agriculture news in Marathi, farmers less response for sugar instead of FRP, Maharashtra | Agrowon

एफआरपी बदल्यात साखर घेण्यास थंड प्रतिसाद
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 12 फेब्रुवारी 2019

कोल्हापूर : उर्वरित एफआरपीच्या बदल्यात साखर घेण्याची तयारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दाखविली असली, तरी उत्पादकांनी मात्र याला थंड प्रतिसाद दिला आहे. दक्षिण महाराष्ट्रातील कोणत्याच कारखान्याकडे शेतकऱ्यांनी साखरेची मागणी न केल्याने हा प्रश्‍न तसा अनुत्तरितच राहिला आहे. 

कोल्हापूर : उर्वरित एफआरपीच्या बदल्यात साखर घेण्याची तयारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दाखविली असली, तरी उत्पादकांनी मात्र याला थंड प्रतिसाद दिला आहे. दक्षिण महाराष्ट्रातील कोणत्याच कारखान्याकडे शेतकऱ्यांनी साखरेची मागणी न केल्याने हा प्रश्‍न तसा अनुत्तरितच राहिला आहे. 

कारखान्यांकडून साखर घेऊन इतरांना विकणे तांत्रिकदृष्ट्या शक्‍य होत नसल्याची सध्याची ऊस पट्ट्यातील स्थिती आहे. यातच काही कारखाने लेखी अर्ज लिहून घेत असल्याचे प्रकार उघडकीस येत असल्याने शेतकऱ्यांनी उर्वरित एफआरपीसाठी वाट पाहणेच पसंत केल्याचे सध्याचे चित्र आहे. स्वाभिमानी आयुक्तालयांकडून उर्वरित एफआरपीच्या बदल्यात साखर देण्याचे आदेश काढून घेण्यात यशस्वी झाली असली तरी, साखर मागणीसाठी मात्र उत्पादकांना तयार करण्यास स्वाभिमानीपुढे मोठ्या अडचणी येत आहेत. एकदा साखर घेतली की ती विकायची कोठे आणि कशी हाही प्रश्‍न आहे. 

उसाचे क्षेत्र मोठे असलेल्या शेतकऱ्यांना उर्वरित रक्कमेच्या बदल्यात मोठ्या प्रमाणात साखर उपलब्ध होणार आहे. परंतु ती कारखान्यांकडून आणने त्याची साठवणूक करणे आणि त्याची विक्री परवडणाऱ्या दरात करणे हे मोठे आव्हान असल्याने उत्पाकांनी साखरेला नापसंती दाखवल्याचे चित्र ऊस पट्ट्यात आहे. कारखान्यांनी आठ दिवसांपूर्वी एकत्र याबाबतचे निवेदन वृत्तपत्रात देण्याचे ठरविले होते. यानुसार काही कारखान्यांनी हे निवेदन प्रसिद्धीसही दिले.

परंतु ज्या तडफेने साखरेची मागणी स्वाभिमानीकडून करण्यात आली तितक्‍याच उत्साहाने शेतकरी कारखान्याकडे साखर मागणी करण्यास धजावत नसल्याने आता ज्या वेळी रकमेची तरतूद होइल तितक्‍याच प्रमाणात उर्वरित हप्ते शेतकऱ्यांना मिळतील, अशी शक्‍यता निर्माण झाली आहे. 

