किसान सन्मान योजनेपासून कोरपना तालुक्‍यातील शेतकरी वंचित

किसान सन्मान योजनेपासून कोरपना तालुक्‍यातील शेतकरी वंचित
किसान सन्मान योजनेपासून कोरपना तालुक्‍यातील शेतकरी वंचित

चंद्रपूर  ः कोरपना तालुक्‍यातील हजारो शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेपासून वंचित आहेत. त्यांच्या खात्यात या योजनेचे पैसे जमा व्हावे, अशा मागणीचे निवेदन भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा सचिव आशिष ताजने यांच्या नेतृत्वता नायब तहसीलदारांना देण्यात आले.  प्रधानमंत्री किसान सन्मान योजना १ डिसेंबर २०१८ पासून राज्यात राबविली जात आहे. दर चार महिन्यांनी दोन हजार रुपये याप्रमाणे एकूण तीन हप्त्यांत सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यांत जमा करण्याचे या योजनेत प्रस्तावीत आहे. परंतु, कोरपना तालुक्‍यातील अनेक शेतकऱ्यांच्या खात्यांत एक वर्ष लोटल्यानंतरही एक हप्ताही जमा झालेला नाही. शेतकरी या संदर्भाने वारंवार आपले सरकार सेवा केंद्र तसेच तहसील कार्यालयात जाऊन याबाबत विचारणा करीत आहेत. परंतु, तांत्रिक अडचण असल्याचे सांगून त्यांची बोळवण करण्यावर या दोन्ही ठिकाणी भर दिला गेला आहे. शेतकऱ्यांमध्ये या कारणांमुळे रोष निर्माण झाला आहे. त्यामुळेच त्यांनी याबाबत भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा सचिव आशिष ताजने यांना हस्तक्षेप करीत न्याय देण्याची मागणी केली. त्यानुसार कोरपना तहसीलवर शेतकऱ्यांसह जात नायब तहसीलदारांना या विषयावर निवेदन देण्यात आले. येत्या काही दिवसांत तांत्रिक अडचण दूर करून योजनेचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाईल व ज्या शेतकऱ्यांना आधार कार्ड किंवा खाते क्रमांकामध्ये त्रुटी असतील त्यांनी सेतू केंद्र किंवा तहसील कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन नायब तहसीलदार कौलवकर यांनी केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com