कानशिवणी येथे बिबट्याच्या दहशतीमुळे शेतकरी  धास्तावले 

कानशिवणी येथे बिबट्याच्या दहशतीमुळे शेतकरी  धास्तावले 
कानशिवणी येथे बिबट्याच्या दहशतीमुळे शेतकरी  धास्तावले 

कानशिवणी, जि. अकोला  ः टाकळी छबिले, कानशिवणी, देवळी, खांबोरा परिसरांत एक बिबट्या व दोन बछडे अनेकांच्या दृष्टीस पडले.परिणामी या भागातील गावांमध्ये बिबट्याची दहशत तयार झाली असून, भीतिपोटी ग्रामस्थांचे जनजीवन विस्कळित झाले आहे.  दरम्यान बिबट्याने टाकळी शेतशिवारात एका शेळीला फस्त केले होते, तर गुराख्यावर झेप घेतल्याचा प्रकार घडला होता. २ सप्टेंबर रोजी टाकळी छबिले शेतशिवारात नंदू छबिले यांच्या कालवडीला फस्त केल्याचे दिसून आले. गणेश छबिले यांच्या तीन शेळ्यांना फस्त केल्या. या घटनेनंतर वन विभागाकडून पंचनामा करून वन्य प्राण्याची ट्रॅक कॅमेरे लावून शोध मोहीम राबविण्यात आली. ५ सप्टेंबरला कॅमेऱ्यात बिबट्या कैदसुद्धा झाला. वन विभागाने सात सप्टेंबरला बिबट्या जेरबंद करण्यासाठी पिंजरासुद्धा लावाल आहे मात्र अजून बिबट्या पकजला न गेल्याने परिसरात दहशत कायम आहे.  

शेतीची कामे रखडली रब्बीसाठी शेतीच्या मशागतीची कामे तोंडावर आली आहेत. बिबट्याच्या वावरामुले परिसारात  दहशत असून  शेतीकामे खोळंबली आहेत. शिक्षणासाठी दररोज कानशिवणी येथे तीन किलोमीटर ये-जा करणारे विद्यार्थीसुद्धा बिबट्याच्या दहशतीतच शाळेत जात आहेत. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com