agriculture news in marathi Of farmers in Manmad Big response to the tractor rally | Agrowon

मनमाडमध्ये शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीला मोठा प्रतिसाद

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 26 जानेवारी 2021

नाशिक : मनमाड येथे किसान सभेच्या वतीने शेतकरी विरोधी कायद्याविरोधात दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी खादगाव ते मनमाड ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली.

नाशिक : मनमाड येथे किसान सभेच्या वतीने शेतकरी विरोधी कायद्याविरोधात दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी खादगाव ते मनमाड ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली. यावेळी केंद्र सरकारच्या धोरणांचा कडाडून विरोध करण्यात आला.

रॅलीत किसान सभा जिल्हा संघटक विजय दराडे, मनमाड गुरुद्वाराचे प्रमुख बाबा रणजितसिंग, जिल्हा उपाध्यक्ष ॲड. साधना गायकवाड यांनी नेतृत्व केले. तीन कृषी कायदे व कामगार विरोधी ४ श्रमसहिंता रद्द कराव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली.   

केंद्र सरकारने कामगारांचे २९ केंद्रीय कायदे रद्द करून नवीन कामगार विरोधी ४ कायदे मंजूर केले. त्यामुळे कामगारांवर गुलामगिरीची नामुष्की आली आहे. शेतकऱ्यांची मागणी नसताना शेतकरी विरोधी ३ कृषी कायदे मंजूर केले. तसेच सार्वजनिक उद्योग व सेवा यांचे खासगीकरण आणि विक्री करण्याचे निर्णय भाजप सरकार झपाट्याने घेत आहे. यामुळे देशाची अर्थव्यवस्था धोक्यात आली आहे. बड्या कंपन्यांचे हित साधण्यासाठी आर्थिक धोरण व कायदे करण्यात येत आहेत. यामुळे जनतेमध्ये मोठा असंतोष आहे.


इतर ताज्या घडामोडी
शेतीच्या उन्नतीसाठी ज्ञानच महत्त्वाचे...पुणे : कृषीप्रधान देश असलेल्या भारतात शेतीला...
अवकाळीच्या तडाख्यात शेवग्याचे पुन्हा...नाशिक : गत जानेवारी महिन्यात झालेल्या अवकाळी...
खानदेशात वीजबिल वसुलीसाठी शेतकऱ्यांमागे...जळगाव : खानदेशात कृषिपंपांची वीजबिल थकबाकी...
खानदेशात मका दर सुधारलेजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
नांदेड जिल्ह्यात राष्ट्रीयीकृत...नांदेड : जिल्ह्यात खरीप व रब्बी हंगाम २०२०-२१...
‘महाखनिज’मध्ये परराज्यांतील वाळूची...परभणी ः ‘‘राज्य शासनाने परराज्यांतून होणाऱ्या...
पुणे बाजार समितीत पायाभूत सुविधा द्या,...पुणे ः पुणे बाजार समितीमधील भुसार विभागातील...
परभणी : संचालक मंडळाच्या निवडणूकीत...परभणी ः परभणी जिल्हा बॅंक संचालक मंडळाच्या...
सातारा जिल्हा बॅंकेसाठी दोन हजारांवर...सातारा : जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीसाठी सोसायटीसह...
सात वर्षांत हमीभावात ऐतिहासिक वाढ ः...नवी दिल्ली : गेल्या सात वर्षांत केंद्र सरकारने...
सोलापुरात शेतकऱ्यांना थेट कर्जवाटप करणारसोलापूर : आर्थिक स्थितीमुळे गेल्या चार-पाच...
पणनची कापूस खरेदी रविवारपासून बंदनागपूर : बाजारात हमीभावापेक्षा कापसाला मिळणारा...
राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी...सोलापूर : सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा या...
शेतीला दिवसा आठ तास वीजपुरवठा करा :...मुंबई : राज्यात वीजेचे दर कमी करण्याचे व...
मराठा आरक्षणाची सुनावणी सर्वोच्च...मुंबई : ‘‘देशातील अनेक राज्यांमधून त्यांच्या...
शॉर्टसर्किटमुळे आग; अकराशे आंबा, काजू...रत्नागिरी : तालुक्यातील शीळ-सड्यावर वणव्याच्या...
घनकचरा पथदर्शी प्रकल्पांसाठी सिंधुदुर्ग...वैभववाडी : स्वच्छ भारत मिशनच्या दुसऱ्या...
अकोल्यात रब्बीसाठी ५४ कोटींचे पीककर्ज...अकोला : यंदाच्या रब्बी हंगमात जिल्ह्यात लागवड...
भाजपला दिला आयारामांनी झटका...सांगली : सांगली-मिरज-कुपवाड महालिकेवर गेल्या अडीच...
तंत्र कोथिंबीर लागवडीचे...कोथिंबीर पिकास नियमित ४ ते ५ दिवसांनी पाणी द्यावे...