साखर घेणे तांत्रिकदृष्ट्या अशक्‍य
‘‘काही उत्पादकांशी याबाबत संपर्क साधला असता उर्वरित एफआरपीसाठीचा लढा जरी योग्य असला तरी साखर विकत घेताना अनेक अडचणी येणार असल्याने आम्ही उर्वरित रक्कमेसाठी वाट पाहू,’’ असे बहुतांशी उत्पादकांनी सांगितले. जीएसटीसह अन्य अधिभार लावलेली साखर विकत घेणे आणि ती तेवढ्याच दराने विकणे हे अशक्‍य आहे. बाजारातील काही व्यापारी २९०० रुपयांच्या खालीच साखर विकत घेण्यास तयार आहेत. यामुळे तुम्हाला परवडत असेल तर द्या, अशी अटच व्यापाऱ्यांकडून घातली जात असल्याने शेतकरीही तातडीने साखरेची मागणी नोंदवण्यासाठी तयार नाहीत. काही कारखान्यांनी हा व्यवहार कागदावर लिहून घेण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. हे झंझटच नको म्हणून ऊस उत्पादक शेतकरी कारखाने देतील त्या पहिल्या हप्त्यावर शांत असल्याचे सध्याचे चित्र आहे. कोणत्याच कारखान्याकडे एखाद्या कारखान्याचा अपवाद वगळता एक ही अर्ज नसल्याचे कारखान्यांच्या सूत्रांनी सांगितले

इतर बातम्या
देशात सोयाबीन लागवडीत ११ टक्के घटनवी दिल्ली : देशातील महत्त्वाच्या सोयाबीन...
भारताची चंद्राला पुन्हा गवसणी;...श्रीहरिकोटा : चंद्राच्या अप्रकाशित भागावर प्रकाश...
महात्मा फुले कृषी विद्यापीठाला देशात...नगर ः नवी दिल्ली येथील भारतीय कृषी संशोधन...
व्यापाऱ्याकडून द्राक्ष उत्पादकांची तीन...नाशिक: ओझर येथील आदित्य अ‍ॅग्रो एक्स्पोर्ट या...
‘कन्या वनसमृद्धी योजने’अंतर्गत शेतकरी...मुंबई : शेतकरी कुटुंबात मुलगी जन्माला आली तर...
ड्रोन तंत्रज्ञानाच्या वापराबाबत `...अकोला ः कृषी क्षेत्रात ड्रोन तंत्रज्ञानाचा...
कृषी विभागाकडून परीक्षा शुल्क परतीसाठी...अमरावती ः परीक्षा शुल्क परतीसाठी पोस्टेज खर्च सात...
सूतगिरण्या तीन दिवस बंद करण्याची वेळजळगाव ः चीन, युरोपातील सूत निर्यात जवळपास ठप्प...
राज्यात अवघा २५ टक्के पाणीसाठापुणे : जुलै महिना संपत आला, तरीही पावसाने...
गुरुवारपासून पावसाचा जोर वाढण्याची...पुणे: राज्याच्या बहुतांशी भागांत पावसाने उघडीप...
वणव्यामुळे पतंग, वनस्पतींच्या प्रजाती...जंगलामध्ये लागणाऱ्या वणव्याचे परागीकरण करणाऱ्या...
दुष्काळी स्थितीमुळे संत्रा बागांचे...शेलूबाजार जि. वाशीम ः निसर्गाच्या दुष्टचक्रामुळे...
नांदेड, परभणी जिल्ह्यांतील अकरा मंडळांत...नांदेड :  नांदेड, परभणी जिल्ह्यांतील ११...
कोल्हापूर जिल्ह्यातील धरणे निम्मी भरली कोल्हापूर : जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला असला...
सांगली जिल्हा दुष्काळाच्या छायेतसांगली : पावसाळ्याचा दीड महिन्याचा कालावधी लोटला...
नाशिक जिल्ह्यात पावसाचे पुनरागमननाशिक : जिल्ह्यात पावसाने उघडीप दिल्यामुळे...
वाशीम जिल्ह्यात ‘सुजलाम सुफलाम’मधून २९७...वाशीम ः सुजलाम सुफलाम दुष्काळमुक्त महाराष्ट्र...
रत्नागिरीतील आठ धरणांची होणार तपासणीरत्नागिरी : ‘‘तिवरे धरण फुटल्यानंतर जिल्ह्यातील...
साक्री तालुक्यात दुष्काळाची शक्यतासाक्री, जि. धुळे : पाण्याचे स्रोत आटत आहेत. पाऊस...
मराठवाड्यातील २६६ मंडळांमध्ये पाऊसऔरंगाबाद/नांदेड ः मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांतील ६३...