नवी दिल्ली : नाशिकमध्ये २२ जणांचे प्राण घेणाऱ्या ऑक्सिजन गळतीच्या दुर्घटनेमुळे संपूर्ण दे
ताज्या घडामोडी
निफाडच्या दोन शेतकऱ्यांची ७४ हजारांची फसवणूक
जिल्ह्यात द्राक्ष, कांदा या शेतीमालाबाबत अनेक शेतकऱ्यांची फसवणूक यापूर्वी समोर आली आहे. मात्र आता ऊस उत्पादक शेतकऱ्यांचीही फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.
नाशिक : जिल्ह्यात द्राक्ष, कांदा या शेतीमालाबाबत अनेक शेतकऱ्यांची फसवणूक यापूर्वी समोर आली आहे. मात्र आता ऊस उत्पादक शेतकऱ्यांचीही फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. आता ऊस उत्पादक शेतकऱ्यांची ऊसतोड कामगार व ट्रकचालकांकडून फसवणूक झाल्याची घटना निफाड येथे घडली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी, की गणेशनगर (ता. निफाड) येथील ऊस उत्पादक शेतकरी शरद रघुनाथ शिंदे यांची २ एकर उसाची शेती आहे. त्यांचा तोडणीयोग्य ऊसगाळपासाठी आल्यानंतर ता. रावळगाव येथील एस. जे. शुगर डिस्टिलरीज ॲन्ड पॉवर प्रायव्हेट लिमिटेड या साखर कारखान्याचे गट पर्यवेक्षक सुरेश निरभवणे आणि निवृत्ती ढोमसे यांनी घेण्याचे ठरविले. त्यानुसार ११ जानेवारी रोजी ऊसतोडणी करून दोन ट्रकमध्ये ३० टन इतका ऊस कारखान्यात नेला. त्यापोटी ऊस खाली करण्याच्या पावत्याही प्राप्त झाल्या.
पुन्हा दुसऱ्यांदा १५ जानेवारी रोजी ७४ हजारांचा ३० टन ऊस (एमच-०४ एएल-००३१) आणि (एमएच-१२, एक्यू-३६५३) या ट्रकमध्ये भरून नेला. या ट्रकमध्ये १५ टन ३७ हजार किमतीचा ऊस होता. यासह त्यांच्या शेजारील कृष्णा राऊत यांचा ४० गुंठे क्षेत्रावरील ऊस तोडून नेला. हा माल ट्रक (एमएच-१६ एई-९७६५) मधून भरून नेला. त्यास पोहोच पावतीही दिली. मात्र १५ जानेवारी नेलेल्या उसाची पावती दिलेली नाही. त्यास १५ टन ३७ हजार किमतीचा ऊस होता. याबाबत विचारणा केली. मात्र हा ऊस कारखान्याकडे पोहोचला नसल्याची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक राहुल हिंगे यांनी संबंधित शेतकऱ्यांना दिली.
ही बाब लक्षात येताच शरद शिंदे यांनी कारखान्याचे गटपर्यवेक्षक सुरेश निरभवणे, निवृत्ती डोंगरे आणि दोन्ही मालमोटारींचे चालक यांनी ७४ हजार रुपयांची संगनमताने फसवणूक केल्याची तक्रार निफाड पोलिस ठाण्यात नोंदविली. निफाड पोलिसांनी या तक्रारीनुसार गुन्हा दाखल केला आहे.
निफाड पोलिसांकडे फिर्याद दाखल
निफाड येथील दोन शेतकऱ्यांचा ३० टन ऊस कारखान्याचे कर्मचारी व ट्रकचालकांकडून लंपास केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून, ७४ हजारांची फसवणूक झाल्याची फिर्याद संबंधित शेतकऱ्यांकडून निफाड पोलिसांत नोंदविण्यात आली. पुढील तपास शिवाजी माळी हे करत आहेत.
- 1 of 1100
- ››