मुंबई : दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा, केंद्र सरकारचे तीन नव्या कृषी कायद्यांना विरो
बातम्या
कुरखेड्यात ‘महावितरण’वर शेतकऱ्यांचा मोर्चा
गडचिरोली : कृषी पंपाच्या फिडरवर सुरू असलेले भारनियमन बंद करावे, यासह इतर मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी कुरखेडा येथील महावितरणच्या उपविभागीय अभियंता कार्यालयावर मोर्चा काढला.
गडचिरोली : कृषी पंपाच्या फिडरवर सुरू असलेले भारनियमन बंद करावे, यासह इतर मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी कुरखेडा येथील महावितरणच्या उपविभागीय अभियंता कार्यालयावर मोर्चा काढला. १६ तासांऐवजी आठ तास भारनियमन करण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर शेतकरी परतले.
गेवर्धा येथील महावितरण''च्या सबस्टेशन मधून दहा ते बारा गावातील कृषिपंपांना वीजपुरवठा होतो. मात्र गेल्या काही दिवसांपासून या वीज वाहिनीवर १६ तासांचे भारनियमन केले जात आहे. परिणामी, शेतकऱ्यांना संरक्षित सिंचनात अडचणी येत आहेत. रब्बी हंगामातील उन्हाळी पिकांची लागवड, उत्पादन घेणे देखील कठीण झाले आहे. महावितरणच्या या धोरणाविरोधात शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. भारनियमन बंद करून क्षेत्राला दिलासा द्यावा, अशा मागणीचे निवेदन वारंवार देण्यात आले.
मात्र आश्वासनाशिवाय शेतकऱ्यांच्या हाती काहीच लागले नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी महावितरणच्या कार्यालयावर धडक दिली.
दरम्यान उपविभागीय अभियंता राजेंद्र मुरकुटे यांनी आंदोलक शेतकऱ्यांशी चर्चा केली. मात्र, निर्णय होईस्तोवर आंदोलन मागे घेणार नाही, असा पवित्रा मोर्चेकऱ्यांनी घेतला होता. परिणामी, तणाव वाढल्याने घटनास्थळी पोलिसांना पाचारण करावे लागले.
सायंकाळी उशिरापर्यंत आंदोलकांच्या प्रश्नांवर तोडगा निघू शकला नाही. मोर्चात महेंद्रकुमार मोहबंसी, आशिष काळे, घीसू खुने, कुंडलिक देशमुख, सोनू भट्टड, गुणवंत कवाडकर, प्रकाश दरवडे, अशोक गायकवाड, अरुण नेताम, भोजराज खुने यांच्यासह शेतकरी सहभागी झाले होते.
आठ तास भारनियमन
कुरखेडा तालुक्यात कृषिपंपांसाठी सोळा तासाचे भारनियमन करण्यात येत होते. याप्रश्नी शेतकऱ्यांच्या आंदोलनाची दखल घेत उपविभागीय अभियंता राजेंद्र मुरकुटे यांनी भारनियमन कमी करण्याचे जाहीर केले. आठ तास भारनियमन यापुढे होईल, असे आश्वासन मोर्चेकऱ्यांना देण्यात आले. त्यानंतर शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन मागे घेतले.
- 1 of 1504
- ››