Agriculture news in marathi Farmers hit Mumbai to stop Wan's water | Agrowon

वानचे पाणी रोखण्यासाठी शेतकऱ्यांची मुंबईला धडक 

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 17 डिसेंबर 2020

जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यात असलेल्या वान प्रकल्पातील पाणी रोखण्यासाठी या तालुक्यातील शेतकरी पुढे आले आहेत. शेतकऱ्यांचे एक शिष्टमंडळ मुंबईत दाखल झाले असून, जलसंपदामंत्री, पालकमंत्री तसेच इतर संबंधित अधिकाऱ्यांच्या भेटी घेणार आहेत.

अकोला : जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यात असलेल्या वान प्रकल्पातील पाणी रोखण्यासाठी या तालुक्यातील शेतकरी पुढे आले आहेत. शेतकऱ्यांचे एक शिष्टमंडळ मुंबईत दाखल झाले असून, जलसंपदामंत्री, पालकमंत्री तसेच इतर संबंधित अधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन पाणी थांबविण्यासाठी विनंती करणार आहेत. दरम्यान, वानचे पाणी रोखण्यासाठी या भागात पाणी बचाव संघर्ष समिती निर्माण झाली आहे. ही समिती तीन जानेवारीपासून थेट प्रकल्पाच्या ठिकाणी आंदोलन करणार आहे. 

अकोला जिल्ह्यातील तेल्हारा व बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील शेती पाण्याखाली आणण्याच्या उद्देशाने सातपुड्यात वान प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे सिंचन सुविधा निर्माण होतील, अशी अपेक्षा असतानाच दुसरीकडे मात्र दर वर्षी विविध योजनांसाठी पाणी पळविले जात असल्याची शेतकऱ्यांमध्ये भावना तयार झाली आहे. 

आजवर अनेक योजनांसाठी पाणी आरक्षित केले आहे. आता पुन्हा एकदा अकोला जिल्ह्यातील बाळापूर मतदार संघातील ६९ गावांसाठी पाणी आरक्षित करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. याला मोठ्या संख्येने शेतकऱ्यांमधून विरोध वाढलेला आहे. आता अकोल्याच्या अमृत योजनेसाठी २४ दलघमी व बाळापूरच्या योजनेसाठी ३.३५ दलघमी पाणी आरक्षित करण्याचा शासन निर्णय निघाला आहे. हा निर्णय रद्द करण्यात यावा व धरणातील पाणी तालुक्यातील शेतीचे सिंचनासाठी आरक्षित करण्यात यावे या बाबत तेल्हारा तालुक्यातील शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ मुंबईला रवाना झाले आहे. तेथे पाणी पुरवठामंत्री, जलसंपदामंत्री व पालकमंत्र्यांची भेट घेऊन शेतकऱ्यांवर कसा अन्याय होत आहे या बाबत आपली बाजू मांडणार आहेत. 

असा आहे प्रकल्प 
अकोला-बुलडाणा-अमरावती या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर हा प्रकल्प आहे. तेल्हारा व संग्रामपूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतीचे सिंचन व्हावे यासाठी हा प्रकल्प साकारला आहे. यातून सिंचनाशिवाय बिगर सिंचनासाठी अधिक पाणी आरक्षित झालेले आहे. त्यामुळे शासन निर्णय रद्द व्हावा, अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांची आहे. शेतकऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध वान पाणी बचाव संघर्ष समितीने तीन जानेवारीपासून वान धरणावर बेमुदत आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. मुंबईत पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, जलसंपदामंत्री जयंत पाटील, पालकमंत्री बच्चू कडू यांची भेट घेऊन वानच्या पाण्यासंदर्भात सिंचनाबाबत या भागातील शेतकऱ्यांवर कसा अन्याय होत आहे, या संदर्भात आपली बाजू मांडणार आहेत.
 


इतर ताज्या घडामोडी
सोयाबीन पेंडची आयात शुल्काविना करावीनागपूर : भारतात सोयाबीन पेंडचे दर गगनाला...
दूधदरात पुन्हा दोन रुपयांची कपातनगर ः कोरोना संसर्ग वरचेवर वाढत असल्याने लॉकडाउन...
देशातील पहिले कृषी निर्यात मार्गदर्शन...पुणे ः राज्यातील शेतकरी व उदयोन्मुख...
उत्तर भारतातील कापूस लागवड पूर्णत्वाकडेजळगाव ः देशात उत्तर भारतातील कापूस लागवडीने वेग...
कृषी खात्यातील बदल्या लांबणीवरपुणे ः ऐन कोरोना कालावधीत बदल्यांचा घाट रचलेल्या...
खाद्यतेल दरात गतवर्षीपेक्षा ८० टक्के वाढनागपूर : शेंगदाण्याची निर्यात तसेच पाम तेलावरील...
पूर्व विदर्भात ४५ लाख क्विंटल धान खराब...गोंदिया : भात उत्पादक पूर्व विदर्भातील पाच...
पशुवैद्यक करणार घरपोच सेवा बंदनागपूर : पशुवैद्यकांना फ्रंटलाइन वर्कर्स व कोरोना...
सोयाबीन बियाणे निर्बंध मध्य प्रदेशकडून...पुणे ः परराज्यांत सोयाबीन बियाणे विक्रीवर निर्बंध...
‘महाबीज’चे सोयाबीन बियाणे दर ‘जैसे थे’अकोला : खरीप हंगामासाठी ‘महाबीज’ने सोयाबीन...
देशाच्या तुलनेत निम्मी साखर एकट्या...कोल्हापूर : देशाच्या साखरनिर्यात कोट्यापैकी जवळ...
‘गोकुळ’चा कल सत्तांतराकडेकोल्हापूर : अत्यंत चुरशीने झालेल्या कोल्हापूर...
‘सह्याद्री’च्या पर्वतरांगेमधून...नाशिक : सह्याद्रीच्या पर्वतरांगेत पश्‍चिम घाट...
राज्यात आंब्याचा हंगाम ऐन बहरातअकोल्यात बदाम आंबा ४००० ते ४५०० रुपये क्विंटल...
सोशल मीडियाद्वारे ६५ टन कलिंगड विक्रीपुणे : कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी एप्रिल...
मध्य प्रदेश सरकारकडून बियाणे विक्रीवर...पुणे ः सोयाबीन बीजोत्पादनात देशात सर्वात मोठा...
पशुखाद्य निर्मितीचा कच्चा माल दुपटीने...सांगली : पशुखाद्य तयार करण्यासाठी लागणाऱ्या...
दक्षिण भागात गारपिटीची शक्यतापुणे :  गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा चटका...
परभणी जिल्ह्यात कडक निर्बंध लागूपरभणी ः  कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी...
परभणी जिल्ह्यात लघु तलावांत सरासरी १९...परभणी ः वाढते तापमान, बाष्पीभवनाचा वाढलेला वेग,...