वाढीव वीजबिलांबाबत शेतकऱ्यांनी घेतली अधिकाऱ्यांची भेट 

मंगरूळपीर तालुक्यातील कासोळा, दस्तापूर, पोटी, आसेगाव, धानोरा व इतर खेड्यांतील शेतकऱ्यांना महावितरण कंपनीने अव्वाच्या सव्वा पद्धतीने देयके दिल्याने व सध्या विजेसदर्भात अनेक समस्यांमुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत.
वाढीव वीजबिलांबाबत शेतकऱ्यांनी घेतली अधिकाऱ्यांची भेट 
वाढीव वीजबिलांबाबत शेतकऱ्यांनी घेतली अधिकाऱ्यांची भेट 

मंगरूळपीर, जि. वाशीम : तालुक्यातील कासोळा, दस्तापूर, पोटी, आसेगाव, धानोरा व इतर खेड्यांतील शेतकऱ्यांना महावितरण कंपनीने अव्वाच्या सव्वा पद्धतीने देयके दिल्याने व सध्या विजेसदर्भात अनेक समस्यांमुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. त्यामुळे महावितरण कार्यालयात शेतकऱ्यांनी समस्या मांडल्या. 

महावितरणचे अधिकारी श्री. जांभूळकर यांच्याशी संवाद करीत, यंदा निसर्गाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. सोयाबीन पिकाचे पावसामुळे मोठे नुकसान झाले. पाहिजे तसा सोयाबीनला भाव नाही, अशा या बिकट परिस्थितीत शेतकऱ्यांना महावितरणचे विद्युत बिल भरणे शक्य नाही. त्यामुळे बिलासंदर्भात पर्याय काढा व एक इंन्स्टॉलमेंट भरल्यावर कुठल्याही शेतकऱ्याची वीज कापू नका, वीजबिलामध्ये काही सूट देऊन किंवा काही मार्ग काढून शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सुरू करण्याची मागणी केली. 

बांधवांच्या लाइन सुरू कराव्या, अशी मागणी लावून धरण्यात आली. शेतकऱ्यांची बाजू ऐकून व राम ठाकरे यांच्या निवेदनाचा विचार करून तीन टप्प्यांत वीजबिल भरणा करण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला. अनेक शेतकऱ्यांनी हा पर्याय मान्य सुद्धा केला. काही शेतकऱ्यांना कमी तर काही शेतकऱ्यांना जास्त बिल असल्यामुळे नाराजीचा सूरसुद्धा उमटत होता. अनेक शेतकरी या वीजबिलामुळे त्रस्त आहेत. त्यामध्येच अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये रोहित्रांची अवस्था बिकट झाली आहे. त्यामुळे वारंवार वीजपुरवठा बंद राहल्याने शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. महावितरणने रोहित्र दुरुस्त करून तसेच पुरवठ्याचे नियोजन करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणीही करण्यात आली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com