Agriculture news in marathi, Farmers loan will be free : Uddhav Thackeray | Page 2 ||| Agrowon

शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणारच : उध्दव ठाकरे

टीम अॅग्रोवन
बुधवार, 16 ऑक्टोबर 2019

सोलापूर : ‘‘शिवसेना बोलते ते करते, आम्ही जाहीरनामा देत नाही, तर वचन देतो. शेतकऱ्यांना सातबारा कोरा करण्याचे वचन दिले आहे. ते मी पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही’’, असे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी (ता. १४) येथे पुन्हा एकदा सांगितले.

सोलापूर : ‘‘शिवसेना बोलते ते करते, आम्ही जाहीरनामा देत नाही, तर वचन देतो. शेतकऱ्यांना सातबारा कोरा करण्याचे वचन दिले आहे. ते मी पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही’’, असे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी (ता. १४) येथे पुन्हा एकदा सांगितले.

बार्शी विधानसभेचे भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार दिलीप सोपल यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ठाकरे बोलत होते. या वेळी उमेदवार दिलीप सोपल, मंत्री तानाजी सावंत, महाराष्ट्र गृहनिर्माण महामंडळाचे सहअध्यक्ष राजेंद्र मिरगणे, भाऊसाहेब आंधळकर, प्रभाकर देशमुख आदी उपस्थित होते. ठाकरे यांनी सोमवारी दिवसभर उस्मानाबाद आणि सोलापूर जिल्हा पिंजून काढला. या दोन्ही जिल्ह्यांत सहा ठिकाणी सभांचे नियोजन करण्यात आले होते. राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस हेच त्यांचे या सभांतील लक्ष्य होते. 

ठाकरे म्हणाले, ‘‘तुझे-माझे आता खूप झाले, असे करून आता चालणार नाही. ही निवडणूक केवळ आमदारकीची नाही, तर महाराष्ट्राचे भविष्य घडवणारी आहे. पवार साहेबांबद्दल मला आदर आहे. ते भरपूर मेहनत घेत आहेत. पण हीच मेहनत त्यांनी योग्य दिशेने केली असती, तर आज महाराष्ट्राची अशी दुर्दशा झाली नसती. हे सरकार घालवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असेही म्हटले जाते. पण हे सरकार कधी जाणार नाही, तुम्ही काहीही केले तरी आम्ही तुम्हाला स्वस्थ बसू देणार नाही.’’

‘‘आज आपल्याकडे चांगल्या कामाचा अनुभव असलेले मंत्री आहेत. दुष्काळामध्ये शेतकऱ्यांना मदत, सामूहिक विवाह, चारा छावण्या अशी कितीतरी कामे शिवसेनेने केली. हे सरकार आले, तेव्हा हे सरकार अस्थिर होते. या सरकारला भक्कम पाठिंबा शिवसेनेने दिला. यंदाही त्याचाच विचार करून आम्ही महायुती केली. महाराष्ट्राच्या हितासाठी चांगले काम करताना एकाही कामात शिवसेनेने सरकारच्या तंगड्यात तंगडं घातलेलं नाही,’’ असेही ठाकरे म्हणाले.

होय, आम्ही जनतेसाठी स्वयंपाक करू

शिवसेनेच्या दहा रुपयांत जेवणाच्या थाळीवरून बार्शीतील सभेत शरद पवार यांनी टीका केली होती. यावर बोलताना ठाकरे म्हणाले, ‘‘शिवसेनेने १० रुपयांमध्ये सकस जेवणाची थाळी देण्याचे वचन दिले आहे. त्याप्रमाणे ते पूर्ण करणारच. होय, जनतेसाठी स्वयंपाकी बनू, शिवाय एक रुपयांमध्ये आरोग्य चाचणी आम्ही करणार आहोत. पार तुमच्या डोक्यापासून पायापर्यंत आम्ही एक रुपयात चाचणी करू.’’


इतर बातम्या
बाजार समित्यांपुढे स्पर्धेचे आव्हान पुणे ः केंद्र सरकारच्या ‘एक देश, एक बाजार'...
धक्कादायक, सरकारी समित्यांमध्ये ...पुणे: पीकविमा योजनेसहित कृषी योजने संबंधित सर्व...
कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात हलक्या...पुणे ः गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील पावसाचा...
औरंगाबादमध्ये बटाटे २००० ते २४०० रुपये...औरंगाबाद  : येथील कृषी उत्पन्न बाजार...
सर्व शेतीमाल संपूर्ण नियमनमुक्त ! ‘एक...पुणे ः सर्व शेतीमालाच्या संपूर्ण नियमनमुक्तीच्या...
कोरोनाच्या संकटातही गुळाचा गोडवा कायमकोल्हापूर : महापुराच्या तडाख्यात सापडूनही सरत्या...
औसा तालुक्यात उडीद, मूग व्हायरसच्या...औसा, जि. लातूर : तालुक्यातील उडीद आणि मूग ही पिके...
आदिवासी तालुक्यांमध्ये कोरडा दुष्काळ...नाशिक: कोरोना विषाणूच्या फैलावामुळे राज्याचे...
शेतकरीविरोधी कायद्यावर ‘किसानपूत्र’चे...औरंगाबाद: किसानपूत्र आंदोलनाच्यावतीने...
शेतमजुरांसाठी कौशल्याधारीत प्रशिक्षण...नाशिक: बदलत्या पीक पद्धतीमध्ये कीडनाशक फवारणी,...
कोल्हापूर जिल्ह्यात वादळ, पुराचा उसाला...कोल्हापूर: जोरदार वाऱ्यासह सुरु असलेल्या पावसाने...
कोल्हापुरात नद्यांच्या पाण्यात वाढ...कोल्हापूर: जिल्ह्याच्या बहुतांशी भागात पावसाचा...
राज्यात पावसाचा जोर ओसरला पुणे ः कोकण, मध्य महाराष्ट्रात गेल्या चार ते पाच...
शेतकरी विरोधी अध्यादेश रद्द करा मुंबई: केंद्र सरकारने ५ जून २०२० रोजी काढलेले...
राज्यात पावसाचा जोर सोमवारपासून वाढणार पुणे ः बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र...
पुणे जिल्ह्यात पावसामुळे भात लागवडीला...पुणे ः गेल्या चार ते पाच दिवसांपासून पुणे...
किसान रेल्वेला नाशिकमधून प्रारंभ नाशिक: केंद्र सरकारने २०२० च्या अर्थसंकल्पात...
नाशवंत शेतमाल वाहतुकीसाठी किसान...नाशिक: कृषी क्षेत्रात प्रगत असलेल्या नाशिक...
पाथरूडच्या बंधाऱ्यांत मुबलक पाणीपाथरूड, जि. उस्मानाबाद : येथील दुधना नदीवर...
नंदुरबारमध्ये अनेक भागात पाऊस नंदुरबार ः जिल्ह्यात मागील दोन दिवसांत...