Agriculture news in Marathi 'Farmer's Honor' fund through postal service in Kolhapur | Agrowon

कोल्हापुरात टपाल सेवेद्वारे ‘शेतकरी सन्मान’ निधी

टीम अॅग्रोवन
बुधवार, 15 एप्रिल 2020

कोल्हापूर ः पंतप्रधान जनधन योजनेच्या बचत खात्यामध्ये केंद्र सरकारकडून पंतप्रधान गरीब कल्याण योजनेचे तसेच पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत आलेले पैसे पोस्टाच्या शाखेमधून तसेच ग्रामीण टपाल सेवकाच्या माध्यमातून मिळण्यास सुरुवात झाली आहे. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी याबाबत आदेश दिले होते. 

कोल्हापूर ः पंतप्रधान जनधन योजनेच्या बचत खात्यामध्ये केंद्र सरकारकडून पंतप्रधान गरीब कल्याण योजनेचे तसेच पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत आलेले पैसे पोस्टाच्या शाखेमधून तसेच ग्रामीण टपाल सेवकाच्या माध्यमातून मिळण्यास सुरुवात झाली आहे. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी याबाबत आदेश दिले होते. 

जे बचत खाते आधार क्रमांकाशी जोडलेली आहे. अशा खात्यावरील रक्कम बायोमेट्रीक यंत्राद्वारे पोस्ट कार्यालय किंवा ग्रामीण डाक सेवकाच्या माध्यमातून मिळणार आहेत. जिल्हा मध्यवर्ती बँक वगळता सर्व बँकातील खातेधारक ज्यांच्या खात्याला आधार क्रमांक जोडलेला आहे, असे लाभार्थी  पोस्ट कार्यालयामधून पैसे काढू शकतील. या प्रकारचे पैसे काढण्याची मर्यादा प्रतिदिन रुपये दहा हजार असणार आहे. 

जिल्ह्यात एकूण ५३५ पोस्ट कार्यालय कार्यरत असून त्यापैकी ४३९ ग्रामीण भागामध्ये कार्यरत आहेत. या ग्रामीण पोस्ट कार्यालयामधून ६७४ प्रशिक्षित ग्रामीण डाकसेवक रक्कम अदा करण्यासाठी कार्यरत आहेत. आधार क्रमांकाशी जोडलेल्या कुठल्याही बँकेच्या बचत खात्यावरील व्यवहार या ग्रामीण डाक सेवकांकडून करता येणार आहेत. पोस्ट कार्यालयातर्फे या सुविधा, सध्या उपलब्ध असलेल्या बँक शाखा, एटीएम, व्यवसाय समन्वयक ग्राहक सेवा केंद्र व्यतिरिक्त राहतील. 

आपल्या खात्यावर व्यवहार करण्यासाठी खातेदाराला त्याचे आधार कार्ड क्रमांक, बँक पासबुक व मोबाइल क्रमांक ग्रामीण डाक सेवकास द्यावा लागेल. या व्यवस्थेमुळे पंतप्रधान गरीब कल्याण योजना व पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचे लाभार्थी खातेदार या सर्वांची मोठी सोय होणार आहे, असे अग्रणी जिल्हा व्यवस्थापक राहुल माने यांनी सांगितले. 

जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी ग्रामीण डाक सेवकांनी आधार क्रमांक आधारित रक्कम अदा करण्याच्या सेवा सुरू केल्या आहेत. तरी सर्व बँकांचे लाभार्थी महिला व शेतकरी खातेदार ग्राहकांनी आपल्या खात्यावरून रकमा काढण्यासाठी आपण बँक शाखा, एटीएम, बीसी ग्राहक सेवा केंद्र तसेच आता पोस्ट बँक यांच्या सुविधेचा लाभ घ्यावा. कोणत्याही प्रकारे बँक शाखांमध्ये होणारी गर्दी टाळावी. तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन श्री. माने यांनी केले आहे.


इतर ताज्या घडामोडी
बार्शी तालुक्यात सहा स्वस्त धान्य...सोलापूर : बार्शी तालुक्यातील सहा स्वस्त...
फालसापासून जाम, जेली, चटणीफालसा हा एक रानमेवा आहे. फालसा फळामध्ये प्रथिने,...
सोलापूर जिल्ह्यात पिकांच्या...सोलापूर : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सलग...
परभणी, हिंगोलीत सोयाबीन, तुर, कपाशीचे...परभणी : परभणी, हिंगोली जिल्ह्यातील मंडळांत...
परभणी जिल्ह्यात पावसाचा सोयाबीन पिकाला...परभणी : जिल्ह्यात दीर्घ खंडानंतर पावसाचे आगमन...
विष्णुपुरी प्रकल्पाचे सहा दरवाजे उघडलेनांदेड : गोदावरी नदीवरील विष्णुपुरी...
खानदेशात नुकसानीबाबत सोयाबीनचेही...जळगाव ः मूग, उडीद नुकसानीसंबंधी गेल्या...
जळगाव जिल्ह्यात बाजार समित्यांकडून...जळगाव ः जिल्ह्यात काही बाजार समित्यांचा...
परजिल्ह्यातील कारखान्यांची खानदेशातील...जळगाव ः खानदेशात उसाचे क्षेत्र यंदा...
पंजाब, हरियानात शेतकऱ्यांची आंदोलने नवी दिल्ली : केंद्र सरकारने आणलेल्या कृषिविषयक...
चक्रीवादळाची शेतकऱ्यांना नुकसान भरपाई...सिंधुदुर्ग ः निसर्ग चक्रीवादळातील नुकसानीकरिता...
नगर जिल्ह्यात मूग उत्पादकतेत यंदा...नगर ः नगर जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस झाल्याने...
मुळा धरणातून वीस हजार क्युसेक विसर्गनगर ः नगर जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून जोरदार...
पावसाने सोयाबीनला फुटले कोंबवाशीम ः जिल्ह्यात काही भागात सततच्या पावसामुळे...
औरंगाबाद, लातूरमध्ये पावसाचा धुमाकूळऔरंगाबाद : मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ सुरूच...
पोषणयुक्त आहार घेण्यावर भर द्या : पाटीलनाशिक : ‘‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने...
कांदा निर्यातबंदी विरोधात ‘सोशल मीडिया...नाशिक : २०१३-१४ मध्ये सोशल मीडियाचा मोठ्या...
कारखान्यांना २५ बेडचे हॉस्पिटल बंधनकारकसोलापूर : राज्यातील ऊस गाळप हंगाम १५ ऑक्‍...
निर्यात अडथळे, बियाणे दराचा कांदा...जळगाव ः खानदेशात प्रतिकूल वातावरणामुळे खरिपातील...
परभणीत भेंडी १००० ते १५०० रूपये क्विंटल परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...