जळगाव ः खानदेशात चांगल्या दर्जाच्या केळीला रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर चांगला उठाव
ताज्या घडामोडी
म्हसवड येथे शेतकरी आंदोलन सुरूच
म्हसवड, जि. सातारा : शेतजमीन कब्जे वहिवाटीत वर्षानुवर्षे असलेल्या कुळहक्क शेतकऱ्यांचे दहिवडीनंतर आता म्हसवड येथील तलाठी कार्यालयाच्या आवारात ठिय्या आंदोलन सुरू आहे.
म्हसवड, जि. सातारा : शेतजमीन कब्जे वहिवाटीत वर्षानुवर्षे असलेल्या कुळहक्क शेतकऱ्यांचे दहिवडीनंतर आता म्हसवड येथील तलाठी कार्यालयाच्या आवारात ठिय्या आंदोलन सुरू आहे.
आंदोलनाचा मंगळवारी (ता. २) २० वा दिवस होता.
सुमारे १५० वर्षांपूर्वीपासून कब्जे वहिवाटीत असलेल्या शेतजमिनी मोठ्या संख्येने शेतकरी कसत आहेत. सातबारा सदरी रेषेच्यावर येथील सरंजामांची व रेषेच्याखाली कुळ असलेल्या शेतकऱ्यांची नोंदी आहेत. सरंजामांची पोकळ नोंद असलेली नावे कमी करून कसेल, त्याची जमीन या कायद्यांतर्गत
कुळधारक शेतकऱ्यांचीच नावे सातबारा सदरी नोंद करण्यासाठी श्रमिक मुक्ती दलातर्फे डॉ. भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू आहे.
जमीन मालकी हक्काचा वाद
सरकारने वेळोवेळी कुळ हक्काबाबत कायदे केले. परंतु योग्य महसूल कर्मचारी व अधिकाऱ्यांनी म्हसवड भागातच त्याची अंमलबजावणी केली नाही. त्यामुळे कुळ व सरंजाम यांच्यात जमीन मालकी हक्काचा वाद उफाळला आहे. दहिवडी प्रांताधिकारी कार्यालयासमोर ११ फेब्रुवारीपासून ठिय्या आंदोलन सुरू आहे. यापूर्वी टेंभू पाण्यासाठी १६ गावांच्या लोकांचे नेतृत्व अनिल देसाई यांनी केले होते.
- 1 of 1090
- ››