agriculture news in marathi Farmers meet mahavitaran officer regarding agri pump electricity extra bill charge issue | Agrowon

वाढीव वीजबिलांबाबत शेतकऱ्यांनी घेतली अधिकाऱ्यांची भेट 

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 12 नोव्हेंबर 2021

मंगरूळपीर तालुक्यातील कासोळा, दस्तापूर, पोटी, आसेगाव, धानोरा व इतर खेड्यांतील शेतकऱ्यांना महावितरण कंपनीने अव्वाच्या सव्वा पद्धतीने
देयके दिल्याने व सध्या विजेसदर्भात अनेक समस्यांमुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत.

मंगरूळपीर, जि. वाशीम : तालुक्यातील कासोळा, दस्तापूर, पोटी, आसेगाव, धानोरा व इतर खेड्यांतील शेतकऱ्यांना महावितरण कंपनीने अव्वाच्या सव्वा पद्धतीने
देयके दिल्याने व सध्या विजेसदर्भात अनेक समस्यांमुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. त्यामुळे महावितरण कार्यालयात शेतकऱ्यांनी समस्या मांडल्या. 

महावितरणचे अधिकारी श्री. जांभूळकर यांच्याशी संवाद करीत, यंदा निसर्गाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. सोयाबीन पिकाचे पावसामुळे मोठे नुकसान झाले. पाहिजे
तसा सोयाबीनला भाव नाही, अशा या बिकट परिस्थितीत शेतकऱ्यांना महावितरणचे विद्युत बिल भरणे शक्य नाही. त्यामुळे बिलासंदर्भात पर्याय काढा व एक
इंन्स्टॉलमेंट भरल्यावर कुठल्याही शेतकऱ्याची वीज कापू नका, वीजबिलामध्ये काही सूट देऊन किंवा काही मार्ग काढून शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सुरू करण्याची
मागणी केली. 

बांधवांच्या लाइन सुरू कराव्या, अशी मागणी लावून धरण्यात आली. शेतकऱ्यांची बाजू ऐकून व राम ठाकरे यांच्या निवेदनाचा विचार करून तीन टप्प्यांत वीजबिल
भरणा करण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला. अनेक शेतकऱ्यांनी हा पर्याय मान्य सुद्धा केला. काही शेतकऱ्यांना कमी तर काही शेतकऱ्यांना जास्त बिल
असल्यामुळे नाराजीचा सूरसुद्धा उमटत होता. अनेक शेतकरी या वीजबिलामुळे त्रस्त आहेत. त्यामध्येच अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये रोहित्रांची अवस्था
बिकट झाली आहे. त्यामुळे वारंवार वीजपुरवठा बंद राहल्याने शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. महावितरणने रोहित्र दुरुस्त करून तसेच पुरवठ्याचे
नियोजन करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणीही करण्यात आली. 


इतर ताज्या घडामोडी
सोयाबीन आणि कापसाचे मराठवाडा,...विदर्भ सोयाबीन बाजारभाव (Vidarbha soybean market...
 सर्वोच्च न्यायालयाचा महाराष्ट्र...सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) अखेर...
पुणे जिल्ह्यातील तीन हजार कामे...पुणे : जिल्हा परिषदेने हाती घेतलेल्या शंभर दिवस...
जालन्यात गहु सोंगणीला सुरुवातपिंपळगाव रेणुकाई, जि. जालना : पिंपळगाव रेणुकाईसह...
बांबू प्रक्रियेसाठी कौशल्याची आवश्यकता...दापोली, जि. रत्नागिरी ः ‘‘विस्तार शिक्षण...
शेळी, मेंढीपालन व्यवसाय म्हणजे ‘एटीएम’...दोंडाईचा, जि. धुळे : कष्टकरी शेळी-मेंढीपालन...
ड्रॅगन फ्रूटची कलमे आगीत भस्मलांजा, जि. रत्नागिरी ः तालुक्यातील धुंदरे येथे डॉ...
नगर जिल्ह्यासाठी ५४० कोटी रुपयांचा निधी...नगर : नगर जिल्हा वार्षिक योजनेत २०२२-२३ या आर्थिक...
‘पोकरा’अंतर्गत ३२७ गावांसाठी १३०...औरंगाबाद : नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्प (...
सोलापुरातील १३ साखर कारखाने ‘लाल यादी’तमाळीनगर, जि. सोलापूर ः यंदाच्या गाळप हंगामात...
जळगावात पावणेदोन लाख हेक्टरपर्यंत रब्बी...जळगाव ः जिल्ह्यात ऑगस्ट ते सप्टेंबर २०२१ दरम्यान...
खानदेशात कांदा पिकाची दहा हजार हेक्टरवर...जळगाव ः खानदेशात कांदा पिकाची लागवड सुरूच आहे....
‘गिरणा’चे वस्त्रहरण करणाऱ्यांवर कारवाई...चाळीसगाव, जि. जळगाव ः जळगाव जिल्ह्याची जीवनवाहिनी...
चांदवडमध्ये कांदा लिलाव सुरूनाशिक : अकरा जानेवारीपासून सोमवार (ता. १७) पर्यंत...
ग्रामपंचायतींना इंटरनेट सेवा त्वरित...सोलापूर : जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतींना...
ऊस तोडणीस विलंब; शेतकऱ्यांत चिंतासातारा ः अवेळी झालेल्या पाऊस, अनेक कारखान्यांची...
पुणे जिल्हा परिषदेवर प्रशासक?पुणे ः जिल्हा परिषदेसह जिल्ह्यातील विविध पंचायत...
गाव कोरोनामुक्त ठेवून ५० लाख जिंकापुणे ः कोरोनाच्या प्रादुर्भावापासून गावमुक्तीसाठी...
पाच जिल्ह्यांत १४ लाख हेक्‍टरवर रब्बीची...लातूर : विभागातील लातूर, उस्मानाबाद, परभणी,...
मिनी विधानसभेच्या निवडणुका मार्चमध्ये...मिनी विधानसभा समजल्या जाणाऱ्या राज्यातील १४...