Agriculture news in marathi Farmers in Marathwada face financial difficulties from banks | Agrowon

मराठवाड्यात बॅंकांकडून शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी

टीम अॅग्रोवन
रविवार, 7 जून 2020

कर्जमाफीनंतर आता पीक कर्ज मागणीसाठी ऑनलाइन अर्ज केला आहे. बँकेत जाऊन विचारपूस केली असता अजून वरिष्ठ पातळीवरून आदेश आले नसल्याचे उत्तर देण्यात येते. 
- भास्कर गीते, शेतकरी, देवगाव, जि. औरंगाबाद. 
 

औरंगाबाद : मराठवाड्यात पूर्वमोसमी पाऊस बऱ्यापैकी झाला. पेरणीपूर्व मशागतीच्या कामाने वेग घेतला आहे. शिवाय, काही ठिकाणी कपाशी लागवड ही सुरू झाली आहे. परंतु, शेतकऱ्यांच्या पीक कर्जपुरवठ्याबाबत सातत्याने अनास्था दाखविली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी आर्थिक कोंडी झाली आहे. 

येत्या खरीप हंगामात मराठवाड्यात जवळपास ४८ लाख हेक्टरवर पेरणीचे नियोजन आहे. त्यानुसार शेतकऱ्यांची पेरणीची लगबग सुरू झाली आहे. परंतु, त्यासाठी आवश्यक कर्जपुरवठा होण्यात पुन्हा एकदा बँकांची उदासिनता अडसर ठरत आहे. औरंगाबाद जिल्ह्यात येत्या खरीप हंगामासाठी ११९६ कोटी ८० लाख रुपये कर्जपुरवठ्याचे उद्दिष्ट देण्यात आले. त्यातून विविध बँकांनी आतापर्यंत केवळ ९.८५ टक्के कर्जपुरवठा करत ११७ कोटी ९३ लाखांचे कर्जवाटप केले. 

जालना जिल्ह्यातील १ हजार ११५ कोटी कर्जवाटप लक्षांकाच्या तुलनेत केवळ ७ टक्के कर्जपुरवठा केला आहे. १७ हजार शेतकऱ्यांना ७७ कोटी रुपयांचे कर्जवाटप केले आहे. लातूर जिल्ह्यात २२८३ कोटी लक्षांकाच्या तुलनेत ३२ टक्के उद्दिष्टपूर्ती करताना ५४७ कोटी १८ लाख रुपयांच्या कर्जाचा पुरवठा केल्याची माहिती सहकार विभागाच्या सूत्रांनी दिली. 

शासनाच्या वतीने कर्जमाफीचे आकडे घोषित केले गेले. शिवाय, थकित कर्ज असणाऱ्यांनाही कर्ज देण्याची बँकांना सूचना केली गेली. तरीही कर्ज वाटपाची गती संथ असल्याने शासन-प्रशासन स्तरावरून याविषयी पावले उचलली जाणार की नाही, असा प्रश्न उपस्थित करून शेतकरी संताप व्यक्त करीत आहेत. बॅंकांत चकरा मारून शेतकरी वैतागले आहेत. 

कर्जासाठी ऑनलाइन अर्ज 

औरंगाबाद व जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पीक कर्जासाठी ऑनलाइन अर्जाची प्रक्रिया सुरू आहे. त्यात जालना जिल्ह्यात जवळपास १ लाख ७७ हजार शेतकऱ्यांनी कर्ज मागणीसाठी ऑनलाइन अर्ज केले असले, तरी शेतकऱ्यांना किती कर्ज पुरवठा केला गेला हा प्रश्न आहे. याशिवाय औरंगाबाद जिल्ह्यातही पीक कर्जासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे. 
 
 


इतर ताज्या घडामोडी
नगरमध्ये मागणीच्या ५० टक्केच युरिया... नगर   ः जोमात असलेल्या खरीप...
सोलापुरात खते उपलब्धता पुरेशी, दरवाढीचा...सोलापूर   ः सोलापूर जिल्ह्यात जूनअखेर...
जळगावात आले २८०० ते ४४०० रुपये...जळगाव  ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सातारा जिल्ह्यात जाणवतेय युरियाची टंचाई सातारा   ः खरीप हंगामाकरिता रासायनिक...
पुणे जिल्ह्यात अनावश्यक खते खरेदी ...पुणे  ः शेतकऱ्यांना खरीप हंगामात खतांची...
औरंगाबाद, जालना जिल्ह्यातील पाच मंडळांत...औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद व जालना...
जळगाव जिल्ह्यात टंचाईमुळे जादा दराने...जळगाव : जिल्ह्यात यंदा पेरणी वेळेत झाली, पण...
औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यात...औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड आदी...
बीड विभागात १८ लाख क्विंटल कापसाची खरेदीबीड  ः राज्य कापूस पणन महासंघाच्या बीड...
महाळूंग येथील कोविड केअर सेंटरला `आयएसओ...सोलापूर : माळशिरस तालुक्‍यातील महाळूंग येथील...
नांदेड, परभणी, हिंगोलीत खतांसाठी...नांदेड : यंदा नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांनी...
नाशिक जिल्ह्यात शेतकऱ्यांची धावपळ,...नाशिक : खरीप पिकांना वाढीच्या अवस्थेत खतांची...
पीकविमा प्रस्ताव सादर करण्यासाठी ३१...परभणी : ‘‘पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गंत...
महाराष्ट्राच्या विकासात डॉ. चव्हाण...मुंबई : जनसेवा, राज्याची आणि देशाची सेवा...
सोलापूरसह नजीकच्या गावांमध्ये ...सोलापूर  : सोलापूर शहर आणि शेजारील...
नाशिक जिल्ह्यात सोयाबीन बियाण्यांच्या...नाशिक : खरीप हंगामात जिल्ह्यातील सोयाबीनची पेरणी...
नगरमध्ये मागणीच्या ५० टक्केच युरिया...नगर ः जोमात असलेल्या खरीप पिकांसाठी युरियाची...
शेतकऱ्याने तुटपुंज्या मदतीचा धनादेश...नाशिक : निसर्ग चक्री वादळाने ३ जून रोजी येवला...
अकोला : आवश्‍यक खते मिळवताना...अकोला ः या हंगामातील पिकांची लागवड होऊन बहुतांश...
सिंधुदुर्गात खते मिळाली; पण वेळेत नाहीतसिंधुदुर्ग ः खरीप हंगामाच्या सुरुवातीला जिल्ह्यात...