agriculture news in Marathi farmers looted from tower ad Maharashtra | Agrowon

टॉवरचा भुलभुलैया, लाखोंचा गंडा

टीम अॅग्रोवन
शनिवार, 5 डिसेंबर 2020

शेतात टॉवर बसवण्यासाठी संपर्क करा, अशा सोशल मीडियावरील जाहिरातींद्वारे भुलवून शेतकऱ्यांना लाखो रुपयांना गंडविले जात असल्याचे पोलिस ठाण्यात दाखल होणाऱ्या तक्रारींतून समोर आले आहे.

कऱ्हाड ः शेतात टॉवर बसवण्यासाठी संपर्क करा, अशा सोशल मीडियावरील जाहिरातींद्वारे भुलवून शेतकऱ्यांना लाखो रुपयांना गंडविले जात असल्याचे पोलिस ठाण्यात दाखल होणाऱ्या तक्रारींतून समोर आले आहे. कमी जागेत दर महिन्याला अधिक उत्पन्न मिळेल, या आशेने अनेक शेतकरी फसविले जात असून त्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. 

सध्या सोशल मीडियावरूनही त्यांची फसवणूक होत आहे. तुमच्या शेतात मोबाईल टॉवर बसवा आणि लाखो रुपये कमवा, अशा जाहिराती सोशल मीडियावर केल्या जात आहेत. कमी जागेत दर महिन्याला उत्पन्न सुरू होईल या भाबड्या आशेवर शेतकरीही त्याला फसत आहेत. संबंधित जाहिरातीत मोबाईल नंबर असतो. त्या मोबाईलला शेतकरी फोन करतात. त्यांना पहिल्यांदा त्यांच्या जमिनीचा सात-बारा, खाते उतारा, आधार कार्ड, पॅन कार्ड मागवून घेतात.

त्यानंतर त्यांना कागदपत्रे योग्य असल्याचे सांगतात. त्यानंतर शेतकऱ्यांना रजिस्ट्रेशनसाठी ३० किंवा ६० हजार रुपये त्यांच्या खात्यावर भरा असे सांगतात. शेतकऱ्यांनी ते पैसे भरल्यावर त्यांना ३० ते ६० लाख रुपये तुमच्या खात्यावर भरतो, बॅंक खात्याचे डिटेल्स पाठवा असे सांगतात. ते पाठवल्यावर त्या पैशांची जीएसटी भरावी लागणार आहे, त्यासाठी ५० ते ८० हजार रुपये भरा, असे सांगतात. ते भरल्यावर टॉवरचे साहित्य ट्रकामध्ये भरले आहे, ट्रकाला टोल व अन्य कामांसाठी आणखी १० ते २० हजार भरा, असे सांगतात. ते भरल्यावर साहित्य भरल्याचा ट्रक चार ते पाच दिवस पोचला नाही म्हटल्यावर ते संबंधिताला फोन करतात. त्या वेळी संबंधिताचा फोन बंद लागतो. त्यानंतर शेतकऱ्यांच्या आपली फसवणूक झाल्याचे समजते. त्यानंतर ते पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार देतात. अशाप्रकारे अनेक शेतकऱ्यांना टॉवर देतो असे सांगून गंडवल्याचे समोर आले आहे. त्यामुळे त्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. 

मी फसलो, तुम्ही फसू नका
मी जाहिरात बघून शेतात टॉवर बसवण्यासाठी संबंधित मोबाईल क्रमांकाला फोन केला. त्यांनी कागदपत्रे मागितली. ती दिल्यावर त्यांनी ३० हजार रुपये रजिस्ट्रेशनसाठी मागितले. त्यानंतर त्यांनी तीन दिवसांत खात्यावर ९० लाख भरतो, त्याच्या जीएसटीसाठी ६० हजार भरा असे सांगितले. ते भरल्यावर दोन दिवसांत साहित्य येईल, ट्रकचे भाडे आणि टोलसाठी १० हजार भरा, असे सांगितले. असे करत मला दोन लाखाला फसवले आहे. अन्य शेतकऱ्यांनी असे फसू नये, असे एका शेतकऱ्याने सांगितले.

