agriculture news in marathi Farmers march on 'Mahavitaran' in Kurkheda | Agrowon

कुरखेड्यात ‘महावितरण’वर शेतकऱ्यांचा मोर्चा

टीम अॅग्रोवन
बुधवार, 25 नोव्हेंबर 2020

गडचिरोली : कृषी पंपाच्या फिडरवर सुरू असलेले भारनियमन बंद करावे, यासह  इतर मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी कुरखेडा येथील महावितरणच्या उपविभागीय अभियंता कार्यालयावर मोर्चा काढला.

गडचिरोली : कृषी पंपाच्या फिडरवर सुरू असलेले भारनियमन बंद करावे, यासह  इतर मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी कुरखेडा येथील महावितरणच्या उपविभागीय अभियंता कार्यालयावर मोर्चा काढला. १६ तासांऐवजी आठ तास भारनियमन करण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर शेतकरी परतले.

गेवर्धा येथील महावितरण''च्या सबस्टेशन मधून दहा ते बारा गावातील कृषिपंपांना वीजपुरवठा होतो. मात्र गेल्या काही दिवसांपासून या वीज वाहिनीवर १६ तासांचे भारनियमन केले जात आहे. परिणामी, शेतकऱ्यांना संरक्षित सिंचनात अडचणी येत आहेत. रब्बी हंगामातील उन्हाळी पिकांची लागवड, उत्पादन घेणे देखील कठीण झाले आहे. महावितरणच्या या धोरणाविरोधात शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. भारनियमन बंद करून क्षेत्राला दिलासा द्यावा, अशा मागणीचे निवेदन वारंवार देण्यात आले.

मात्र आश्वासनाशिवाय शेतकऱ्यांच्या हाती काहीच लागले नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी महावितरणच्या कार्यालयावर धडक दिली. 

दरम्यान उपविभागीय अभियंता राजेंद्र मुरकुटे यांनी आंदोलक शेतकऱ्यांशी चर्चा केली. मात्र, निर्णय होईस्तोवर आंदोलन मागे घेणार नाही, असा पवित्रा मोर्चेकऱ्यांनी घेतला होता. परिणामी, तणाव वाढल्याने घटनास्थळी पोलिसांना पाचारण करावे लागले.

सायंकाळी उशिरापर्यंत आंदोलकांच्या प्रश्नांवर तोडगा निघू शकला नाही. मोर्चात महेंद्रकुमार मोहबंसी,  आशिष काळे,  घीसू खुने, कुंडलिक देशमुख, सोनू भट्टड, गुणवंत कवाडकर, प्रकाश दरवडे, अशोक गायकवाड, अरुण नेताम, भोजराज खुने यांच्यासह शेतकरी सहभागी झाले होते.   

आठ तास भारनियमन

कुरखेडा तालुक्यात कृषिपंपांसाठी सोळा तासाचे भारनियमन करण्यात येत होते. याप्रश्नी शेतकऱ्यांच्या आंदोलनाची दखल घेत उपविभागीय अभियंता राजेंद्र मुरकुटे यांनी भारनियमन कमी करण्याचे जाहीर केले. आठ तास भारनियमन यापुढे होईल, असे आश्वासन मोर्चेकऱ्यांना देण्यात आले. त्यानंतर शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन मागे घेतले.


इतर ताज्या घडामोडी
नाशिक बाजारात कारल्याचे दर टिकूननाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
जळगावात हरभरा आला कापणीलाजळगाव ः जिल्ह्यात रब्बीची पेरणी २००...
प्रदर्शनातील कृषी ज्ञानाचा खजाना पाहून...माळेगाव, जि. पुणे ः कृषिक २०२१- कृषी तंत्रज्ञान...
पुणे विभागात उसाच्या ५५ टक्के लागवडीपुणे ः यंदा पावसाळ्यात झालेल्या दमदार पावसामुळे...
देवना साठवण तलावाचा प्रलंबित प्रश्न...नाशिक : येवला तालुक्यातील अवर्षणप्रवण उत्तरपूर्व...
‘बर्ड फ्लू’ रोखण्यासाठी ९० दिवस...परभणी ः जिल्ह्यात बर्ड फ्लूचा प्रसार आणि संसर्ग...
अतिवृष्टीचा मदत आठवड्यात मिळणारसोलापूर : गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात झालेल्या...
महावितरणच्या आदेशामुळे वीज ग्राहक...सोलापूर : कोरोनाच्या साथीमुळे घटलेले आर्थिक...
भंडारा जळीत प्रकरणाचा अहवाल शासनाकडे नागपूर : भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील शिशू...
उन्हाळी सोयाबीन लागवडीस गतीअकोला : यंदाच्या खरीप सोयाबीन काढणीच्या वेळेस...
वारणेत उभारणार पशुवैद्यकीय महाविद्यालय...वारणानगर, जि. कोल्हापूर : येथील वारणा सहकारी...
बेदाणा पॅकिंगसाठीच्या बॉक्सच्या दरात...सांगली ः बेदाणा, डाळिंबासह अन्य फळभाज्यांच्या...
यवतमाळ : पोल्ट्रीत चार हजार कोंबड्यांचा...यवतमाळ : कोरोनाच्या संकटातून सावरू पाहणाऱ्या...
रिसोडमध्ये कांदा बीजोत्पादनाकडे कल रिसोड, जि. वाशीम : तालुक्यात यंदा कांदा...
औरंगाबादेत सर्वच पक्षांकडून गुलालाची...औरंगाबाद : मतदानाची प्रक्रिया शांततेत पार...
पुणे जिल्ह्यात संमिश्र निकाल; दावे-...पुणे ः जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये...
साताऱ्यात स्थानिक आघाड्यांचा जल्लोषसातारा ः दोन दिवसांपूर्वी मतदान झाले. गेले दोन...
नांदेड जिल्ह्यात प्रस्थापितांनी सत्ता...नांदेड : नांदेड जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे...
नाशिक जिल्ह्यात प्रस्थापितांना धक्कानाशिक : जिल्ह्यात एकूण ६२१ ग्रामपंचायतीच्या...
माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या...यवतमाळ : माजी मुख्यमंत्री व जलक्रांतीचे प्रणेते...