शेतकरी सन्मान निधी योजनेच्या दोन वर्षपूर्तीच्या कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्या
ताज्या घडामोडी
मनमाडमध्ये शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीला मोठा प्रतिसाद
नाशिक : मनमाड येथे किसान सभेच्या वतीने शेतकरी विरोधी कायद्याविरोधात दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी खादगाव ते मनमाड ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली.
नाशिक : मनमाड येथे किसान सभेच्या वतीने शेतकरी विरोधी कायद्याविरोधात दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी खादगाव ते मनमाड ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली. यावेळी केंद्र सरकारच्या धोरणांचा कडाडून विरोध करण्यात आला.
रॅलीत किसान सभा जिल्हा संघटक विजय दराडे, मनमाड गुरुद्वाराचे प्रमुख बाबा रणजितसिंग, जिल्हा उपाध्यक्ष ॲड. साधना गायकवाड यांनी नेतृत्व केले. तीन कृषी कायदे व कामगार विरोधी ४ श्रमसहिंता रद्द कराव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
केंद्र सरकारने कामगारांचे २९ केंद्रीय कायदे रद्द करून नवीन कामगार विरोधी ४ कायदे मंजूर केले. त्यामुळे कामगारांवर गुलामगिरीची नामुष्की आली आहे. शेतकऱ्यांची मागणी नसताना शेतकरी विरोधी ३ कृषी कायदे मंजूर केले. तसेच सार्वजनिक उद्योग व सेवा यांचे खासगीकरण आणि विक्री करण्याचे निर्णय भाजप सरकार झपाट्याने घेत आहे. यामुळे देशाची अर्थव्यवस्था धोक्यात आली आहे. बड्या कंपन्यांचे हित साधण्यासाठी आर्थिक धोरण व कायदे करण्यात येत आहेत. यामुळे जनतेमध्ये मोठा असंतोष आहे.
- 1 of 1055
- ››