agriculture news in Marathi farmers from kandar exported 60 ton banana Maharashtra | Agrowon

संकटातही कंदरच्या शेतकऱ्यांकडून आखातात ६० टन केळी निर्यात !

टीम अॅग्रोवन
सोमवार, 30 मार्च 2020

सोलापूर जिल्ह्यातील कंदर (ता. करमाळा) येथील प्रगतीशील केळी उत्पादक व निर्यातदार प्रवीण डोके यांनी कोरोना विषाणूच्या संकटातही आखातात ६० टन केळीची यशस्वी निर्यात केली आहे.

पुणेः सोलापूर जिल्ह्यातील कंदर (ता. करमाळा) येथील प्रगतीशील केळी उत्पादक व निर्यातदार प्रवीण डोके यांनी कोरोना विषाणूच्या संकटातही आखातात ६० टन केळीची यशस्वी निर्यात केली आहे. शनिवारी (ता. २८) कंदरहून तीन कंटेनर्स् इराणला रवाना झाले आहेत. यात डोके यांच्यासह १० शेतकऱ्यांच्या मालाचा समावेश आहे.

सोलापूर जिल्ह्यातील कंदर (ता. करमाळा) येथील प्रवीण डोके यांनी ‘सन स्टार एवन’ नावाची शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन केली आहे. कंपनीचे सुमारे ६० सभासद आहेत. डोके यांनी २००७ मध्ये केडी फ्रूटस नावाने निर्यातविषयक कंपनीही स्थापन केली आहे. 

डोके यांची एकूण संयुक्त कुटूंबाची ३५ एकर शेती आहे. त्यात सुमारे २० ते २५ एकर केळीचे पीक असते. त्यांच्याकडे १०० टन क्षमतेचे कोल्ड स्टोरेज व पॅकहाऊस यांचीही व्यवस्था आहे. दरवर्षी स्वतःच्या कंपनीतर्फे डोके सुमारे १०० ते १५० कंटेनर्स केळीची निर्यात करतात. अन्य निर्यातदार कंपन्यांसाठी देखील प्रक्रिया सुविधा देतात. 

श्री. डोके म्हणाले, की कंदर व परिसरातील भागात केळीचे क्षेत्र अंदाजे सहा हजार हेक्टरपर्यंत आहे. वर्षाला सुमारे साडेचार लाख टनांपर्यंत केळी उत्पादन होते. आमच्या भागातील केळीची सर्वत्र ओळख तयार झाली आहे. कोरोना संकटामुळे केळी उत्पादक प्रचंड संकटात सापडले आहेत. दर किलोला ४ ते ५ रूपयांपर्यंत घसरले आहेत. ग्राहक बाजारपेठेत मात्र हे दर कमी नसून ते चढेच आहेत. 

आखाती देशांत निर्यातीचे प्रयत्न  
‘‘कोरोना संकटाच्या काळात केळीला किलोला किमान ७ ते ८ रूपये दर मिळावा या हेतूने आम्ही आखाती देशांमध्ये सागरी मार्गाने निर्यात करण्याचे प्रयत्न सुरू केले. केडी फ्रूटस कंपनीच्या वतीने शनिवारी (ता. २८) तीन कंटेनर्समधून ६० टन केळी कंदरहून इराणला रवाना केली. यात सुमारे १० शेतकऱ्यांच्या मालाचा समावेश आहे. कोरोना संकटामुळे निर्यात साखळी, वाहतूक, मजूर, सरकारी कागदपत्रे, प्रमाणपत्रे अशा समस्यांचा समना करावा लागत आहे. या सर्व समस्यांमधून यशस्वी निर्यात केल्याचे समाधान आहे. पुढील तीन दिवसांत अजून दोन ते तीन कंटेनर किंवा आठवड्याला दहापर्यंत कंटेनर्स आखाती देशांमध्ये पाठवण्याचा प्रयत्न आहे,’’ असे श्री. डोके यांनी सांगितले.  

निर्यात वाढविण्याचे प्रयत्न
श्री. डोके म्हणाले, कि रमजानचा सण पुढील महिन्यावर येऊन ठेपला आहे. या अनुषंगाने आखाती देशांत केळीला मागणी वाढली आहे. मात्र कोरोना संकटामुळे मागणीएवढा पुरवठा होणे सगळीकडूनच अशक्य झाले आहे. ओमान, सौदी अरेबिया, दुबई किंवा एकूणच अरही देशांत केळी पाठवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. सध्या सागरी मार्गाने निर्यात करण्यासाठी प्रति कंटेनर पूर्वी असलेले फ्रेट शुल्क १३०० डॉलरवरून १७०० डॉलरवर पोचले आहे. मात्र केळीला मागणी चांगली आहे व दरही टिकून आहेत.   

