Agriculture news in marathi, Farmers' lessons at Mug Shopping Centers in Jalna | Agrowon

जालन्यात मूग खरेदी केंद्रांकडे शेतकऱ्यांची पाठ
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 15 ऑक्टोबर 2019

पीक निघून जाण्याची वेळ आली, तरी अपडेटेड पेरा असलेला ऑनलाइन सातबारा मिळेना. या अडचणीमुळे शेतमाल खरेदीसाठी नोंदणीसाठी तलाठ्यांचा लिखित सातबारा चालेल, असा तोडगा काढला गेला. पण, आता शेतकऱ्यांना इच्छा असूनही हमीदराने शेतीमाल खरेदीसाठी अपडेटेड सातबारा मिळत नसल्याने नोंदणी करता येत नाही. 
- भगवानराव डोंगरे, सावरगाव. ता. जालना. 

अपडेटेड सातबारासोबतच सध्याच्या वातावरणात हमीदराने खरेदीसाठी आवश्‍यक आर्द्रता शेतीमालात मिळत नाही. त्यामुळे खरेदीसाठीची मुदत आणखी वाढवावी. तरच निकषानुसार हमीदराने खरेदी करणे शक्‍य आहे.  
- डॉ. श्रीहरी काळे, हरियाली ग्रीन व्हेज, वडीकाळ्या (ता. अंबड.)

जालना : हमीदराने शेतीमाल खरेदीसाठी जिल्ह्यात पाच केंद्रे कार्यान्वित करण्यात आली. परंतु, त्यापैकी केवळ एकाच केंद्रावर मूग व सोयाबीनसाठी केवळ ५० शेतकऱ्यांनी नोंदणी केली. सोयाबीनच्या नोंदणीसाठी ३१ ऑक्‍टोबरपर्यंतची मुदत असली, तरी उडीद, मुगाच्या नोंदणीसाठी मात्र मंगळवारी (ता. १५) शेतकऱ्यांना अखेरची संधी असणार आहे. 

औरंगाबाद जिल्ह्याप्रमाणेच जालना जिल्ह्यातही हमी दराने शेतीमाल खरेदीसाठी केंद्र देण्यात आली. तरीही नोंदणीला शेतकऱ्यांचा प्रतिसाद नसल्याची स्थिती आहे. जिल्ह्यात जालना, अंबड, तीर्थपुरी, भोकरदन व मंठा या पाच ठिकाणी उडीद, मूग, सोयाबीनच्या हमी दराने खरेदीसाठी केंद्रांना मंजुरी देण्यात आली. या पाचही केंद्रांवर शेतकऱ्यांना उडीद व मुगासाठी १५ ऑक्‍टोबरपर्यंत नोंदणी करणे अपेक्षित होते. परंतु, पाचपैकी केवळ जालना येथील केंद्रावरच ४९ शेतकऱ्यांनी मूग व एका शेतकऱ्याने १४ ऑक्‍टोबरपर्यंत सोयाबीन विक्रीसाठी नोंदणी केली. काही शेतकरी उत्पादक कंपन्याही महाएफपीसीच्या माध्यमातून हमीदराने शेतीमाल खरेदीसाठी उतरल्या आहेत. 

सातबारा मिळण्यात अडचणी

हमीदराने शेतीमाल खरेदीसाठी आवश्‍यक पेऱ्यासह अपडेटेड सातबारा आवश्‍यक आहे. सद्यःस्थितीत प्रशासकीय यंत्रणा ''इलेक्‍शन मोड''वर असल्याने शेतकऱ्यांना अपडेटेड सातबारा मिळत नाही. उडीद, मुगाचे पीक निघून मोठ्या प्रमाणात विकले गेले. त्याचा पेरा नोंदला गेला नसल्यामुळे शेतकऱ्यांना ऑनलाइन अपडेटेड सातबारा मिळाला नाही. आता सोयाबीनचीही तीच अवस्था आहे. पेरणी झाल्यानंतरच्या कालावधीत पिकांचे पेरे नोंदवून सातबारा ऑनलाइन अपडेटेड करून देता आले नसते का, असा प्रश्‍न शेतकरी उपस्थित करीत आहेत. 

इतर बातम्या
ढगातील हिमकणांच्या निर्मितीची प्रक्रिया...एकत्रित प्रकारच्या ढगांमध्ये हवेच्या उभ्या...
किमान तापमानात घसरण, थंडीला सुरुवातमहाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा...
औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली...औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना,...
सांगली जिल्ह्यात पीकविम्यापासून ८६ हजार...सांगली : जिल्ह्यात ऑक्टोबरमधील पावसाने शेतकरी उद्...
बुलडाण्याचा रब्बी हंगाम जाणार अडीच लाख...बुलडाणा  ः  जिल्ह्याच्या रब्बी...
नुकसानीचा बोजा केंद्रप्रमुख, जिनिंग...जळगाव ः भारतीय कापूस महामंडळाने (सीसीआय) कापूस...
वेतोरेतील दहा हेक्टरवरील कणगरचे नुकसानसिंधुदुर्ग : जुलै, ऑगस्टमधील अतिवृष्टी आणि...
परभणी जिल्ह्यात नऊ हजार ९७१ हेक्टरवर...परभणी : जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात गुरुवार...
गडचिरोलीत रब्बी मक्‍यावर लष्करी अळीचा...गडचिरोली  ः धानकाढणीनंतर मका लागवड होणाऱ्या...
चौथ्यांदा कांदा रोपे तयार करण्याची वेळनाशिक  : जिल्ह्यात उन्हाळ कांद्याच्या लागवडी...
कापूस उत्पादक प्रकाश पुप्पलवार यांचा...यवतमाळ  ः इंडियन कॉटन असोसिएशन तसेच...
परभणीत हरभरा पीक व्यवस्थापनासाठी २१९...परभणी : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (...
उमराणे परिसरात चंदनचोरांचा धुमाकूळनाशिक : देवळा तालुक्यातील उमराणे येथे व परिसरात...
बाजार समितीला पर्यायी व्यवस्था देऊन...पुणे ः केंद्रीय अर्थमंत्र्यांनी बाजार समित्या...
पुणे, मुंबई बाजार समित्यांच्या निवडणुका...पुणे ः राज्यातील बदललेल्या सत्तासमीकरणांमुळे...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुपारीचे ५० टक्के...सिंधुदुर्ग ः लांबलेला पाऊस आणि क्यार...
काटेकोर शेतीत द्राक्ष उत्पादक अग्रेसर:...पुणे : कष्ट व कौशल्याच्या बळावर कोणताही आकार आणि...
पुणे विभागात रब्बीचे क्षेत्र दीड लाख...पुणे  ः ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात...
चीनमधील संत्रा खरेदीदारांचे शिष्टमंडळ...नागपूर ः चीनची बाजारपेठ मोठी असल्याने संत्रा...
आंबेगाव तालुक्यात अतिवृष्टीमुळे १६ हजार...मंचर, जि. पुणे  : अतिवृष्टीमुळे आंबेगाव...