नांदेडमध्ये खरेदी केंद्राकडे शेतकऱ्यांची पाठ

नांदेड :सध्या खुल्या बाजारात शेतीमालाचे दर वाढल्याने शेतकऱ्यांनी शासकीय धान्य खरेदी केंद्राकडे पाठ फिरविली आहे. यात शेतीमाल विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणी तुरळक झाली आहे.
 Farmers' ignore to the shopping center in Nanded
Farmers' ignore to the shopping center in Nanded

नांदेड : जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या शेतीमालास हमी दरानुसार भाव मिळावा, यासाठी जिल्हा मार्केटिंग फेडरेशन, विदर्भ फेडरेशन तसेच शेतकरी उत्पादक कंपनीकडून जिल्ह्यात २८ ठिकाणी हमी दरानुसार खरेदी केंद्र सुरू करण्यात आली आहेत. परंतु, सध्या खुल्या बाजारात शेतीमालाचे दर वाढल्याने शेतकऱ्यांनी शासकीय धान्य खरेदी केंद्राकडे पाठ फिरविली आहे. यात शेतीमाल विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणी तुरळक झाली आहे. 

बाजारात शेतीमालाचे दर कोसळल्यानंतर शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी राज्य सरकारने किमान हमी दरानुसार धान्य खरेदी केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला. जिल्ह्यातील मार्केटिंग फेडरेशनकडून आठ, महाएफपीसीकडून १७, तर विदर्भ फेडरेशनकडून तीन अशा २८ खरेदी केंद्रांना नाफेडकडून मान्यता मिळाली होती. परंतु, सध्या उडीद, मूग व सोयाबीनला खुल्या बाजारात भाव अधिक मिळत आहे. 

यंदा खुल्या बाजारात शेतीमालाचे दर वाढले आहेत. यामुळे शासकीय धान्य खरेदी केंद्राकडे शेतीमाल आला नाही. ज्यावेळी बाजारात शेतीमालाचे दर पडतात, त्यावेळी शासन हस्तक्षेप करून हमी दरानुसार शेतीमाल खरेदी करते. या वेळी  खरेदी केंद्राला शेतीमाल मिळाला नाही, तरी चालेल. परंतु, शेतकऱ्यांना चांगला दर मिळल्याचे समाधान आहे. - डॉ. अमोल यादव, जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था), नांदेड.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com