जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हरभऱ्याच्या चुकाऱ्यांची प्रतीक्षा

जालना : जिल्ह्यातील सहा खरेदी केंद्रांवरून ९३ हजार ३९० क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला. त्यांपैकी ४६ हजार ९१९ क्विंटल ६५ किलो हरभऱ्याचे चुकारे शेतकऱ्यांना देणे बाकी आहेत. त्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे.
Farmers in Jalna district are waiting for gram money
Farmers in Jalna district are waiting for gram money

जालना : जिल्ह्यातील सहा खरेदी केंद्रांवरून ९३ हजार ३९० क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला. त्यांपैकी ४६ हजार ९१९ क्विंटल ६५ किलो हरभऱ्याचे चुकारे शेतकऱ्यांना देणे बाकी आहेत. त्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे. 

हमी दराने हरभरा खरेदीसाठी जालना, अंबड, तीर्थपुरी, मंठा, भोकरदन, परतूर या सहा ठिकाणी हमी दर खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. २८ फेब्रुवारीपासून शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणी सुरु झाली. त्यात ८ हजार ७४६ शेतकऱ्यांनी नोंदणी केली. ३० जून अखेरपर्यंत ६ हजार ७१४ शेतकऱ्यांकडील ९३ हजार ३०९ क्विंटल ६५ किलो हरभऱ्याची ४८७५ रुपये प्रतिक्विंटल हमी दराने खरेदी करण्यात आली. ४५ कोटी ४८ लाख ८४ हजार ५४३ रुपये किमतीच्या या हरभऱ्यापैकी ३०९५ शेतकऱ्यांना ४६ हजार ३९० क्विंटल हरभऱ्याचे २२ कोटी ६१ लाख ५१ हजार २५० रुपये देण्यात आले. 

दरम्यान, अजूनही ३ हजार ६१९ शेतकऱ्यांना ४६ हजार ९१९ क्विंटल ६५ किलो हरभऱ्याचे २२ कोटी ८७ लाख ३३ हजार २९३ रुपये देणे बाकी असल्याची माहिती मार्केटिंग फेडरेशनच्या सूत्रांनी दिली.  १४ हजार क्विंटल मका खरेदी 

जिल्ह्यात सात ठिकाणी ३४४ शेतकऱ्यांकडील १४ हजार ४०८ क्विंटल ५० किलो मक्याची १ हजार ७६० रुपये प्रतिक्विंटलने खरेदी करण्यात आली. २ कोटी ५३ लाख ५८ हजार ९६० रुपये किमतीच्या या मक्यापैकी ११ हजार ५९९ क्विंटल मका शासनाच्या ताब्यात देण्यात आला. तर, २ हजार ८०९ क्विंटल मका शासनाच्या ताब्यात देणे बाकी आहे.  तुरीची ३४ हजार क्विंटल खरेदी 

जिल्ह्यातील ६ केंद्रांवरून ४ हजार ९९१ शेतकऱ्यांकडील ३४ हजार ९५३ क्विंटल ६६ किलो तूर ५८०० रुपये प्रति क्विंटल या हमी दराने खरेदी करण्यात आली. २० कोटी २७ लाख ३१ हजार २२८ रुपये किमतीच्या या तुरीपैकी ३४ हजार ६३१ क्विंटल ५० किलो तूर गोडाउनमध्ये साठविण्यात आली. २९२ क्विंटल १६ किलो तूर अजूनही गोडाउनमध्ये साठविणे बाकी असल्याची माहिती मार्केटिंग फेडरेशनच्या वतीने देण्यात आली.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com