शेतकऱ्यांना खुपच कमी दर
सध्या बाजारात केळी डझनाला ६० रूपयाने ग्राहकांना विक्री केली जात आहे. व्यापारी किंवा मध्यस्थ मात्र केवळ तीन ते चार रूपये एवढ्या मातीमोल दराने आमच्याकडून केळी खरेदी करीत आहे. वर्षभर मोठे कष्ट करून दर्जेदार केळी पिकवणाऱ्या शेतकऱ्याला मात्र कोणीही वाली उरलेला नाही. त्याच्या हाती मोठे आर्थिक नुकसानच पडणार आहे. 

निर्यातीसाठी शासनाने द्याव्यात सुविधा 
‘‘पडलेल्या दराच्या या काळात निर्यात हा एक चांगला पर्याय आहे. निर्यातीसाठी लागणारे बॉक्स, बॅग्ज व अन्य साहित्य अत्यावश्यक सेवेत आणून सरकारने ते पुरेसे व योग्य वेळेत उपलब्ध केले तरच निर्यात सुकर होईल. सद्यस्थितीत आमच्याकडे बॉक्सचा साठा असल्याने निर्यातीत अडचण आली नाही. मात्र भविष्यात हे संकट उभे राहणार आहे,’’ असे डोके यांनी सांगितले. 


इतर अॅग्रो विशेष
मराठवाड्यात जोरदार पावसाचा पिकांना फटकाऔरंगाबाद, परभणी : औरंगाबाद, जालना, बीड, लातूर,...
हजारो टन कांदा निर्यातीच्या प्रतीक्षेतमुंबई/नाशिक : देशभरात कांदा निर्यातबंदी...
बीटी वांग्याच्या दुसऱ्या टप्प्यातील...पुणे : देशभरात चर्चेत असलेल्या बीटी वांग्याच्या...
साखर निर्यातीचे करार ५७ लाख टनांवरकोल्हापूर : देशातल्या साखर निर्यातीचे करार आता ५७...
तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यतापुणे ः बंगालचा उपसागर व उत्तर तामिळनाडूच्या...
दूध सल्लागार समिती कागदावरचपुणे : राज्यस्तरीय दूध सल्लागार समितीची एकही बैठक...
राज्यात मोसंबी १००० ते ४००० रुपये...औरंगाबादमध्ये १००० ते २५०० रुपये प्रतिक्विंटल...
कांदा, लसूण शेतीत बहिरवाडीने मिळवली...बहिरवाडी (ता. जि. नगर) हे छोटे गाव कांदा व लसूण...
स्पर्धेत टिकण्यासाठी ‘ई-नाम’केंद्र सरकारने कृषी, पणन व्यवस्थेत सुधारणा घडवून...
बाजार सुधारणांत नको राजकीय धुळवडकोरोनाच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या संसद...
सुपारी फळगळीचे संकटसिंधुदुर्ग: मुसळधार झालेला पाऊस आणि सतत ढगाळ...
कोकण, मराठवाड्यात पावसाची शक्यतापुणे ः गेल्या काही दिवसांपासून राज्यातील काही...
कांदा निर्यातबंदीविरोधात मराठवाड्यातही...औरंगाबाद/परभणी: केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी...
निर्यातबंदीमुळे कांदा दरात मोठी घसरणनाशिक: केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी केल्याचा...
कांदा निर्यातबंदी विरोधात नाशिक...नाशिक: प्रतिकूल हवामान, वाढलेला उत्पादन खर्च व...
‘स्मार्ट’च्या २८ पथदर्शक प्रकल्पांना...पुणे: कृषी खात्याच्या ‘स्मार्ट’ प्रकल्पातून...
सांगली जिल्ह्यात द्राक्ष फळ छाटणी...सांगली ः जिल्ह्यात सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात...
मराठवाड्यात पावसाचा जोर कायमपुणे ः गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील...
राज्यात तीन वर्षांत ‘ई-नाम’द्वारे ...पुणे: केंद्र सरकारने सुरु केलेल्या राष्ट्रीय...
दर्जेदार रोपनिर्मिती पेपरपॉट, पीट मॉसचा...रोपनिर्मिती चांगल्या प्रकारे होण्यासाठी...