Agriculture news in Marathi Farmers in Kavathemahankal waiting for help | Agrowon

कवठेमहांकाळमधील शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 25 डिसेंबर 2020

दिवाळी होऊन महिना उलटत आला तरी शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा झाली नाही. तालुक्‍यातील साठ गावांपैकी केवळ १५ गावांमधील ६ हजार ४०० शेतकऱ्यांच्या खात्यावर १ कोटी ९८ लाख रुपये वर्ग झाले. उर्वरित ४५ गावांमधील ९ हजार १५२ शेतकरी अद्याप नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत.

कवठेमहांकाळ, जि. सांगली : तालुक्‍यात गेल्या दोन तीन महिन्यांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे प्रचंड नुकसान झाले होते. दिवाळीला शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे वर्ग करणार, असे शासनाने जाहीर केले होते. मात्र दिवाळी होऊन महिना उलटत आला तरी शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा झाली नाही. तालुक्‍यातील साठ गावांपैकी केवळ १५ गावांमधील ६ हजार ४०० शेतकऱ्यांच्या खात्यावर १ कोटी ९८ लाख रुपये वर्ग झाले. उर्वरित ४५ गावांमधील ९ हजार १५२ शेतकरी अद्याप नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत.

तालुक्‍यात पावसाने जोरदार तडाखा दिला. त्यामुळे शेतकऱ्यांचे द्राक्षबागा, उसासह इतर कडधान्य पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अवकाळी पावसामुळे पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश शासनाने कृषी विभाग व तलाठ्यांना दिले. तालुक्‍यात ६० गावांमधील तब्बल १५ हजार ५५२ शेतकऱ्यांचे ४ हजार ३३२ हेक्‍टरवर पंचनामे पूर्ण झाले. पंचनामे पूर्ण केल्यामुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये आशेचा किरण निर्माण झाला. पावसामुळे झालेली नुकसान भरपाई लवकर शेतकऱ्यांना मिळेल, अशी आशा वाटत होती. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना सर्व रक्कम खात्यावर जमा करू, असे आश्वासन शासनाने दिले. मात्र दिवाळीनंतर महिना उलटला तरी अद्याप काही शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा झाली नाही.

तालुक्‍यात अतिवृष्टीच्या पावसामुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसान भरपाई संबंधित शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग करण्यासाठी वरिष्ठ कार्यालयाला निधीची मागणी केली आहे. अद्याप निधी उपलब्ध झाला नाही. निधी उपलब्ध झाल्यास तत्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रथम वर्ग केला जाईल.
बी. जे. गोरे, तहसीलदार, कवठेमहांकाळ.

तालुक्‍यातील अतिवृष्टीच्या पावसामुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईची निधीची मागणी केली आहे लवकरच दुसऱ्या टप्प्यात निधी मिळाल्यास संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होईल.
- एम. जे. तोडकर
तालुका कृषी अधिकारी, कवठेमहांकाळ.


इतर ताज्या घडामोडी
सोयाबीन पेंडची आयात शुल्काविना करावीनागपूर : भारतात सोयाबीन पेंडचे दर गगनाला...
दूधदरात पुन्हा दोन रुपयांची कपातनगर ः कोरोना संसर्ग वरचेवर वाढत असल्याने लॉकडाउन...
देशातील पहिले कृषी निर्यात मार्गदर्शन...पुणे ः राज्यातील शेतकरी व उदयोन्मुख...
उत्तर भारतातील कापूस लागवड पूर्णत्वाकडेजळगाव ः देशात उत्तर भारतातील कापूस लागवडीने वेग...
कृषी खात्यातील बदल्या लांबणीवरपुणे ः ऐन कोरोना कालावधीत बदल्यांचा घाट रचलेल्या...
खाद्यतेल दरात गतवर्षीपेक्षा ८० टक्के वाढनागपूर : शेंगदाण्याची निर्यात तसेच पाम तेलावरील...
पूर्व विदर्भात ४५ लाख क्विंटल धान खराब...गोंदिया : भात उत्पादक पूर्व विदर्भातील पाच...
पशुवैद्यक करणार घरपोच सेवा बंदनागपूर : पशुवैद्यकांना फ्रंटलाइन वर्कर्स व कोरोना...
सोयाबीन बियाणे निर्बंध मध्य प्रदेशकडून...पुणे ः परराज्यांत सोयाबीन बियाणे विक्रीवर निर्बंध...
‘महाबीज’चे सोयाबीन बियाणे दर ‘जैसे थे’अकोला : खरीप हंगामासाठी ‘महाबीज’ने सोयाबीन...
देशाच्या तुलनेत निम्मी साखर एकट्या...कोल्हापूर : देशाच्या साखरनिर्यात कोट्यापैकी जवळ...
‘गोकुळ’चा कल सत्तांतराकडेकोल्हापूर : अत्यंत चुरशीने झालेल्या कोल्हापूर...
‘सह्याद्री’च्या पर्वतरांगेमधून...नाशिक : सह्याद्रीच्या पर्वतरांगेत पश्‍चिम घाट...
राज्यात आंब्याचा हंगाम ऐन बहरातअकोल्यात बदाम आंबा ४००० ते ४५०० रुपये क्विंटल...
सोशल मीडियाद्वारे ६५ टन कलिंगड विक्रीपुणे : कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी एप्रिल...
मध्य प्रदेश सरकारकडून बियाणे विक्रीवर...पुणे ः सोयाबीन बीजोत्पादनात देशात सर्वात मोठा...
पशुखाद्य निर्मितीचा कच्चा माल दुपटीने...सांगली : पशुखाद्य तयार करण्यासाठी लागणाऱ्या...
दक्षिण भागात गारपिटीची शक्यतापुणे :  गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा चटका...
परभणी जिल्ह्यात कडक निर्बंध लागूपरभणी ः  कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी...
परभणी जिल्ह्यात लघु तलावांत सरासरी १९...परभणी ः वाढते तापमान, बाष्पीभवनाचा वाढलेला वेग,...