सोळासूत्री कार्यक्रमातून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार : केंद्रीय कृषी राज्यमंत्री चौधरी

सोळासूत्री कार्यक्रमातून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार : केंद्रीय कृषी राज्यमंत्री चौधरी
सोळासूत्री कार्यक्रमातून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार : केंद्रीय कृषी राज्यमंत्री चौधरी

मालेगाव, जि. नाशिक : केंद्र शासनाने शेतकऱ्यांसाठी अर्थसंकल्पात दीड लाख कोटी रुपयांची तरतूद केली. ही आजवरची सर्वाधिक तरतूद आहे. देशातील नऊ कोटी शेतकऱ्यांना किसान सन्मान योजनेचा लाभ मिळाला आहे. शेतकऱ्यांसाठी १६ सूत्री कार्यक्रम अमलात आणून २०२२ पर्यंत त्यांचे उत्पन्न दुप्पट केले जाईल. शेतकरी व सामान्य नागरिक या दोघांनाही परवडेल अशा पद्धतीचा सन्मानजनक तोडगा काढून कांद्याला रास्त भाव देण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याची माहिती केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलास चौधरी यांनी येथे दिली. कृषी राज्यमंत्री चौधरी एका कार्यक्रमासाठी मालेगाव दौऱ्यावर आले असता, सायंकाळी त्यांनी शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘‘अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी जास्तीत जास्त रकमेची तरतूद केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमीच शेतकरीहिताला प्राधान्य देत आहेत. शेतकऱ्यांसाठी विविध योजना अमलात आणण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांच्या मालाला रास्त भाव मिळवून त्यांचे उत्पन्न दुपटीने करण्याचा प्रयत्न आहे. शेतकरी आत्महत्या हा चिंतेचा विषय असला, तरी शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढल्यानंतर हा प्रश्‍न सुटू शकेल. शेतकऱ्यांसाठी पीकविमा ऐच्छिक केला आहे. शेतकरीहितासाठी केंद्र शासन कटिबद्ध आहे. गट व समूहशेतीतून शेतकरी प्रगती साधतील.’’  मनमाड-मालेगाव- इंदूर रेल्वेमार्गाच्या कामाचा पाठपुरावा करू. कांद्याचे दर वाढले, तरी समस्या निर्माण होतात. कमी झाले तरी शेतकऱ्यांचे नुकसान होते. शेतकरी व सामान्य नागरिक अशा दोघांनाही परवडेल असे धोरण आखले जाईल, असेही त्यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com