कांदा बियाणे न उगवल्याने शेतकऱ्यांना फटका

बार्शी टाकळी तालुक्यातील चिंचोली रुद्रायणी येथील शेतकऱ्यांनी या हंगामात लागवडीसाठी खरेदी केलेले कांदा बियाणे उगवले नसल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.
 कांदा बियाणे न उगवल्याने शेतकऱ्यांना फटका  Farmers hit for not growing onion seeds
कांदा बियाणे न उगवल्याने शेतकऱ्यांना फटका Farmers hit for not growing onion seeds

अकोला : बार्शीटाकळी तालुक्यातील चिंचोली रुद्रायणी येथील शेतकऱ्यांनी या हंगामात लागवडीसाठी खरेदी केलेले कांदा बियाणे उगवले नसल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. बार्शी टाकळी तालुक्यातील चिंचोली रुद्रायणी येथील २२ शेतकऱ्यांनी मेहकर येथील एका कृषी सेवा केंद्रामधून एक क्विंटल १२ किलो कांदा बियाणे १ हजार ९०० रुपये किलो प्रमाणे विकत आणले होते.  

या बियाण्याची लागवड केल्यानंतर ते बियाणे महिना लोटला तरीही उगवले नसल्याने शेतकऱ्यांना धक्का बसला आहे. सुमारे दोन लाखांवर अधिक किमतीचे बियाणे शेतकऱ्यांनी आणलेले आहे. नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.  बार्शी टाकळी तालुक्यातील शेतकऱ्यांनी कांदा लागवडीच्या उद्देशाने रोप तयार करण्यासाठी कांद्याचे बियाणे  खरेदी केले होते. २२ शेतकऱ्यांनी मेहकर येथील एका कृषी केंद्र धारकाकडून हे बियाणे विकत घेतले.एक किंटल बारा किलो कांदा बियाणे १ हजार ९०० रुपये दराने विकत घेतले.   शेताची मशागत करून कांदा बियाण्याची लागवड  करण्यात आली. लागवड करून आता एक ते दीड महिना लोटला. मात्र आज एकाही शेतकऱ्याचे बियाणे उगवले नसल्याने शेतकऱ्यांना धक्का बसला.  शेतकऱ्यांनी मेहकर येथील त्या कृषी सेवा केंद्र संचालकांकडे तक्रार केली. कांदा बियाणे उगवले नसल्याबाबत संबंधित विक्रेत्याने उडवाउडवीची उत्तरे देवून शेतकऱ्यांना तेथून चालते केले. याबाबत शेतकऱ्यांनी हे प्रकरण बार्शीटाकळी कृषी मंडळ अधिकाऱ्यांना सांगितले. 

खरेदी बिल नसल्याची अडचण शेतकऱ्यांनी मेहकर येथील कृषी सेवा केंद्र संचालकांकडून कांद्याचे बियाणे घेताना बिल घेतलेले नाही. हा व्यवहार झाला त्यावेळी विक्रेत्याने बिल हवे असल्यास जीएसटीसह २ हजार ५०० रुपये दर सांगितला होता. तर बिलाशिवाय १ हजार ९०० रुपये भाव सांगितला. पैसे वाचत असल्याने शेतकऱ्यांनी बिल न घेता बियाणे आणले. आता तो विक्रेता बियाण्याबाबत कुठलाही दावा मान्य करण्यास नकार देत आहे.

प्रतिक्रिया आम्ही २२ शेतकऱ्यांनी मेहकर येथून १ हजार ९०० रुपये किलोने कांदा बियाणे घेतले. किलोमागे ६०० रुपयांचा फरक पडत असल्याने आम्ही बिल न घेता बियाणे आणले. महिना-दीड महिना लोटला तरी बियाणे उगवलेले नाही. आता बियाणे विक्रेता आमचे काहीही ऐकायला तयार नाही. आम्ही कुणाकडे दाद मागावी, असा प्रश्‍न आमच्यासमोर आहे.  - महादेव गर्जे, शेतकरी, चिंचोली रुद्रायणी, जि. अकोला. 

प्रतिक्रिया

चिंचोली रुद्रायणी येथील कांदा बियाणे उगवले नसल्याबाबत कृषी खात्याकडे अधिकृत तक्रार आलेली नाही. मी सध्या रजेवर असलो तरी या बाबत माहिती मिळताच आमच्या अधिकाऱ्यांकडे तक्रारीबाबत चौकशी केली. पण अद्याप आमच्याकडे तक्रार आलेली नाही. तालुक्यात वाघजळी येथे एका शेतकऱ्याची कांदा बियाणे उगवले नसल्याची तक्रार होती. त्याचा आम्ही पंचनामा करून अहवाल दिला आहे. -दीपक तायडे, तालुका कृषी अधिकारी, बार्शी टाकळी, जि. अकोला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com