शेतकरी सन्मान योजना नोंदणीत सातारा राज्यात दुसरा

शेतकरी सन्मान योजना नोंदणीत सातारा राज्यात दुसरा
शेतकरी सन्मान योजना नोंदणीत सातारा राज्यात दुसरा

सातारा : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही केंद्र शासनाची महत्त्वाकांक्षी योजना असून योजनेच्या नोंदणीत सातारा जिल्हा राज्यात दुसरा आहे. या योजनेच्या माध्यमातून २ हेक्टरपेक्षा कमी क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तीन टप्प्यात ६ हजार रुपये थेट जमा होणार आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीविषयक गरजा पूर्ण होणार असून त्यांना सक्षम करण्याकडे केंद्र शासनाने हे पाऊल टाकले आहे, असे प्रतिपादन कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नितीन बानुगडे-पाटील यांनी केले.

येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना जिल्हास्तरीय शुभारंभ श्री. बानुगडे-पाटील यांच्या हस्ते रविवारी झाले. या वेळी ते बोलत होते. 

याप्रसंगी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील थोरवे, प्रांताधिकारी स्वाती देशमुख, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुनील बोरकर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी देविदास ताम्हाणे, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक महादेव शिरोळकर आदी या वेळी उपस्थित होते. 

शेतकऱ्यांपुढील अडचणी कधीही संपत नाही, येणाऱ्या प्रत्येक संकटाला सामोरे गेले पाहिजे, असे सांगून श्री. बानुगडे-पाटील पुढे म्हणाले, ‘‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत जिल्ह्यातील ३ लाख ५ हजार शेतकऱ्यांची यादी अपलोड करण्यात आली आहे, हे काय सोपे काम नाही याबद्दल महसूल विभाग, ग्रामविकास विभाग, अभिनंदन करतो.’’

या वेळी श्वेता सिंघल, सुनील बोरकर यांची मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाच्या सुरवातीला प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत मधुकर गार्डे, करंजे, सातारा, कार्तिकी क्षीरसागर, धामणेर (ता. कोरेगाव), महिंद्र जाधव, नवलेवाडी (ता. खटाव), महादेव माने, राजमाची (ता. कराड), कृष्णत मोरे, केळोली (ता. पाटण), बाळासो ठोंबरे, सोनगीरवाडी (ता. वाई), सर्जेराव मोरे, बामणोली (ता. जावली), भिकन डोईफोडे, धनगरवाडी (ता. महाबळेश्वर), शामराव जगताप, वडवाडी (ता. खंडाळा), छगन जाधव, पिंपरद (ता. फलटण) व बाळू लिंगे, म्हसवड (ता. माण) या पात्र शेतकऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते प्राथमिक स्वरूपात सत्कार करण्यात आला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com