Agriculture news in marathi Farmers' issues to be conveyed to the government: Governor Koshyari | Agrowon

शेतकऱ्यांचे प्रश्‍न शासनाकडे पोचवणार : राज्यपाल कोश्‍यारी

टीम अॅग्रोवन
शनिवार, 26 सप्टेंबर 2020

नाशिक : ‘‘मी देखील शेतकऱ्याचाच मुलगा आहे. कांदा निर्यातबंदी संदर्भातील शेतकरी व त्यांच्या अडचणी, भावना मी केंद्र आणि राज्य शासनाकडे पोहचविणार आहे. शेतकऱ्यांच्या अडचणी निश्चित मांडल्या जातील,’’ असे आश्‍वासन राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी दिले. 

नाशिक : ‘‘मी देखील शेतकऱ्याचाच मुलगा आहे. कांदा निर्यातबंदी संदर्भातील शेतकरी व त्यांच्या अडचणी, भावना मी केंद्र आणि राज्य शासनाकडे पोहचविणार आहे. शेतकऱ्यांच्या अडचणी निश्चित मांडल्या जातील,’’ असे आश्‍वासन राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी दिले. 

राज्यपालांचा सकारात्मक प्रतिसाद व चर्चेने शेतकरी संघर्ष संघटनेचे चर्चेअंती समाधान झाले,अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष हंसराज वडघुले यांनी दिली. कांदा निर्यातबंदी रद्द होण्याबाबत व केंद्र शासनाच्या नवीन विधेयकाच्या त्रुटींबाबत शेतकरी संघर्ष संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी (ता.२४) राज्यपाल कोश्‍यारी यांची भेट घेतली.

या शिष्टमंडळाशी जवळपास पाऊन तास राज्यपालांनी चर्चा केली. शेतकरी संघर्ष संघटनेचे अध्यक्ष हंसराज वडघुले, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष नाना बच्छाव, योगेश रायते, राम निकम, मनोज भारती, दीपक भदाणे, विनायक पवार, विद्या वेखंडे आदी उपस्थित होते.  

प्रत्येक वेळी शासन सोईनुसार धोरण राबविते. केंद्र सरकार एकीकडे जीवनाश्यक वस्तूंबाबत कायदा करते. दुसरीकडे कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेते, हा विरोधाभास का?, असा सवाल करुन करोनाच्या लॉकडाऊन काळात शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. कांदाप्रश्नी शेतकऱ्यांच्या हितासाठी निर्यातबंदी निर्णय मागे घेण्याबाबत केंद्र व राज्य सरकारच्या लक्षात आणून द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.

आंदोलन सुरु करणार 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन काळात शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. कांदाप्रश्नी शेतकऱ्यांच्या हितासाठी निर्यातबंदी मागे घेणे आवश्यक आहे. गेल्या काही दिवसांत शेतकऱ्यांचे झालेले नुकसान सरकारने भरून द्यावे. कारण, सध्या उत्पादनाचा खर्च देखील मिळत नाही, अशी परिस्थिती आहे.

शेतकरी विधेयकात शिवार खरेदी करताना शेतकऱ्याला आर्थिक संरक्षणाची, किमान आधारभूत किमतीची हमी असावी. त्याचा कायद्यांत अंतर्भाव व्हावा. निर्यातबंदी रद्द झाली पाहिजे. शेतकरी विधेयकात शेतकऱ्याला संरक्षण न मिळाल्यास राज्यात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.
 


इतर ताज्या घडामोडी
इगतपुरी, सिन्नर तालुक्यात पावसामुळे...नाशिक : दसरा व दिवाळी सणाची बाजारपेठ समोर ठेऊन...
सांगली जिल्ह्यात अतिवृष्टीचा १७ हजार...सांगली : जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपूर्वी...
खानदेशात दुष्काळी भागात मुबलक जलसाठा जळगाव ः खानदेशातील आवर्षप्रवण भागातील  ...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात साडेसहा हजार...सिंधुदुर्ग : जिल्ह्यात परतीच्या पावसाने नुकसान...
सांगली जिल्ह्यात द्राक्षबागा...सांगली : गेल्या वर्षी झालेल्या अतिवष्टीमुळे...
शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची प्रतीक्षाअकोला ः शासनाने शुक्रवारी (ता.२३) जाहीर...
पुण्यात दसऱ्यानिमित्त फुलबाजार फुलला पुणे ः कोरोना संकटामुळे मार्चपासून सलग पाच...
सोयाबीनमध्ये तेजीचाच कलअकोला ः या हंगामातील सोयाबीन काढणी जोरात सुरू...
‘पाटबंधारे’च्या मनमानीमुळे शेतकऱ्यांचे...नाशिक : गेल्या २५ वर्षांपासून बागलाण तालुक्यातील...
सातारा जिल्ह्यास पावसाने पुन्हा झोडपलेसातारा ः जिल्ह्यातील माण, खटाव, कऱ्हाड,...
कापूस, मका हमीभावाकडे दुर्लक्षः...जळगाव ः कापूस, मका हे राज्यात महत्त्वाचे पीक...
वनाधिपती विनायकदादा पाटील यांचे निधन नाशिक: स्थानिक पातळीवरून थेट राज्याच्या राजकारणात...
औरंगाबादमध्ये कांदा सरासरी ३५०० रुपये औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
राज्यातून मॉन्सून परतीच्या वाटेवर; पाऊस...महाराष्ट्रातून मॉन्सून बाहेर पडण्याच्या वाटेवर...
सांधेदुखी, सूजेवर आरोग्यदायी गोखरूगोखरू ही झुडूपवर्गीय वनस्पती आहे. या वनस्पतीला...
शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी प्रयत्न करु...सोलापूर : ‘‘अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतपिकांचे...
खानदेशात पावसाने दाणादाण सुरूचजळगाव ः खानदेशात गेले दोन दिवस अनेक भागात मध्यम...
जिगाव प्रकल्पग्रस्तांना मिळणार योग्य...बुलडाणा ः जिगाव प्रकल्पग्रस्तांना योग्य मोबदला...
सोलापुरात नुकसानग्रस्तांसाठी `रयत’चे...सोलापूर : सोलापूरसह संपूर्ण राज्यात अतिवृष्टीमुळे...
साताऱ्यात रब्बीची १२ टक्के क्षेत्रावर...सातारा : जिल्ह्यात परतीच्या पावसाने झोडपल्याने...