agriculture news in marathi Farmers in Nanded, Parbhani, Hingoli district produce 348.54 tons of silk cocoons | Agrowon

नांदेड, परभणी, हिंगोलीत ३४८.५४ टन रेशीम कोश उत्पादन

टीम अॅग्रोवन
रविवार, 10 मे 2020

गतवर्षीच्या दुष्काळात अनेक शेतकऱ्यांना तुती मोडून टाकावी लागली. त्यात लॉकडाउनमुळे मार्केट बंदमुळे कोश उत्पादनही बंद 
राहिले. बाल्यकिटकांची मागणी घटल्याने दोन ते अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले. 
- कपिल सोनटक्के, बाल्य रेशीम किटक, उत्पादक, भेंडेगाव, ता. वसमत, जि. हिंगोली. 

वर्षभर रेशीम कोश उत्पादन घेत असतो. लॉकडाउनमुळे दोन ते अडीच महिन्यापासून कोश उत्पादन घेता येत नाही. दर देखील 
निम्म्यावर आले आहेत. दिड ते दोन लाख रुपयांचे नुकसान झाले. 
- राधेश्याम खुडे, रेशीम कोश उत्पादक, बोरगव्हाण, ता. पाथरी, जि. परभणी. 
 

नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात २०१९-२० मध्ये १ हजार ६७० शेतकऱ्यांनी १ हजार ८०१ एकरवरील तुतीवर ५ लाख ५ हजार ९५० अंडीपुंजापासून ३४८.५४ टन रेशीम कोश उत्पादन घेतले, अशी माहिती जिल्हा रेशीम विकास अधिकारी कार्यालयातील सूत्रांनी दिली. 

गतवर्षीच्या दुष्काळात तीन जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी सिंचनासाठी पाणी नसल्यामुळे वाळून गेलेली तुती मोडून टाकली होती. तुतीचे क्षेत्र कमी झाल्यामुळे २०१८-१९ च्या तुलनेत २०१९-२० मध्ये रेशीम कोश उत्पादनात घट झाली. लॉकडाउनमुळे वाहतूक आणि मार्केट बंद राहिले. यामुळेही मोठा तोटा सहन करावा लागला. 

नांदेड जिल्ह्यात २०१८-१९ मध्ये ६८६ शेतकऱ्यांनी ८३३ एकरवरील तुतीवर २ लाख ६४ हजार १७२ अंडीपुंजापासून १५७.०२४ टन, २०१९-२० मध्ये ४६३ शेतकऱ्यांनी ५७५ एकरवरील तुतीवर १ लाख ७८ हजार ४५० अंडीपुंजापासून १०६.५४ टन कोश उत्पादन घेतले, असे रेशीम विकास अधिकारी पी. बी. नरवाडे यांनी सांगितले. 

परभणी जिल्ह्यात २०१८-१९ मध्ये ८५६ शेतकऱ्यांनी ९४० एकरवरील तुतीवर ४ लाख ३५ हजार अंडीपुंजापासून २५२.७७० टन कोश उत्पादन घेतले होते.सन २०१९ मध्ये ८१८ शेतकऱ्यांनी ८१४ एकरवरील तुतीवर ३ लाख १४ हजार अंडीपुंजापासून १६७ टन कोश उत्पादन घेतले असे रेशीम अधिकारी पी.एस.देशपांडे यांनी सांगितले. 

हिंगोली जिल्ह्यात २०१८-१९ मध्ये ५२१ शेतकऱ्यांनी ५५९.६५ एकवरील तुतीवर २ लाख १० हजार ७०९ अंडीपुंजापासून १०६.००९ टन, तर २०१९-२० मध्ये ३८९ शेतकऱ्यांनी ४१२ एकरवरील तुतीवर १ लाख ३५ हजार अंडीपुंजापासून ७५ टन रेशीम कोश उत्पादन घेतले. जिल्ह्यतील १०० शेतकऱ्यांना रेशीम कोश विक्रीतून २ लाख रुपयावर उत्पन्न मिळाले. उर्वरित शेतकऱ्यांना ५० ते ८० हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले, असे रेशीम विकास अधिकारी स्वप्नील तायडे, अशोक वडवळे यांनी सांगितले. 

जिल्हानिहाय शेतकरी, तुती लागवड (एकरमध्ये), कोश उत्पादन (टनमध्ये

जिल्हा शेतकरी तुती लागवड अंडीपुंज कोश उत्पादन 
नांदेड ४६३ ५७५ १७८४५० १०६.५४
परभणी ८१८ ८१४ ३१४००० १६७ 
हिंगोली ३८९ ४१२ १३५००० ७५ 

 


इतर ताज्या घडामोडी
काही भागात पावसाच्या उघडिपीची शक्यता महाराष्ट्रावर बुधवार (ता.२३) पर्यंत  १००४...
राज्य द्राक्ष बागायतदार संघाची ...नाशिक: महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार...
पांगरी परिसरात पिकांवर आस्मानी संकटपांगरी, जि. सोलापूर ः पांगरी (ता. बार्शी) परिसरात...
शेतमाल स्थानिक भागात विकला जाणार : भुजबळनाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यात आदिवासी समाज...
परभणी, हिंगोली जिल्ह्यात पावसाचे थैमाननांदेड : मराठवाड्यातील परभणी, हिंगोली जिल्ह्यात...
नाशिक विभागात कांदा लागवडीत ८ हजार...नाशिक : चालू वर्षी खरीप कांद्याच्या लागवडीपूर्वी...
रावेर तालुक्यात सीएमव्ही नुकसानीचे...जळगाव ः कुकुंबर मोसॅक विषाणूमुळे (सीएमव्ही)...
हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनच्या पिकाला...हिंगोली : जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून...
मराठवाड्यात अतिपाऊस खरीप पिकांच्या...औरंगाबाद : मराठवाड्यात गत काही दिवसांपासून...
धुळ्यात लाळ्या खुरकूत रोग प्रतिबंधक...धुळे : धुळे जिल्ह्यात ३० सप्टेंबरपर्यंत...
पावसाचा डाळींब पिकाला तडाखाआटपाडी, जि. सांगली ः अवर्षण प्रवण असलेल्या आटपाडी...
मायक्रो फायनान्सचे चक्रव्यूह...मुंबई : ग्रामीण भागातील सूक्ष्म वित्त पुरवठा...
नगर जिल्ह्यात अतिवृष्टीचा चार हजार...नगर ः यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीपासून चांगला...
कोकण कृषी विद्यापीठात बांबू कार्यशाळेचे...दापोली, जि. रत्नागिरी : जगभरात दरवर्षी १८...
अकोला जिल्ह्यातील सहा खत विक्रेत्यांचे...अकोला ः या हंगामात खत विक्रीत मोठ्या प्रमाणात...
सदोष बियाणेमुळे भेंडी बीजोत्पादक अडचणीतबुलडाणा ः लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांनी या...
भातपीक कापणीत पावसाचा अडसररत्नागिरी : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने...
ठाण्यातील १४ हजार हेक्टर पिकांचा काढला...मुंबई : ठाणे जिल्हा कृषी विभागाने यंदा पंतप्रधान...
औरंगाबादमध्ये कांदा ३०० ते २३०० रूपयेऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
आरोग्यदायी विड्याचे पानकोणत्याही धार्मिक कार्यात, पूजेच्या ठिकाणी...