अलिबाग येथे होणार शेतकरी साहित्य संमेलन

farmers literature festival
farmers literature festival

पुणे ः साहित्यिकांच्या शेती अर्थशास्त्र व नवतंत्रज्ञानाच्या जाणिवा समृद्ध करण्यासाठी, मराठी साहित्य-सारस्वतांची कृषिजगतासोबत सांगड घालून त्यांना कर्तव्यपूर्तीसाठी प्रेरित करून लेखणीच्या माध्यमातून शेतीची दुर्दशा थांबवून सर्जनशील साहित्यिकांची नवीन पिढी निर्माण करण्यासाठी ६ वे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. ८ व ९ फेब्रुवारी २०२० रोजी अलिबाग (जि. रायगड) येथे हे दोनदिवसीय संमेलन होणार आहे, अशी माहिती अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य चळवळीचे संस्थापक अध्यक्ष गंगाधर मुटे यांनी दिली. संमेलनच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ शेतकरी साहित्यिक भास्कर चंदनशिव यांची निवड करण्यात आली आहे. ज्येष्ठ पत्रकार संजय राऊत यांच्या हस्ते संमेलनाचे उद्‍घाटन होणार आहे. ८ फेब्रुवारीला उद्‍घाटन सत्रात मा. राजीव खांडेकर, संपादक, एबीपी माझा, खासदार सुनील तटकरे, सरोजताई काशीकर, ॲड. सतीश बोरुळकर यांची प्रमुख उपस्थिती असेल. स्वागताध्यक्ष ॲड. प्रदीप पाटील आणि कार्याध्यक्ष गंगाधर मुटे उपस्थित असतील. ‘ॲग्रोवन’चे संपादक आदिनाथ चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या पुरस्कार वितरण सत्राला राज्यमंत्री अदिती तटकरे, आमदार महेंद्र दळवी, नगराध्यक्ष प्रशांत नाईक, कृषी अर्थतज्ज्ञ संजय पानसे आणि कैलास तवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. समारोपीय सत्र शेतकरी नेते ॲड. वामनराव चटप यांच्या अध्यक्षतेखाली, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट, वरिष्ट पत्रकार मा. राजेश राजोरे, गीता खांडेभराड, बाबूभाई जैन, नीलकंठराव घवघवे, श्री. दिलीप भोयर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होईल.  दोन दिवस चालणाऱ्या या संमेलनात ‘हिरव्यागार शेतीला कार्बन क्रेडिटचा लाभ का नाही?’  ‘कांदे आणि अकलेचे कांदे’, ‘खुली बाजारपेठ आणि वायदा बाजार’, ‘खांद्यास चला खांदा भिडवूनी’ अशा विविध विषयांवरील परिसंवाद राहणार असून, या परिसंवादात ज्येष्ठ साहित्यिक, ज्येष्ठ शेतकरी नेते, शेती अर्थशास्त्राचे गाढे अभ्यासक, अर्थतज्ज्ञ इत्यादी अनुभवी वक्ते भाग घेणार असल्याने हे या संमेलनाचे वैशिष्ट्यपूर्ण वेगळेपण असणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com