agriculture news in Marathi farmers march on government offices for insurance Maharashtra | Agrowon

संत्रा पीकविम्यासाठी शेतकरी धडकले जिल्हा कार्यालयांवर

टीम अॅग्रोवन
बुधवार, 18 मार्च 2020

अकोला ः जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील अकोलखेड मंडळातील शेतकऱ्यांना संत्रा मृग बहारचा विमा परतावा रक्कम न मिळाल्याने हे शेतकरी मंगळवारी (ता.१७) जिल्हाधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयांवर धडकले. शेकडोंच्या संख्येत असलेल्या शेतकऱ्यांनी प्रशासनाला आपल्या मागण्यांचे निवेदन दिले.

अकोला ः जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील अकोलखेड मंडळातील शेतकऱ्यांना संत्रा मृग बहारचा विमा परतावा रक्कम न मिळाल्याने हे शेतकरी मंगळवारी (ता.१७) जिल्हाधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयांवर धडकले. शेकडोंच्या संख्येत असलेल्या शेतकऱ्यांनी प्रशासनाला आपल्या मागण्यांचे निवेदन दिले.

याबाबत शेतकऱ्यांनी म्हटले की, अकोट तालुक्यातील शेतकऱ्यांनी संत्रा या पिकासाठी फळपीक विमा कंपनीकडे उतरविला होता. या विमा कंपनीने अकोट तालुक्यातील उमरा व पणज या महसूल मंडळात हेक्टरी ३८ हजार ५०० रुपयांप्रमाणे १२ मार्चला शेतकऱ्यांना परतावा दिला; परंतु अकोलखेड मंडळाला जाणीवपूर्वक वगळण्यात आले. एकाच तालुक्यात दोन मंडळांत मदत व लगतच्याच एका मंडळाला वगळण्याचा निर्णय अफलातून आहे. 

वास्तविक, गेल्या वर्षी कोरडा व या वर्षी ओला दुष्काळ या फळबागांनी झेलला. यामुळे उत्पादनात मोठी घट आली. अशी परिस्थिती असताना विमा कंपनीने संत्रा पिकाला मृग बहारासाठी विमा लाभापासून वंचित ठेवले आहे. ही रक्कम तातडीने देण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

तसेच सन २०१९-२० मध्ये झालेल्या अतिपावसाने परिसरातील संत्रा आणि केळी या फळपिकांची मोठ्या प्रमाणात हानी झाली होती. त्यासाठी शासनाने तेव्हा मदत जाहीर केली; परंतु अद्याप एकही रुपया मिळालेला नाही, त्याचेही वितरण केले जावे, अशी मागणीही करण्यात आली. या निवेदनाच्या प्रतिलिपी पालकमंत्री, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनाही देण्यात आली आहे.


इतर ताज्या घडामोडी
उदगीरमधील ‘देवर्जन’ सात वर्षांनंतर भरलाउदगीर : देवर्जन (ता. उदगीर) येथील मध्यम...
बीड, लातूरमधील मंडळांत दमदार पाऊसऔरंगाबाद : औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद,...
गिरणा पट्ट्यात पूर ओसरताच वाळूचा उपसा...जळगाव : गिरणा परीसरातील शेतकऱ्यांना पूर,...
सेस रद्द करा, अन्यथा बंद पुकारूपुणे ः केंद्र सरकारच्या कृषी आणि पणन विषयक तीन...
जळगावात बाजार समित्या बरखास्तीचे राजकारणजळगाव ः जिल्ह्यात दोन्ही काँग्रेस, शिवसेनेची...
शेतकऱ्यांसाठी सुखावणारा कायदा ः...कोल्हापूर ः शेती उत्पन्न व्यापार आणि वाणिज्य...
बुलडाण्यात दहा हजार हेक्टरवर क्षेत्र...बुलडाणा ः जिल्ह्यात शनिवार (ता. १९) व रविवारी (ता...
सिंधुदुर्ग जिल्ह्याला मुसळधार पावसाने...सिंधुदुर्ग ः जिल्ह्याच्या काही भागाला सोमवारी (ता...
अखेर ६६५ शेतकऱ्यांना विम्याचा लाभअकोला ः  सन २०१९ च्या खरीप हंगामात पंतप्रधान...
संत्रा वाहतुकीसाठी रेल्वेकडून वरूड...अमरावती : किसान रेल्वेच्या माध्यमातून येत्या...
जळगावात मेथी २००० ते ३५०० रुपये जळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सोलापूर जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी...सोलापूर  : मराठा समाजाला आरक्षण...
मुक्त विद्यापीठात कृषीविषयक अभ्यासक्रम...नाशिक : ‘‘यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त...
सोलापूर जिल्ह्यात दहा हजार हेक्‍टरवर...सोलापूर : जिल्ह्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून...
सोलापूर जिल्हा बॅंक देणार अल्प मुदतीचे...सोलापूर : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी...
परभणी, हिंगोलीत ओल्या दुष्काळाचे सावटपरभणी : परभणी, हिंगोली जिल्ह्यातील अनेक मंडळांत...
जळगाव जिल्ह्यात उडीद, मूग खरेदीची...जळगाव : शासकीय उदीद, मूग खरेदीसंबंधीची प्राथमिक...
परभणीत भरपाईसाठी ‘स्वाभिमानी’ची पिकांसह...परभणी : अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान...
नाशिक जिल्ह्यात खरिपासह भाजीपाला पिके...नाशिक : जिल्ह्याच्या सर्वदूर भागात शनिवारी (...
`औरंगाबाद जिल्ह्यातील नुकासानग्रस्त...औरंगाबाद : सतत सुरू असलेल्या पावसाने कोणत्या...