जालन्यात मूग खरेदी केंद्रांकडे शेतकऱ्यांची पाठ

पीक निघून जाण्याची वेळ आली, तरी अपडेटेड पेरा असलेला ऑनलाइन सातबारा मिळेना. या अडचणीमुळे शेतमाल खरेदीसाठी नोंदणीसाठी तलाठ्यांचा लिखित सातबारा चालेल, असा तोडगा काढला गेला. पण, आता शेतकऱ्यांना इच्छा असूनही हमीदराने शेतीमाल खरेदीसाठी अपडेटेड सातबारा मिळत नसल्याने नोंदणी करता येत नाही. - भगवानराव डोंगरे, सावरगाव. ता. जालना. अपडेटेड सातबारासोबतच सध्याच्या वातावरणात हमीदराने खरेदीसाठी आवश्‍यक आर्द्रता शेतीमालात मिळत नाही. त्यामुळे खरेदीसाठीची मुदत आणखी वाढवावी. तरच निकषानुसार हमीदराने खरेदी करणे शक्‍य आहे. - डॉ. श्रीहरी काळे,हरियाली ग्रीन व्हेज, वडीकाळ्या (ता. अंबड.)
जालन्यात मूग खरेदी केंद्रांकडे शेतकऱ्यांची पाठ
जालन्यात मूग खरेदी केंद्रांकडे शेतकऱ्यांची पाठ

जालना : हमीदराने शेतीमाल खरेदीसाठी जिल्ह्यात पाच केंद्रे कार्यान्वित करण्यात आली. परंतु, त्यापैकी केवळ एकाच केंद्रावर मूग व सोयाबीनसाठी केवळ ५० शेतकऱ्यांनी नोंदणी केली. सोयाबीनच्या नोंदणीसाठी ३१ ऑक्‍टोबरपर्यंतची मुदत असली, तरी उडीद, मुगाच्या नोंदणीसाठी मात्र मंगळवारी (ता. १५) शेतकऱ्यांना अखेरची संधी असणार आहे. 

औरंगाबाद जिल्ह्याप्रमाणेच जालना जिल्ह्यातही हमी दराने शेतीमाल खरेदीसाठी केंद्र देण्यात आली. तरीही नोंदणीला शेतकऱ्यांचा प्रतिसाद नसल्याची स्थिती आहे. जिल्ह्यात जालना, अंबड, तीर्थपुरी, भोकरदन व मंठा या पाच ठिकाणी उडीद, मूग, सोयाबीनच्या हमी दराने खरेदीसाठी केंद्रांना मंजुरी देण्यात आली. या पाचही केंद्रांवर शेतकऱ्यांना उडीद व मुगासाठी १५ ऑक्‍टोबरपर्यंत नोंदणी करणे अपेक्षित होते. परंतु, पाचपैकी केवळ जालना येथील केंद्रावरच ४९ शेतकऱ्यांनी मूग व एका शेतकऱ्याने १४ ऑक्‍टोबरपर्यंत सोयाबीन विक्रीसाठी नोंदणी केली. काही शेतकरी उत्पादक कंपन्याही महाएफपीसीच्या माध्यमातून हमीदराने शेतीमाल खरेदीसाठी उतरल्या आहेत. 

सातबारा मिळण्यात अडचणी

हमीदराने शेतीमाल खरेदीसाठी आवश्‍यक पेऱ्यासह अपडेटेड सातबारा आवश्‍यक आहे. सद्यःस्थितीत प्रशासकीय यंत्रणा ''इलेक्‍शन मोड''वर असल्याने शेतकऱ्यांना अपडेटेड सातबारा मिळत नाही. उडीद, मुगाचे पीक निघून मोठ्या प्रमाणात विकले गेले. त्याचा पेरा नोंदला गेला नसल्यामुळे शेतकऱ्यांना ऑनलाइन अपडेटेड सातबारा मिळाला नाही. आता सोयाबीनचीही तीच अवस्था आहे. पेरणी झाल्यानंतरच्या कालावधीत पिकांचे पेरे नोंदवून सातबारा ऑनलाइन अपडेटेड करून देता आले नसते का, असा प्रश्‍न शेतकरी उपस्थित करीत आहेत. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com