता दिलेले पैसे मिळण्यासाठी मागणी सुरू आहे. त्यामुळे कृषी विभागाने तत्काळ उर्वरित अनुदानाची रक्‍कम देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. कृषी आयुक्‍तांनी सर्व शेतकऱ्यांचे म्हणने ऐकून घेत संवाद साधला.  फलोत्पादन संचालकांना आपल्या दालनात बोलावून घेतले व मागणीविषयी चर्चा केल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली.

या वेळी गोपीनाथ गिते, रामेश्‍वर आगलावे, त्र्यंबक कोल्हे, बाळासाहेब बरबडे, सारंगधर पिवळ, सर्जेराव जारे, सुभाष जारे, सीताराम निळ, बाळासाहेब निळ, विठ्ठल निळ, किसन गायकवाड, निवृत्ती कागदे, परशराम धुपे, प्रकाश हूड, पांडुरंग हूड, बाळकृष्ण निळ यांच्यासह १५ ते २० शेतकऱ्यांची उपस्थिती होती. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com