agriculture news in Marathi farmers initiative for direct vegetable sale to costumer Maharashtra | Agrowon

फळे, भाजीपाला थेट विक्रीसाठी शेतकऱ्यांनीच घेतला पुढाकार 

टीम अॅग्रोवन
रविवार, 5 एप्रिल 2020

माझ्याकडे एक एकरावरील संत्रा विक्रीला आलेला आहे. मात्र बंदमुळे बाजारात नेता येत नाही. त्यात पुर्वमोसमी पावसाचे संकट ओढवले आहे. आता उपलब्ध मोठा संत्रा कसा विकायचा हा प्रश्न आहेच, पण मी नगर शहरात थेट ग्राहकांना पंचवीस ते तीस रुपये प्रती किलोने संत्रा विक्री करत आहे. 
- चांगदेव शिंदे, शेतकरी, शेंडी, ता. नगर, जि. नगर 
 

नगर : फळे, भाजीपाला विक्रीसाठी नगर जिल्ह्यामधील शेतकऱ्यांनीच पुढाकार घेतला आहे. शेतकऱ्यांना भाजीपाला, फळे विक्रीसाठी कृषी विभागाने पुढाकार घेऊन परिवहन विभागाकडून साधारण अडीचशे शेतकऱ्यांना वाहतूक परवाने दिले असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली. दोन दिवसांत नगर जिल्ह्यामधील शेतकऱ्यांनी जवळपास शंभर टनापेक्षा अधिक भाजीपाला-फळे विकली असल्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. नगर जिल्ह्यामध्ये सुमारे पावणे सहाशे टन फळे विक्रीसाठी सध्या उपलब्ध आहे. 

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर आठ दिवसांपासून राज्यात बंद आहे. त्यामुळे भाजीपाला, फळे विक्रीसाठीच्या अडचणी वाढल्या आहेत. मात्र, नगर जिल्ह्यात विक्रीसाठी शेतकऱ्यांनीच पुढाकार घेतला आहे. जिल्ह्यामधील कर्जत, राहाता, राहुरी, नगर, पारनेर, संगमनेर, पाथर्डी, श्रीगोंदा तालुक्यात फळपिकांचे क्षेत्र अधिक आहे. जिल्ह्यात उन्हाळ्यामध्ये कलिंगड, खरबूज, यासह द्राक्ष, मोसंबी, संत्रा पिकाचे उत्पादन हाती येते. 

कृषी विभागाने संकलित केलेल्या माहितीनुसार पाचशे टन भाजीपाला व ५८५ टन फळे विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे स्पष्ट झाले आहे. शेतकऱ्यांना भाजीपाला, फळांचे वाहतूक करता यावी यासाठी कृषी विभागाने परिवहन विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या मदतीने साधारण अडीचशे परवाने उपलब्ध करून दिले आहेत.

शेतकरी छोट्या विक्रेत्यांना, तसेच मोठ्या सोसायटी, अपार्टमेंटमध्ये थेट ग्राहकांना विक्री करत आहेत. नगर संगमनेर, श्रीरामपूरसह मोठ्या शहरात पालिकांच्या मदतीने छोट्या शेतकऱ्यांना भाजीपाला, फळे विक्रीसाठी जागा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. अडचण आल्यास संपर्क करण्याचे आवाहन आत्माचे प्रकल्प उपसंचालक अनिल गवळी यांनी केले आहे. 
 
