Agriculture news in marathi, Farmers' Lessons to Guaranteed Shopping Centers | Agrowon

हमीभाव खरेदी केंद्राकडे शेतकऱ्यांची पाठ

टीम अॅग्रोवन
बुधवार, 23 ऑक्टोबर 2019

सोलापूर  : मूग, उडीद, सोयाबीनची हमीभावाने खरेदी करण्यासाठी दुधनी (ता. अक्‍कलकोट) आणि मंगळवेढा या ठिकाणी हमीभाव खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली. त्याठिकाणी १ सप्टेंबरपासून नोंदणी सुरू आहे. मूग व उडदासाठीची मुदत ३१ ऑक्‍टोबरपर्यंत, तर सोयाबीनची नोंदणी १५ नोव्हेंबरपर्यंत आहे. दरम्यान, मागील दोन महिन्यांत केवळ १८ शेतकऱ्यांनीच नोंदणी केली आहे. त्यामुळे या केंद्रांकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवल्याचे चित्र आहे.

सोलापूर  : मूग, उडीद, सोयाबीनची हमीभावाने खरेदी करण्यासाठी दुधनी (ता. अक्‍कलकोट) आणि मंगळवेढा या ठिकाणी हमीभाव खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली. त्याठिकाणी १ सप्टेंबरपासून नोंदणी सुरू आहे. मूग व उडदासाठीची मुदत ३१ ऑक्‍टोबरपर्यंत, तर सोयाबीनची नोंदणी १५ नोव्हेंबरपर्यंत आहे. दरम्यान, मागील दोन महिन्यांत केवळ १८ शेतकऱ्यांनीच नोंदणी केली आहे. त्यामुळे या केंद्रांकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवल्याचे चित्र आहे.

मागील वर्षीचा दुष्काळ अन्‌ यंदा पावसाने लावलेल्या विलंबाचा परिणाम मूग, सोयाबीन, उडीदाच्या उत्पन्नावर झाला. त्यातच पुन्हा सोयाबीन, मूग, उडीद काढणीला आल्यानंतर पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे हातातोंडाशी आलेले पीक वाया गेल्याचेही चित्र काही भागांत आहे. पावसामुळे पिके हातची गेली असून, त्यावर काळे डाग पडले आहेत. दुसरीकडे बाजारात मूग, सोयाबीन, उडदाला ज्यादा दर असल्यानेही शेतकऱ्यांनी पाठ फिरवल्याचे दिसते. 

यंदाच्या वर्षी पाऊस आणि आपत्तीमुळे होणारी उत्पादनातील संभाव्य घट अन्‌ शेतकऱ्यांची उदासिनता पाहून नोंदणीला १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली. १ सप्टेंबरपासून नोंदणी सुरू झाली असून आतापर्यंत दुधनीतील १८ शेतकऱ्यांनी मुगासाठी नोंदणी केली आहे. उडीद, सोयाबीनची नोंदणी काहीच नसल्याची माहिती जिल्हा मार्केटिंग अधिकारी बी. बी. वाडीकर यांनी दिली.  
हमीभाव खरेदी केंद्रावर मुगाला प्रतिक्‍विंटल सात हजार ५० रुपये, उडदाला पाच हजार ७००, तर सोयाबीनसाठी तीन हजार ७१० रुपयांचा दर आहे.


इतर ताज्या घडामोडी
सार्वजनिक पैदास कार्यक्रमांचे प्रमाण...फळपिकातील नव्या जातींच्या पैदास कार्यक्रमांचे...
नगरमध्ये पीककर्ज वितरणात जिल्हा बॅंकच...नगर ः नगर जिल्ह्यात खरीप हंगामात आत्तापर्यंत खरीप...
`रानभाज्या खा, रोगप्रतिकार शक्ती वाढवा`सोलापूर : माहिती असलेल्या पालेभाज्या, फळभाज्या...
वेळीच ओळखा टोमॅटोमधील विकृतीभाजीपाला पिके ही अन्य पिकांच्या तुलनेत नाजूक...
गिरणा नदीवरील बलून बंधारे प्रकल्पाला...जळगाव  : केंद्र सरकारचा प्रायोगीक प्रकल्प...
परभणी जिल्ह्यात ऊस लागवडीत दुपटीने वाढपरभणी  ः जिल्ह्यात सन २०१९-२० मध्ये ३० हजार...
सहकारी साखर कारखान्यांनी रुग्णालय...कऱ्हाड, जि. सातारा : कोरोनाचे संकट हे अख्या जगावर...
शेतीच्या डेटा विज्ञानाबाबत जागृकतेची...परभणी :  डेटा विज्ञान तसेच कृत्रिम...
कृषी सल्ला (कोकण विभाग)हवामान अंदाज ः मुंबई येथील प्रादेशिक हवामान...
सांगलीत डाळिंब उत्पादक पीकविम्याच्या...सांगली : जिल्ह्यात पाच मंडळांत अतिपावसाने...
खानदेशातील अनेक भागात तुरळक पाऊसजळगाव  ः जिल्ह्यात रविवारी (ता.९) अनेक भागात...
रानभाज्यांकडे नागरिकांचा वाढता कलयवतमाळ : जिल्ह्याच्या डोंगररांगा व शेतशिवारात...
सातवा वेतन लागू करा, महागाई भत्ता द्या...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
नगरमध्ये आले चार ते पाच हजार रूपये...नगर ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या...
नगर जिल्ह्यात चार लाख टन कांदा चाळीतचनगरः गतवर्षी लेट खरीप, उन्हाळी कांद्याचे क्षेत्र...
नाशिकमध्ये लसणाची आवक साधारण; दरही...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील...
सोलापुरात ढोबळी मिरची, वांगी, काकडीला...सोलापूर ः सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या...
मे ते जून दरम्यानचे वीज बिल माफ करा :...कोल्हापूर : मे ते जून दरम्यानचे वीज बिल माफ न...
पुणे बाजार समितीत व्यवहार सुरळीत...पुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
बुलडाण्यात २८२ शेतकऱ्यांनी राबवला रेशीम...बुलडाणा : जिल्ह्यात सन २०१५-१६ पासून सहकार व...