नाशिक जिल्ह्यात शेतकरी ऊसतोडणीअभावी हतबल

नाशिक : जिल्ह्यात यंदा कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात मुबलक ऊस उपलब्ध असल्याने तोडणीच्या टोळ्या कमी पडल्या आहेत. अशातच वाढते उन, उसाला आलेले तुरे आणि लांबत चाललेल्या तोडणी तारखेने शेतकरी हतबल झाले आहेत.
 Farmers in Nashik district Handless due to lack of cane cutting
Farmers in Nashik district Handless due to lack of cane cutting

नाशिक : जिल्ह्यात यंदा कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात मुबलक ऊस उपलब्ध असल्याने तोडणीच्या टोळ्या कमी पडल्या आहेत. अशातच वाढते उन, उसाला आलेले तुरे आणि लांबत चाललेल्या तोडणी तारखेने शेतकरी हतबल झाले आहेत. 

प्रामुख्याने निफाड तालुक्यातील गोदाकाठ, नाशिक व इगतपुरी तालुक्यांतील दारणा काठ परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी अधिक हतबल आहेत. जिल्ह्यातील एकूण ८ कारखान्यापैकी ६ सहकारी तर २ खासगी आहेत. आजमितीस सहकारी तत्त्वावरील ३ कारखाने सुरू आहेत. त्यापैकी कादवा साखर कारखाना वगळता वसाका व रानवड साखर कारखाने भाडेकरू संस्थेतर्फे सुरू आहेत. तर द्वाराकधीश हा एकमेव खाजगी कारखाना सुरू आहे. जिल्ह्यातील एक खासगी व तीन सहकारी असे चार कारखाने बंद असल्याने ऊस उत्पादकांची मोठी कोंडी झाली आहे. जिल्ह्यात उसाचे १७ हजार ६८८ हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. 

२५ ते ३० टक्के ऊस वजनात व साखर ऊतारा ०.५ ते ०.१ टक्क्यापर्यंत कमी येतो. दोन महिने झाले सर्व ऊस पिवळा, पक्व झाल्याने आडवा, तिडवा, उंदीर, घुशी यांनी ऊस पिकाचे नुकसान झाले आहे. नाशिक व नगर ऊस तोडी कमी असल्याने व ऊस तोडण्यासाठी तोडपाणी केल्याशिवाय तोड येत नाही. कोणत्याही पक्षाचे राजकारणी ऊस शेतकऱ्यापर्यंत जात नाही, मोठे शेतकरी पुढाऱ्यांनी त्यांचा ऊस प्रभावामूळे तोडून दिले पण सर्वसामान्य ऊस शेतकऱ्यांचं काय, असा प्रश्‍न आहे. 

- वसंत शिंदे, प्रदेश उपाध्यक्ष, संघर्ष शेतकरी संघटना

उसाला तोडच नसल्याने ऊस लागवड करणे बंद केले आहे. इगतपुरी, नाशिक, त्र्यंबकेश्‍वर तालुक्यातील ऊस मोठ्या प्रमाणावर तोडण्याविना आहे. त्यामुळे ऊस उभा अन् कारखाने बंद असल्याने नुकसान वाढत आहे. त्यामुळे ऊस उत्पादकांसमोर ‘इकडे आड, तिकडे विहीर’ अशी परिस्थिती आहे. उभ्या उसाचं करायचं काय अशी भीषण परिस्थिती आहे.

- विलास गायधनी, अध्यक्ष, नासाका बचाव संघर्ष समिती

जोपर्यंत ऊस गाळप पूर्ण होत नाही तोपर्यंत कारखाना बंद करता येणार नाही अशा सूचना दिल्या आहेत. राहिलेला ऊस लगतच्या जिल्ह्यातील कारखान्यांना दिला जाईल किंवा जिल्ह्यात विभागणी करून कारखान्यास दिला जाईल. ऊसतोडणी मजुरांचा प्रश्‍न आहेच, मात्र त्याचेही नियोजन करू. - मिलिंद भालेराव, प्रादेशिक साखर सह संचालक, नगर  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com