विक्रीसाठी उपलब्ध असलेली फळे (टनात) 
द्राक्ष ः ३९०, डाळिंब ः ५, चिकू ः ३, पेरू ः १४, खरबूज ः २२, कलिंगड ः १४०, लिंबू ः १५. कांदा ः २१० 

प्रतिक्रिया
मी शेतकऱ्यांकडून खरेदी करून पुणे शहरातील सोसायट्यांत भाजीपाला, फळांची विक्री करतो. दर दिवसाला सुमारे पंचवीस टन मालाची विक्री करतो. सध्या बंद असला तरी भाजीपाला विक्रीला काही अडचण नाही. नगर जिल्ह्यामधील शेतकऱ्यांकडून जागेवर खरेदी करून बाजारातील दर देतो. सध्याच्या परिस्थितीत थेट ग्राहकांना विक्री केली जात असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत नाही. 
- जावेद शेख, भाजीपाला, फळे विक्रेता, आंतरवली ता. जामखेड, जि. नगर 

नगरसह जिल्हाभरात फळे विकण्यासाठी कृषी विभाग आवश्यक ते प्रयत्न आणि मदत करत आहे. शेतकरी ते ग्राहक हा समन्वय या बंदच्या काळात केला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून कृषी विभागाने घेतलेल्या पुढाकारामुळे नगर बाजार समिती पुन्हा एकदा चालू झाली आहे. येथे बऱ्यापैकी आज फळे विक्रीला आली. शेतकऱ्याचे नुकसान टाळण्याचा कृषी विभागाचा प्रयत्न आहे. 
- शिवाजीराव जगताप, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नगर 

 


इतर बातम्या
Breaking : मॉन्सून एक्सप्रेस केरळात...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) सोमवारी (ता....
राज्यात नवे २४८७ रुग्ण; सध्या ३४,४८०...मुंबई : राज्यात आज दिवसभरात २४८७ नवीन रुग्णांचे...
राज्य सरकारचे ‘पुनश्‍च हरीओम्’ :...मुंबई : कोरोनाच्या साथीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी...
शैक्षणिक वर्ष जूनपासूनच : मुख्यमंत्री...मुंबई : ‘‘शिक्षण हे जीवनावश्यक आहे ते...
अंतिम वर्षाची परीक्षा नाही :...मुंबई : सध्याच्या परिस्थितीत विद्यापीठाच्या...
टोळधाडबाधितांना मदत देणार : पंतप्रधान...नवी दिल्ली : देशातील अनेक भागांत टोळधाडीचे संकट...
पीकविम्याचे कामकाज या महिन्यातपुणे: राज्यातील शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीकविमा...
प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील यंत्रमाग...मालेगाव, जि. नाशिक : ‘‘लॉकडाऊनमुळे यंत्रमागाची...
गोंधळी शिवारात ६२ हजारांचा एचटीबीटी...यवतमाळ ः कृषी विभागाच्या पथकाने अमरावती, यवतमाळ...
लोकांना पूर धोक्‍याची जाणीव करुन द्या ः...भंडारा ः वैनगंगा नदी तसेच इतर नदीकाठावरील खोलगट...
परवानगी नसलेल्या एचटीबीटी बियाण्यांचा...अमरावती ः घरपोच बियाणे वाटपाच्या माध्यमातून...
टोळधाड प्रादुर्भावग्रस्त क्षेत्राला...भंडारा ः भंडारा जिल्ह्यातील टोळधाड...
विदर्भ राज्य आंदोलन समितीचे ७ जूनला...अकोला ः कोरोनामुळे उद्योगधंदे, व्यापार, शेती,...
नांदेड जिल्ह्यात पाच हजारावर...नांदेड : किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गंत...
शेतकऱ्यांनी डिजिटल व्यासपीठाचा वापर...पुणे ः कोरोनामुळे शेतीक्षेत्राचे चित्र बदलणार आहे...
‘सोयाबीन लागवड तंत्रज्ञान व प्रक्रिये’...परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील...
नांदेडमधील कापूस संशोधन केंद्रात...नांदेड : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
नगर अर्बन बॅंकेला चाळीस लाखांचा दंडनगर : नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंकेला रिझर्व्ह...
‘कुकडी’चे उन्हाळी आवर्तन सहा जूनला...नगर : ‘कुकडी’च्या उन्हाळी आवर्तनासाठी पुणे येथे...
दुग्ध व्यवसायाने घराला आधारशेतीपूरक व्यवसायामध्ये दुग्ध व्यवसाय पूर्वीपासूनच...