प्रतिक्रिया
कोणत्याही टॉवर कंपन्या सोशल मीडियावर जाहिराती करून टॉवर उभे करत नाहीत. त्यासाठी अगोदर ते सर्व्हे करतात. त्यानंतर ते पुढील कार्यवाहीसाठी थेट शेतकऱ्यांकडे येतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी अशा जाहिरातींना फसून स्वतःचे आर्थिक नुकसान करून घेऊ नये. 
- धीरज पाटील, अतिरिक्त पोलिस अधिक्षक, सातारा


इतर अॅग्रो विशेष
‘कनेक्शन कट’चे कारस्थान!बिलाची थकीत रक्कम न भरल्यास आता थेट वीजतोडणीची (...
कापसाचा शिल्लक साठा बाहेर पाठवा कोरोना संक्रमण काळातील सुरुवातीचे तीन-चार महिने...
शेतकरी मागण्यांवर ठाम; ट्रॅक्टर रॅलीही...नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनी दिल्लीत ट्रॅक्‍टर...
बर्ड फ्लू नुकसानग्रस्त पोल्ट्री...नागपूर ः राज्यात ११ जिल्ह्यांमध्ये बर्ड फ्लूचा...
एक लाख शेतकऱ्यांची तूर विक्रीसाठी...अकोला ः राज्यात या हंगामात उत्पादित तूर खरेदीला...
कापूस उत्पादकतावाढीसाठी ‘सीआयसीआर’चा ॲ...नागपूर ः जगाच्या तुलनेत भारताची आणि त्यातही...
सांगली जिल्ह्यातील द्राक्ष हंगामास उशीरसांगली ः जिल्ह्यात अगदी क्वचितच आगाप छाटणी...
आजरा घनसाळसह तूरडाळ, घेवडा मिळणार...कोल्हापूर : पारंपरिक विक्री व्यवस्थेच्या पलीकडे...
थंडीत चढ-उतार सुरुच पुणे ः हिमालय आणि पश्चिम बंगालच्या परिसरात कमी...
खांबापासून ३० मीटरच्या आतील कृषिपंपांना...पुणे ः राज्यातील शेतकऱ्यांना कृषिपंपांसाठी...
गव्यांच्या कळपाकडून केळी बागांचे नुकसानसिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्यातील विलवडे मळावाडी (ता....
भाजीपाला, कणगर, दुधातून उंचावले...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेतोरे (ता.वेंगुर्ला)...
केंद्र सरकारकडून कृषी कायदांना...नवी दिल्ली ः दिल्लीच्या सीमांवर कृषी...
ग्रामसभांना ३१ मार्चपर्यंत परवानगी...अकोला : राज्यातील ग्रामपंचायतींमध्ये कोविड-१९च्या...
राज्यात साडेचार लाख क्‍विंटल मका...औरंगाबाद : बंद पडलेली मका खरेदी जवळपास एका...
शेतकऱ्यांच्या भूमिकेवर न्यायालयाची...नवी दिल्ली ः कृषी कायद्यांवरून निर्माण झालेल्या...
तूर खरेदीसाठी जिल्हानिहाय उत्पादकता...परभणी ः केंद्र शासनाच्या किमान आधारभूत किंमत...
कांदा निर्यातदारांसाठी आता ‘ओनियन नेट’ नागपूर : कांदा उत्पादनाच्या बाबतीत जागतीक स्तरावर...
खानदेशात गारठा वाढला पुणे ः उत्तर भारतातील काही राज्यात थंडीची लाट आली...
पावसाच्या पाण्यावर फुलवलेली दर्जेदार...निमगाव घाणा (ता. जि. नगर) येथील रामदास रघुनाथ...