agriculture news in marathi farmers must get micro irrigation tranning : Dr. Dattatray Vane | Agrowon

शेतकऱ्यांना सूक्ष्म सिंचनाचे प्रशिक्षण आवश्‍यक : डॉ. दत्तात्रय वने

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

नगर  ः ‘‘पाणी व्यवस्थापन ही महत्त्वाची बाब आहे. शेतीला पाण्याबाबत काटेकोर व्यवस्थापन करावे लागेल. त्यासाठी सध्या सूक्ष्मसिंचनाचा वापर करीत असलेल्या शेतकऱ्यांना काटेकोर सूक्ष्मसिंचन, तर भुईदंडाने पाणी देणाऱ्यांना सूक्ष्मसिंचनाचे प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. त्यासाठी शेतकऱ्यांचे दोन गट करा,’’ असे मत कृषिभूषण डॉ. दत्तात्रय वने यांनी व्यक्त केले.  

नगर  ः ‘‘पाणी व्यवस्थापन ही महत्त्वाची बाब आहे. शेतीला पाण्याबाबत काटेकोर व्यवस्थापन करावे लागेल. त्यासाठी सध्या सूक्ष्मसिंचनाचा वापर करीत असलेल्या शेतकऱ्यांना काटेकोर सूक्ष्मसिंचन, तर भुईदंडाने पाणी देणाऱ्यांना सूक्ष्मसिंचनाचे प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. त्यासाठी शेतकऱ्यांचे दोन गट करा,’’ असे मत कृषिभूषण डॉ. दत्तात्रय वने यांनी व्यक्त केले.  

राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठात ‘काटेकोर पाणी व्यवस्थापन, दृष्टिकोन व संधी’ या विषयावर एकदिवसीय सल्लागार कार्यशाळा झाली. त्यात तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. जागतिक बँक अर्थसाह्यित, राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्प व भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्लीतर्फे महात्मा फुले कृषी विद्यापीठात हवामान अद्ययावत शेती आणि जल व्यवस्थापनाचे आधुनिक कृषिविज्ञान व तंत्रज्ञान केंद्र सुरू करण्यात आले आहे.

‘पोकरा’चे प्रमुख कृषी विद्यावेत्ता विजय कोळेकर, कृषी उद्योजकतज्ज्ञ रफीक्षमक नाईकवाडी, कृषिभूषण डॉ. दत्तात्रय वने, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. व्ही. एम. खोडके, डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठातील जलसिंचन व निचरा अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख डॉ. एस. बी. वडतकर, मृद व जलसंधारण अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख डॉ. ए. ए. अत्रे, प्रकल्प सहसमन्वयक एम. जी. शिंदे, जलसिंचन व निचरा अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख डॉ. एच. डब्ल्यू. आवरी आदी उपस्थित होते. 

कार्यशाळेत काटेकोर पाणी व्यवस्थापन तंत्रज्ञानाविषयी शेतकऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण करणे, अवलंबन करीत असलेल्या काटेकोर पाणी व्यवस्थापन तंत्रज्ञानाविषयी रणनीती आखून पाणी व्यवस्थापनात काटेकोरपणा आणणे, लायसिमीटर तंत्रज्ञानाद्वारे विविध पिकांचे पीक गुणांक तयार करणे, त्यांद्वारे काटेकोर पाणी व्यवस्थापन करणे, याविषयी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. हवामान अद्ययावत शेती आणि जल व्यवस्थापन संशोधन प्रक्षेत्रावर कार्यरत असलेल्या विविध तंत्रज्ञानांची माहिती शास्त्रज्ञांनी प्रत्यक्ष जाणून घेतली.


इतर ताज्या घडामोडी
पेरलेला कांदा काढणीला येवला, जि. नाशिक : यंदा वातावरणामुळे रोपे सडली....
महाबीज’ कर्मचाऱ्यांच्या संपामुळे बियाणे...अकोला ः महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या (...
माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना...कऱ्हाड, जि. सातारा ः आधुनिक महाराष्ट्राचे...
एकरकमी ‘एफआरपी’चे वाटप कोल्हापुरात...कोल्हापूर  : जिल्ह्यात हंगाम सुरू होऊन पंधरा...
पूर्णवेळ कृषी सहसंचालकाची प्रतीक्षापुणे : पुणे विभागीय कृषी सहसंचालकाची जबाबदारी...
सांगलीत तीनशे सौर कृषिपंप सुरूसांगली  : वीजपुरवठा नसतानाही दिवसा पिकांना...
ऊसदर आंदोलनाची रणभूमी कऱ्हाड राहीलसातारा : ऊसदरासह इतर प्रश्‍नांवर चर्चा...
रब्बीसाठी ‘वान’चे पाणी देण्याची...बुलडाणा : जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या वान...
सातारा जिल्ह्यात ‘एफआरपी’चा प्रश्‍न...कऱ्हाड  : साखर कारखान्यांत ऊस गाळप...
काटेपूर्णाच्या कालव्यांची दुरुस्ती...अकोला : यंदाच्या रब्बी हंगामासाठी काटेपूर्णा...
धान खरेदीवरून गृहमंत्र्यांनी...नागपूर  : गोंदिया जिल्हात धान खरेदी...
बुलडाण्यात दोन कोटींची नुकसान भरपाईबुलडाणा  : दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या...
शासकीय खरेदीअभावी उत्पादकांची लूटआरेगाव, जि. यवतमाळ  : आज ना उद्या शासन...
यवतमाळमध्ये पन्नास हजार क्विंटल कापूस...यवतमाळ : जिल्ह्यात सुरू करण्यात आलेल्या सीसीआय...
‘द्वारकधीश’कडून पंधरवड्यात ५५ हजार टन...नाशिक : सटाणा तालुक्यातील शेवरे येथील द्वारकाधीश...
`ऊर्जामंत्र्यांवर सदोष मनुष्यवधाचा...नाशिक : जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील ३...
किनवट येथे धानाचे खरेदी केंद्र मंजूरनांदेड : धान खरीप पणन हंगाम २०२० - २१ साठी...
‘इसापूर’चे पहिले आवर्तन शुक्रवारपासूननांदेड : ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्प इसापूरमधून...
खानदेशात मका, ज्वारीला हमीभाव मिळेना जळगाव : खानदेशात ज्वारी, मक्याची आवक बाजारात सुरू...
परभणी जिल्ह्यात तीस हजार हेक्टर ऊस...परभणी  ः जिल्ह्यात सन २०१९-२० मध्ये लागवड...