परभणी ः ‘‘परभणी जिल्हा परिषदेच्या यंदाच्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात कृषी तसेच पशुसंवर्धन
अॅग्रो विशेष
जवानांनंतर शेतकऱ्यांचे ‘संचलन’
प्रजासत्ताक दिनाचे संचलन झाल्यानंतर ट्रॅक्टर संचलनाला सुरवात होईल, असे दिल्ली पोलिसांनी सांगितले.
नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर संचलनाद्वारे कृषी कायद्यांविरोधात शक्तीप्रदर्शनावर ठाम असलेल्या आंदोलनकर्त्या शेतकरी संघटनांना ट्रॅक्टर संचलनाला पोलिसांची परवानगी मिळाली आहे. राजपथावर प्रजासत्ताक दिनाचे संचलन झाल्यानंतर ट्रॅक्टर संचलनाला सुरवात होईल, असे दिल्ली पोलिसांनी सांगितले.
कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीवर शेतकरी संघटना ठाम असून प्रजासत्ताक दिनाच्या ट्रॅक्टर संचलनातून शक्तीप्रदर्शनाची जोरदार तयारी केली आहे. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, शेतकरी संघटनांनी दिल्लीच्या आऊटर रिंगरोडवर संचलनाच्या परवानगीची मागणी केली होती. परंतु पोलिसांनी सुरक्षेचे कारण देत इन्कार केल्यानंतर सिंघू, टिकरी आणि गाजीपूर अशा तीन सीमांवरून हे संचलन सुरु होऊन त्याच ठिकाणी परत येण्यास होकार मिळाला आहे.
ट्रॅक्टर संचलनासंदर्भात पोलिसांशी झालेल्या वाटाघाटीनंतर संयुक्त किसान मोर्चाचा प्रमुख चेहरा व स्वराज इंडियाचे नेते योगेंद्र यादव यांनी पत्रकारांशी बोलताना पोलिसांकडून ट्रॅक्टर संचलनाला परवानगी मिळाल्याचे सांगितले. शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर संचलन पूर्णपणे शांततेत असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
ट्वीट..
हे आंदोलन राजकीय नव्हे तर पूर्णपणे शेतकऱ्यांचे आहे. सरकारचे काम सत्याग्रही अन्नदात्यांना दिल्लीच्या सीमेवर रोखण्याचे नव्हे, तर चीनला सीमेवर रोखण्याचे आहे. मोदी सरकार म्हणजे अयोग्यता आणि अहंकार!
- राहुल गांधी, काँग्रेस खासदार
ट्रॅक्टर मोर्चाचा मार्ग
मार्ग १ : सिंघू सीमेवरून सुरुवात - संजय गांधी ट्रान्स्पोर्ट, कंझावाला, बवाना, औचंदी सीमामार्गाने हरियानात जाऊन पुन्हा सिंघू सीमा.
मार्ग २ : टिकरी सीमेवरून सुरुवात - नांगलोई, नजफगड, झडौदा, बादली त्यानंतर कुंडली मानेसर पलवल मार्गावरून टिकरी सीमा
मार्ग ३ : गाझीपूर यूपी गेटपासून सुरवात - अप्सरा सीमा, गाझियाबाद, डासना मार्गे उत्तर प्रदेशातून पुन्हा गाझीपूर सीमा.
पाककडून उपद्रव शक्य
प्रजासत्ताक दिन राष्ट्रीय गौरव आहे या सोहळ्यात अडथळे येऊ नये यावर शेतकरी संघटना सहमत असल्याचे दिल्ली पोलिसांचे विशेष आयुक्त दीपेंद्र पाठक यांनी सांगितले. दिल्लीमध्ये ट्रॅक्टर संचलनाचा १०० किलोमीटरपेक्षा अधिक मार्ग असेल. या शेतकरी संघटनांच्या आंदोलनाच्या निमित्ताने पाकिस्तानचा भारतात उपद्रव घडविण्याचा प्रयत्न आहे, असाही दावा त्यांनी केला. ट्रॅक्टर संचलनाशी संबंधित एकूण ट्विटर हँडलपैकी ३०८ ट्विटर हँडल पाकिस्तानातील असल्याचे आढळून आले असून पाकिस्तानातील दहशतवादी गटांचीही या ट्रॅक्टर संचलनावर नजर आहे. त्यामुळे पुरेशी सुरक्षा व्यवस्था केली जाणार असल्याचेही पाठक यांनी स्पष्ट केले.
- 1 of 674
- ››