Agriculture news in Marathi 'Farmers' Honor Funding' has not been received | Agrowon

सातारा : ‘शेतकरी सन्मान’चा निधी मिळालाच नाही

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 13 डिसेंबर 2019

सातारा ः पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेच्या लाभासाठी जिल्ह्यातील चार लाख ५८ हजार ५२७ शेतकरी पात्र ठरले आहेत. मात्र, त्यातील अनेक शेतकऱ्यांच्या आधार कार्ड, बॅंकेचा आयएफएससी कोड, खाते क्रमांकाच्या त्रुटींमुळे लाभार्थ्यांपर्यंत अनुदान पोचले नाही. प्रशासकीय स्तरावर या त्रुटींच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू असले तरी ऑनलाइन प्रक्रियेमुळे काही शेतकऱ्यांना अनुदान कशात अडकले याचीच कल्पना नसल्याने वादावादीचे प्रसंग घडत आहेत. 

सातारा ः पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेच्या लाभासाठी जिल्ह्यातील चार लाख ५८ हजार ५२७ शेतकरी पात्र ठरले आहेत. मात्र, त्यातील अनेक शेतकऱ्यांच्या आधार कार्ड, बॅंकेचा आयएफएससी कोड, खाते क्रमांकाच्या त्रुटींमुळे लाभार्थ्यांपर्यंत अनुदान पोचले नाही. प्रशासकीय स्तरावर या त्रुटींच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू असले तरी ऑनलाइन प्रक्रियेमुळे काही शेतकऱ्यांना अनुदान कशात अडकले याचीच कल्पना नसल्याने वादावादीचे प्रसंग घडत आहेत. 

केंद्र शासनाने फेब्रुवारीत सादर केलेल्या अर्थसंकल्पात पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना जाहीर केली. पाच एकरांच्या आतील शेतकऱ्यांना बी-बियाणे, खते आदी खरेदी करण्याच्या हेतूने अर्थसाहाय्य व्हावे, यासाठी तीन टप्प्यांत प्रत्येकी दोन हजारप्रमाणे सहा हजार रुपये आर्थिक साह्य केले जाते.

फेब्रुवारीपासून या योजनेसाठी महसूल, कृषी आणि ग्रामविकास विभागाने सातारा जिल्ह्यातील पाच एकरांच्या आतील शेतकऱ्यांचा समावेश करण्यासाठी माहिती भरून घेतली. जिल्ह्यातील या योजनेचे चार लाख ५८ हजार ५२७ पात्र शेतकरी आहेत. शेतकऱ्यांचे आधार कार्ड क्रमांक, बॅंकेचा आयएफएससी कोड, मोबाईल क्रमांक आदी माहिती घेण्यात आली. सरकारी नोकर, सरकारी पेन्शनधारक तसेच आयकर भरणाऱ्यांना या योजनेपासून वंचित राहावे लागले.

काही पात्र लाभार्थ्यांना दोन हजारांचे किमान दोन हप्ते मिळाले आहेत. मात्र, अद्याप काहींना पहिलाही हप्ता मिळालेला नाही. काहींना दुसरा हप्ता मिळाला नाही. ऑनलाइन प्रक्रियेमुळे नेमके अनुदान कशात अडकले हे शेतकऱ्यांना समजत नाही. ऑनलाइन माहिती भरताना काहींचा आधार कार्ड, बॅंकेचा आएफएससी कोड, खाते क्रमांक चुकीचा नोंद झाला. त्यामुळे अनुदान अडकले आहे. प्रशासकीय पातळीवर त्रुटींची पूर्तता सुरू आहे. त्यासाठी शेतकऱ्यांकडून येईल, त्यानुसार त्यांचे रेकॉर्ड तपासले जात आहे.


इतर ताज्या घडामोडी
नरनाळा किल्ला पर्यटन विकासासाठी...अकोला  : अकोला जिल्ह्याच्या सर्वसाधारण...
पीक फेरपालटातून रोगांचा प्रादुर्भाव...येत्या हवामान बदलाच्या काळामध्ये कीड आणि रोगांचा...
मंगळवेढ्यात डाळिंबाच्या सौद्यांना...मंगळवेढा, जि. सोलापूर : मंगळवेढा कृषी उत्पन्न...
अकोला जिल्ह्यातील सात गावे झाली ‘...अकोला  ः जिल्ह्यातील सात गावांची राज्य...
वाशीम जिल्ह्यात ७७७ कोटींंची कर्जमुक्ती...वाशीम : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...
शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी कृषी...नाशिक : ग्रामीण भागातील गरीब शेतकऱ्यांचे उत्पन्न...
सांगलीत ‘माणगंगा’वर ताब्याच्या...सांगली : आटपाडीतील माणगंगा सहकारी साखर...
सोलापूर जिल्हा नियोजन आराखड्यात ७४.४५...सोलापूर : जिल्ह्याच्या सन २०२०-२०२१ च्या जिल्हा...
सूक्ष्म सिंचन साधनांमुळे आदिवासी शेतकरी...हिंगोली : ‘‘वसंतराव नाईक मराठावाडा कृषी...
मोर्शी येथे ‘कामदार’ कार्यालयाचे उद्‌...अमरावती  ः शेतकरी, कष्टकऱ्यांचे प्रश्‍न...
प्राप्त निधी वेळेत खर्च करा : भुजबळ नाशिक : ‘जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत प्राप्त...
सोलापूरजिल्ह्याच्या ३४९.८७ कोटींच्या...सोलापूर : जिल्ह्यासाठी २०२०-२१ या आर्थिक...
खानदेशात रब्बीचे क्षेत्र दुप्पटजळगाव ः खानदेशात रब्बी हंगामाची स्थिती...
वाघाच्या बंदोबस्तासाठी गावकऱ्यांचा...भंडारा  ः वाघाच्या दहशतीमुळे शेतीकामे...
मराठवाड्यातील पाणीसाठ्यात झपाट्याने घटऔरंगाबाद : ऑक्‍टोबरमध्ये हिटऐवजी पावसाचे आगमन...
'युरियावरील लिकिंग रोखा'अंमळनेर, जि. जळगाव  ः सध्या रब्बी हंगाम...
थकीत ऊसबिलाप्रश्नी नांदेडमध्ये ...नांदेड ः परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील...
संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीसाठी भाजपचा...कोल्हापूर  ः महाविकास आघाडीने जाहीर केलेली...
सीताफळ लागवडीची संपूर्ण माहिती शासनाने...अकोला  ः सीताफळ लागवडीची संपूर्ण माहिती...
केंद्र सरकारकडे प्रलंबित प्रश्नांच्या ...मुंबई  ः ‘‘महाराष्ट्राच्या हिताचे प्रश्न...