शेतकऱ्यांनी सुधारित अवजारांचा शेतात वापर करावा ः भोकरे

जळगाव : ‘‘यंत्राचा योग्य पद्धतीने वापर व नवनवीन सुधारित अवजारांची माहिती शेतकऱ्यांनी घ्यावी. अवजारांचा चांगला उपयोग आपल्या शेतीत करावा. शेतकरी गट तयार करून अवजारे भाडेतत्वावर देण्याचा व्यवसाय सुरू करावा आणि उद्योजक बनावे,’’ असा सल्ला कृषी उपसंचालक अनिल भोकरे यांनी दिला.
Farmers improved tools Use in the field: Bhokre
Farmers improved tools Use in the field: Bhokre

जळगाव : ‘‘यंत्राचा योग्य पद्धतीने वापर व नवनवीन सुधारित अवजारांची माहिती शेतकऱ्यांनी घ्यावी. अवजारांचा चांगला उपयोग आपल्या शेतीत करावा. शेतकरी गट तयार करून अवजारे भाडेतत्वावर देण्याचा व्यवसाय सुरू करावा आणि उद्योजक बनावे,’’ असा सल्ला कृषी उपसंचालक अनिल भोकरे यांनी दिला. 

ममुराबाद (ता.जळगाव) येथील कृषी विज्ञान केंद्रातर्फे १५० शेतकऱ्यांना कृषी यांत्रिकीकरण या विषयावर ‘झूम व्हिडिओ कॉन्फरन्स’द्वारे ऑनलाइन प्रशिक्षण देण्यात आले. समारोप सत्रात भोकरे बोलत होते. त्यांनी कृषी यांत्रिकीकरण योजनेची माहिती दिली. आजच्या काळात यांत्रिकीकरण कसे गरजेचे आहे, यावर त्यांनी संबोधन केले. 

प्रथम सत्रात विषय विशेषज्ञ वैभव सूर्यवंशी यांनी ‘शेतीच्या पूर्वमशागतीसाठी लागणारी अवजारे’ या विषयावर मार्गदर्शन केले. पूर्वमशागतीची अवजारे, त्यांची निगा देखभाल व जोडणी यांचे सादरीकरण केले. द्वितीय सत्रात कोळदा (ता.नंदुरबार) येथील कृषी विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ जयंत उत्तरवार यांनी ‘कापूस पिकासाठी असलेली सुधारित अवजारे व नंदुरबार येथील कृषी विज्ञान केंद्राने विकसित केलेली अवजारे’ याबद्दल माहिती दिली. 

कार्यक्रम समन्वक डॉ. हेमंत बाहेती म्हणाले, ‘‘ प्रशिक्षणातून मिळलेले ज्ञान आपापल्या गावातील इतर शेतकरी मित्रांना द्यावे. लॉकडाउन कालावधीत शेतकऱ्यांच्या गरजेनुसार ऑनलाइन प्रशिक्षणाची संधी कृषी विज्ञान केंद्राने उपलब्ध करून दिली आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी www.kvkjalgaon.org या संकेतस्थळावर नोंदणी करावी व प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा. डॉ. विशाल वैरागर यांनी आभार मानले. कृषी विज्ञान केंद्राचे तुषार गोरे, किरण मांडवडे, डॉ. स्वाती कदम, किरण जाधव व संदीप गायकवाड यांचे सहकार्य लाभले.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com