agriculture news in marathi, The farmers of Jalna district can get insurance within ten days | Agrowon

जालना : शेतकऱ्यांना दहा दिवसांत विमा परतावा वर्ग होणार
टीम अॅग्रोवन
शनिवार, 8 जून 2019

जालना : मंजूर होऊनही न मिळालेल्या टाटा एआयजी विमा कंपनीकडील विमा परतावा येत्या दहा दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होईल. खरीप पीकविमा परताव्यासंदर्भात येत्या १२ जूनला जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात येईल, असे आश्‍वासन कृषी विभागातर्फे विजय माईनकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गुरुवारी (ता. ६) धरणे देणाऱ्या शेतकरी संघर्ष समितीला दिले. त्यानंतर धरणे आंदोलन स्थगित करण्यात आले. 

जालना : मंजूर होऊनही न मिळालेल्या टाटा एआयजी विमा कंपनीकडील विमा परतावा येत्या दहा दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होईल. खरीप पीकविमा परताव्यासंदर्भात येत्या १२ जूनला जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात येईल, असे आश्‍वासन कृषी विभागातर्फे विजय माईनकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गुरुवारी (ता. ६) धरणे देणाऱ्या शेतकरी संघर्ष समितीला दिले. त्यानंतर धरणे आंदोलन स्थगित करण्यात आले. 

दुष्काळी स्थिती असूनही खरिपाचा पीकविमा नामंजूर केल्याप्रकरणी न्याय मिळण्यासाठी शेतकरी संघर्ष समीती जालनातर्फे गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. जिल्ह्यातील मुख्य पीक असलेल्या कापूस, सोयाबीन आणि तूर, मोसंबी फळपीक विमा रक्कम तत्काळ शेतकऱ्यांना द्यावी, या मागणीसाठी हे आंदोलन झाले. यासंदर्भात १ जूनला जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

जून २०१८ चा टाटा एआयजी विमा कंपनीने मोसंबी पिकाचा विमा घेतला होता. तो मंजूरही झाला. त्यापैकी १४२० शेतकरी अजूनही विमा रक्‍कम मिळण्यापासून वंचित आहेत. कंपनीने फेर पंचनामे करून १४२० शेतकऱ्यांना विमा रक्‍कम देण्याचे मान्य केले. परंतु दहा महिने लोटूनही विम्याचा परतावा मिळाला नाही. खरीप २०१८ मध्ये आयसीआयसीआय लोंबार्ड कंपनीने सर्व खरीप पिकाचा विमा भरणा करून घेतला. मात्र फक्‍त मूग, बाजरीचा विमा मंजूर केला.

माईनकर यांनी धरणे देणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. चर्चेअंती मृग बहरांतर्गत विमा परतावा न मिळालेल्या शेतकऱ्यांना येत्या दहा दिवसांत परतवा खात्यावर देण्याचे मान्य करण्यात आले. तसे आश्‍वासन विमा कंपनीतर्फेही देण्यात आले. त्यानंतर आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या रमेश तारगे, सुरेश काळे आदींनी धरणे आंदोलन थांबविण्यात आल्याची माहिती दिली.

इतर ताज्या घडामोडी
सुप्रसिद्ध पैलवान दादू चौगुले यांचे निधनकोल्हापूर : हिंदकेसरी, रुस्तुम ए हिंद, महाराष्ट्र...
उजनी धरणातून भीमा नदीत पुन्हा ३० हजार...सोलापूर  ः पुणे जिल्ह्यात पावसाने पुन्हा...
राजापूर, रत्नागिरी, संगमेश्‍वर...रत्नागिरी  ः राजापूर, रत्नागिरीसह संगमेश्‍वर...
कापूस उत्पादकता वाढीसाठी शासनाने...अकोला : महाराष्ट्रात कापूस लागवड क्षेत्र...
पुणे जिल्हयात हलक्या ते मध्यम पावसाची...पुणे : गेल्या दोन दिवसांपासून पावसासाठी पोषक...
मंगळ, चंद्रसदृश मातीमध्ये पिकांचे...नासा या अमेरिकन अवकाश संशोधन संस्थेने चंद्र आणि...
पुणे जिल्ह्यात तीन लाख हेक्टरवर रब्बी...पुणे : मॉन्सूनच्या अंतिम टप्प्यातील पावसाने...
नगर जिल्हा परिषदेमध्ये दूरध्वनीवरील...नगर  : पाणी येत नाही. शिक्षक शाळेत उशिरा...
विधानसभा निवडणुकीसाठी प्रचारतोफा...मुंबई : चौदाव्या विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी...
घाटशीळ पारगाव प्रकल्प कोरडानगर : जिल्ह्यात यंदा पावसाळा संपत आला तरी अजून...
उमेदवारी देऊन केलेली चूक सुधारा : पवारसातारा : ‘‘वरुणराजानेही आपल्याला आशीर्वाद दिले...
काकडा परिसरात सोयाबीन काढणीच्या...काकडा, अमरावती ः परिसरात सोयाबीन...
अकोला येथे पावसाळी वातावरणाने...अकोला ः गेल्या २४ तासांपासून या भागात...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात वावडिंग खरेदी सुरू सिंधुदुर्ग  ः बहुउपयोगी वावडिंग खरेदीला...
पट्टणकोडोलीला ‘इट्टल-बिरोबाच्या नावानं...पट्टणकोडोली, जि. कोल्हापूर  : ‘इट्टल-...
विश्रांतीनंतर सोलापुरात पुन्हा सर्वदूर...सोलापूर  ः गेल्या काही दिवसांच्या...
शेतकरी, जनतेच्या प्रश्नांची उत्तरे...नगर  : राज्यात पाच वर्षांत १६ हजार शेतकरी...
महायुतीला ऐतिहासिक विजय मिळेल ः...मुंबई ः केंद्र आणि महाराष्ट्रातील भाजप-शिवसेना...
आपण विजयाचा जल्लोष साजरा करू ः...नागपूर : मतदानाचा दिवस युद्धदिन समजून...
भाजप-शिवसेनेने पाच वर्षे  फक्त थापा...मुंबई : पाच वर्षे ज्यांनी विविध आश्वासने...